“यथावकाश” कहाणी स्पर्धा परिक्षार्थींची व खरे वास्तव…
“यथावकाश” कहाणी स्पर्धा परिक्षार्थींची….
लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये स्वतःला अजमावत आहेत. ग्रामीण भागातील हे विद्यार्थी जीवाचे रान करून अभ्यास करतात. कोणी अधिकाऱ्यांची भाषणे ऐकून तर कोणी अधिकाऱ्यांचा रुबाब पाहून तर कोणी लाल दिवा पाहून, कोणी देशसेवा तर कोणी सुरक्षित नोकरी म्हणून या क्षेत्रात येतात.
पण किती विद्यार्थी व पालक यातील खरे वास्तव जाणून घेतात? गावातील कोणीतरी अधिकारी झाला त्याची मिरवणूक निघाली, त्याचा सत्कार झाला आणि ते पाहून मीही अधिकारी होणार किंवा माझा मुलगा/ मुलगी असेच अधिकारी होणार या विचारातून या क्षेत्रात येण्याचे प्रमाण वाढत आहे.
प्रत्येक वर्षी किती पदांसाठी भरती निघाली जाते? एक परीक्षा किती वर्ष चालते? किती विद्यार्थी परीक्षा देतात? व त्यातील किती विद्यार्थी पास होतात? याचा कोणी विचार करता का?
याचा अर्थ असा नाही की स्पर्धा परीक्षेसाठी कोणीच तयारी करू नये परंतु स्पर्धा परीक्षा ची तयारी करण्यापूर्वी किंवा करताना आपल्या आयुष्यातील उमेदीची किती वर्ष या क्षेत्रात द्यायचे हे ठरवणे गरजेचे आहे. आपण या परीक्षा देण्या इतपत लायक आहोत का? अर्थात आपण लायक आहोत की नाही हे पहिल्या दोन ते तीन वर्षांमध्ये विद्यार्थ्यांनी ओळखणे गरजेचे आहे? आजही हजारो विद्यार्थी वयाच्या 35 वर्षानंतरही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत मात्र यामध्ये यश मिळण्याचे प्रमाण खूप कमी आहे. आज महाराष्ट्र मध्ये जवळपास दहा लाख विद्यार्थी अभ्यास करत आहेत. त्यातील प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त दहा हजारात विद्यार्थी वेगवेगळ्या पदांवरती भरती होणार आहेत. उरलेल्या लाखो विद्यार्थ्यांचे काय? आणि यासाठी सरकारकडून कोणतीही धोरण निश्चिती नसल्यामुळे वर्षानुवर्ष विद्यार्थी या क्षेत्रात अडकून पडलेले आहेत, याचा आपण विचार करतो का? आणि हे सर्व होत असताना या क्षेत्रात उडी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा कोणी पाहत का?
वेळेवर न होणारी परीक्षा, वेळेवर न लागणारे निकाल, सततची ढकलणारी परीक्षा, परीक्षेमध्ये होणारे गोंधळ ,भ्रष्टाचार या सर्वांमुळे हे विद्यार्थी मानसिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या खचून गेलेले आहेत यापुढे कोणाचे लक्ष आहे का?
आपला पाल्य अभ्यास करतोय तो अधिकारी होणार या भाबड्या आशेवरती लाखो पालक बसलेले आहेत मात्र आपला पाल्य कोणत्या परिस्थितीत जगतोय? तो दोन वेळा पूर्ण जेवतोय का? त्याची मानसिक परिस्थिती कशी आहे याकडे कोणत्या पालकाचे लक्ष आहे का?
फक्त स्पर्धा परीक्षा हेच सर्वस्व नाही हे दाखवणार कोणी समोर येण्यास तयार नाही मात्र यथावकाश कहानी स्पर्धा परीक्षा वाल्यांची या मूवीच्या रूपाने दिग्दर्शक तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांनी स्पर्धा परीक्षार्थींची कहाणी जगासमोर मांडण्याचा हा केलेला वास्तव प्रयोग आणि याला मुख्य भूमिकेमध्ये जीवन आघाव व उपजिल्हाधिकारी सायली सोळंके , निलेश कुमार, sub Registar प्रतीक लांडे या स्पर्धा परीक्षार्थींनी साकारलेली आणि स्वतः जगलेली भूमिका यामुळे स्पर्धा परीक्षेतील खरे वास्तव समाजासमोर आणण्याचा हा यशस्वी प्रयोग निश्चित स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये एक नवी क्रांती घडवून आणेल. दिग्दर्शक तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांनी स्पर्धा परीक्षेतील हे खरे वास्तव मांडण्यासाठी केलेला हा अट्टाहास यथावकाश का होईना समाजासमोर आला आणि त्या यथावकाशला समाजामधून तसेच स्पर्धा परीक्षार्थी म्हणून मिळालेला उत्तुंग प्रतिसाद निश्चित विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये परिवर्तन घडवून आणेल यासाठी या यथावकाशच्या संपूर्ण टीमचा मनःपूर्वक आभार
संपूर्ण चित्रपट पाहण्यासाठी व
VDO Jar या ॲप्लिकेशन वरती जाऊ किंवा खालील लिंक वरती जाऊन हा चित्रपट मोफत पाहता येईल.
“यथावकाश” is now LIVE on VDOJar OTT.
आलो आम्ही आमची कहाणी सांगायला.. ऐका, बघा आणि सांगा कशी वाटते आमची कहाणी.. आवडली तर इतरांना पण सांगा आणि नाही आवडली तर आम्हाला सांगा पण नक्की बघा.. ही लिंक क्लिक करा: