MPSCमहाराष्ट्र

महाराष्ट्र निर्मितीचा रक्तरंजित इतिहास…

Bhushan Deshmukh:
संयुक्त महाराष्ट्र चळवळ

ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती.

होमरूल चळवळीने भाषावार प्रांतरचनेची मागणी उचलून धरली. लोकमान्य टिळक हे देखील भाषावर प्रांतरचनेच्या बाजूने होते.

१९२० रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचनेचा मुद्दा महात्मा गांधींनी मान्य केला होता.

१९२८ मध्ये नेहरू रिपोर्टमध्ये भाषावर प्रांत पुनर्रचनेची शिफारस.

काँग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला, विशेषतः नेहरुंना, संकुचित व राष्ट्रीय एकात्मकतेला धोका वाटू लागला. मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता.

आव्हान उचलले

१९४० मध्ये ग.त्र्यं. माडखोलकरांनी महाराष्ट्र एकीकरणाचा विषय उपस्थित केला. माडखोलकरांनी महाराष्ट्र समाजात व्यापार व उद्योग भूमिपुत्रांच्या ताब्यात नसल्याचं व महाराष्ट्राचे काँग्रेस पुढारी एकीकरणासाठी प्रयत्न करत नसल्याचे म्हटले.

इ. स. १९४६चे साहित्य संमेलन माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली झाले. या संमेलनात ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ स्थापन झाले व संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे तीन ठराव साहित्यकांनी पाठवले ज्याला राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला.

इ. स. १९४६ रोजी भरलेल्या महाराष्ट्र एकीकरण परिषदेत स.का.पाटील यांनी मुंबईला महाराष्ट्राची राजधानी करण्यास विरोध केला.

दार कमिशन

घटना समितीतील मसुदा समितीने भाषावार प्रांत आयोगाची स्थापना. न्यायमूर्ती एस. के. दार यांच्या अध्यक्षतेखाली केली. (1947)

सदस्य : श्री पन्नालाल व जगत नारायण लाल. अहवाल (1948)

– भाषावर प्रांतरचना राष्ट्रहिताची नाही

– हा प्रश्न तातडीने हाताळण्याची गरज नाही

– मुंबई वेगळी ठेवावी

या अहवालात महाराष्ट्रीय लोकांवर अपमानास्पद टिप्पणी होती.

या अहवालावर अखिल भारतीय काँग्रेसच्या जयपूर अधिवेशनात सर्वच नेत्यांनी टीका केली. तेव्हा पुढची समिती.

जे.व्ही.पी कमिटी

फेरविचार केला पाहिजे हे मान्य केले.

– मुंबई महाराष्ट्रात देण्यास विरोध केला. मुंबई अनेक भाषांच्या व वर्णाच्या लोकांचे, उद्योगधंद्याचे शहर आहे असे अहवालात म्हटले होते. वल्लभभाई पटेलांनी मुंबईचा विकास गुजराती भाषकांनी केल्याचे नमूद केले.

– वऱ्हाड-नागपूर भागातील लोक महाराष्ट्रात जायचे की नाही हे स्वतःच ठरवतील.

संघर्षाची नांदी

1946 मध्ये शंकरराव देव यांचे अध्यक्षतेखाली मुंबई येथे महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली. तिथे संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली. तिने 1946 ते 1955 पर्यंत कार्य केले.

महाराष्ट्रातील डाव्या पक्षांनी सुरुवातीपासूनच मुंबईसह महाराष्ट्राला पाठिंबा दिला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीतील एक घटक पक्ष होता.

२८ नोव्हेंबर १९४९ रोजी मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव आचार्य अत्रे व डॉ. आर.डी. भंडारे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’चा ठराव शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या (Scheduled Caste Federation) वतीने मांडला.

अकोला करार

8 ऑगस्ट 1947 विदर्भाचा नेत्यांच्या मनात एकीकरण बाबत विश्वास निर्माण व्हावा म्हणून

– संयुक्त महाराष्ट्र दोन भाग

वऱ्हाड व उर्वरित महाराष्ट्र

दोन्हीला स्वतंत्र कायदेमंडळ व मंत्रिमंडळ असावे. स्वतंत्र निवडणुका. स्वतंत्र उच्च न्यायालय.

नागपूर करार (28 सप्टेंबर 1953) अकोला करार रद्द करून त्याच्या ऐवजी संयुक्त महाराष्ट्रात येऊ पाहणाऱ्या विविध विभागांना समान दर्जा देणारा करार निर्माण करण्याची गरज.

– मुंबई, मध्य प्रदेश, हैदराबाद राज्यातील सर्व सलग मराठी भाषिक प्रदेशाचे राज्य बनावे. त्याची राजधानी मुंबई असेल.

– प्रत्येक घटकावर खर्च लोकसंख्येच्या प्रमाणात होईल. अविकसित मराठवाड्याकडे विशेष लक्ष दिले जाईल व त्याचा वार्षिक अहवाल असेल.

– उच्च न्यायालयाचे मुख्य केंद्र मुंबई व दुसरे स्थान नागपूर असेल.

– सरकारी नोकर भरतीत लोकसंख्येच्या प्रमाणात स्थान असेल

– नागपूरला दरवर्षी विधानसभेचे किमान एक अधिवेशन होईल.

– सर्व सलग मराठी प्रदेश नव्या राज्यात समाविष्ट होण्यासाठी खेडी हा घटक मानला जाईल.

नागपूर कराराला स.का.पाटील यांचा विरोध.

राज्य पुनर्रचना आयोग

आंध्रच्या निर्मितीनंतर न्यायमूर्ती फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य आयोग. सदस्य : हृदयनाथ कुंजरू व के. एन. पन्नीकर (१९५३)

संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने एस.एम.जोशी, धनंजय गाडगीळ व इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली. १९५५ रोजी आयोगाचा निवाडा जाहीर झाला.

पुनर्रचनेबाबत पायाभूत तत्त्व सगळ्यांना सारखी लागू केलेली नव्हती आणि त्यात मोठी विसंगती होती. हैद्राबादसाठी एक भाषिकाच तत्त्व तर

मुंबईसाठी द्वैभाषिकाचं.

मुंबई प्रांतात गुजराती भाषिक सौराष्ट्र समाविष्ट करून मराठी भाषिक विदर्भ, बेळगाव-कारवार बाहेर ठेवले गेले. मुंबईच्या विकासासाठी तिला गुजरातपासून वेगळे ठेवणे योग्य नाही व बेळगाव भाग कर्नाटकाशी ‘आर्थिकदृष्ट्या’ जोडला असल्याचे तसेच विदर्भ महाराष्ट्रात घातल्यास नागपूर शहराचे महत्त्व कमी होईल असे अहवालात नमूद करण्यात आले.

आयोगाला या द्वैभाषिकात मराठी भाषिकांची संख्या गुजराती भाषिकांपेक्षा जास्त होऊ द्यायची नव्हती असेच या विसंगतीचे कारण म्हणावे लागेल.

या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोषाचा डोंब उसळला.

त्रिराज्य योजना

नेहरूनी त्यामुळे सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशा त्रिराज्य योजना जाहीर केली.

त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठीजनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. 1955 त्रिराज्य योजने विरोधात सेनापती बापट यांनी प्रचंड मोठा मोर्चा विधानसभेवर काढला.

‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ हे या आंदोलनाचे घोषवाक्य बनलं.

चौपाटीवरील मुक्ताफळे

२० नोव्हेंबर १९५५ रोजी मोरारजी देसाई व स.का.पाटील या काँग्रेस नेत्यांनी चौपाटीवर सभा घेऊन प्रक्षोभक विधाने केली. पाटलांनी ‘पाच हजार वर्षांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. आकाशात चंद्र, तारे आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही.

मोरारजींनी ‘काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, गुंडगिरीला योग्य जबाब मिळेल’ अशी मुक्ताफळं उधळली. लोकांनी संतापून सभा उधळली.

अग्निपथ

२१ नोव्हेंबर इ. स. १९५५ रोजी झालेल्या आंदोलनावेळेस पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे १५ जणांना प्राण गमवावा लागला.

जाने-फेब्रु इ. स. १९५६ रोजी केंद्रशासित मुंबईची घोषणा केल्यानंतर लोक रस्त्यावर उतरली. हरताळ, सत्याग्रह व मोर्चे सुरू झाली. मोरारजीच्या सरकारने सत्तेचा दुरुपयोग करून निष्ठूरपणे ८० लोकांना गोळीबारात मारले. संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात एकूण १०५ जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या फ्लोरा फाउंटन भागात हुतात्मा स्मारक उभारले गेले.

संयुक्त महाराष्ट्र समितीने दिल्ली येथे प्रचंड सत्याग्रह घडवून आणला. चळवळीच्या काळात जनतेच्या असंतोषामुळे, नेहरुंना महाराष्ट्रात सुरक्षारक्षकांसोबत फिरावे लागे व त्यांचे स्वागत काळ्या झेंड्यांनी व निषेधानेच होई.

परिषद ते समिती

पुण्यात सर्व विरोधी पक्षांतर्फे संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष केशवराज जेधे. संयुक्त महाराष्ट्र परिषद बरखास्त झाली.

घोषणा “मुंबई, विदर्भ, मराठवाडा, बेळगाव, कारवार, निपाणीसह महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे”

स्त्रियांनी आंदोलनात हिरीरीने भाग घेतला. मोर्चे काढले व अटक करवून घेतली.

मावळे व कावळे
महाराष्ट्रीय काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर गुडघे टेकले. यामुळे काँग्रेस नेते जनतेच्या नजरेतून उतरले. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्याने तर नेहरु व संयुक्त महाराष्ट्रात,मला नेहरु महत्त्वाचे वाटतात असे म्हटले.

महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशालीस्ट व प्रजासमाजवादी पक्षातील डावे पुढारी व काँग्रेसेतरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला. सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब,आंबेडकर, एस.एम.जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख,भाई उद्धवराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले. एस.एम. जोशी, श्रीपाद डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले.

अत्र्यांनी आपल्या ‘मराठा’ या दैनिकात संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला तर विरोधकांवर बोचरी व कठोर टीका केली. त्यांच्या भाषणातून संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्याचा खरपूस समाचार घेतला.

शाहीर अमर शेख, शाहिर अण्णाभाऊ साठे, शाहिर गव्हाणकर ह्यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली.

रामशास्त्री बाणा

भारताचे अर्थमंत्री सी.डी देशमुखांनी महाराष्ट्रावरील होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ आपला राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे चळवळीला अधिक बळ मिळाले.

द्विभाषिक राज्य

१ नोव्हेंबर इ. स. १९५६ला केंद्राने सौराष्ट्र, गुजरात, मराठवाडा, विदर्भ व मुंबई ई लाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून (परंतु बेळगाव-कारवार वगळून) विशाल द्विभाषिक मुंबई राज्य स्थापले. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण.

परंतु या द्विभाषिकाचे महाराष्ट्र व गुजरात येथेही कडाडून विरोध झाला.

1957ची निवडणूक

महाराष्ट्रात काँग्रेस 136 समिती 128 पण गुजरातमध्ये काँग्रेस-99 महागुजरात परिषद 33

बहुमत काँग्रेसला मिळाले. चव्हाण दुसऱ्यांदा द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले.

प्रतापगडावर मोर्चा (नोव्हेंबर 1957) नेतृत्व माधवराव बागल. प्रचंड मोठा मोर्चा

काढून तीव्र भावना दाखवून दिल्या.

1959 सीमा लढा समितीने करबंदी चळवळ चालू केली.

या समितीने १९५७ सालची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. या सार्वत्रिक निवडणुकीत समितीला भरघोस यश मिळाले. त्यात बलाढ्य काँग्रेसच्या विरोधात निवडणुकीत या समितीला ३९८ जागांपैकी तब्बल १५५ जागांवर विजय मिळाला.

स्वाभाविकच ही समिती प्रमुख विरोधी पक्ष बनली. आणि डाॅ. आर.डी. भंडारे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्षनेते पदाचा मान भुषविला.

विजयाचे चौघडे

काँग्रेसचे नेतृत्व या सर्व प्रकारामुळे व १९६२ला होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले.

काँग्रेस अध्यक्ष इंदिरा गांधी यांनी यानंतर कळीची भूमिका निभावली. काँग्रेस वर्किंग कमिटी कडून विभाजनाचा ठराव पास करून घेतला.

संयुक्त महाराष्ट्राची किंमत

द्वैभाषिकाची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याने गुजरात राज्याला १० कोटी द्यायचे व पुढील ४ वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली. तसेच मुंबईचा विकास व उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली असा दावा गुजराती भाषिक करत होते व त्याचं ‘व्याज’ म्हणून एकूण ५० कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली.

अधुरे स्वप्न

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही.

बेळगावबाबतचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे.

मराठी पाऊल पडते पुढे

नेहरूंना राज्याला हवे असलेले ‘मुंबई’ नाव वगळून समितीने ‘महाराष्ट्र’असे नाव ठरवले व राज्याची स्थापना १९६० सालच्या कामगारदिनी म्हणजे १ मे १९६० रोजी झाली.

महाराष्ट्र स्थापनेचा कलश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे हस्ते दिल्लीहून आणला गेला.

नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर उपराजधानी निश्चित झाली.

16 Comments

  1. I just wanted to express my sincere appreciation for the incredible work you’re doing. Your content has been a game-changer for me, and I’m excited to see what more I can learn from your platform. Thank you for everything!

  2. This article was a fantastic read! I appreciate the depth of information and the clear, concise way it was presented. It’s evident that a lot of research and expertise went into crafting this post, and it really shines through in the quality of the content. I particularly found the first and last sections to be incredibly insightful. It sparked a few thoughts and questions I’d love to explore further. Could you elaborate more on next time? Also, if you have any recommended resources for further reading on this topic, I’d be grateful. Thanks for sharing your knowledge and contributing to a deeper understanding of this subject! I dedicated time to make a comment on this post immidiately after reading it, keep up the good work and i will be checking back again for more update. i appreciate the effort to write such a fantastic piece.

  3. Your work was remarkably enlightening! The thoroughness of the information and the riveting delivery enthralled me. The depth of research and proficiency evident throughout significantly heightens the content’s excellence. The insights in the introductory and concluding portions were particularly compelling, sparking new concepts and inquiries that I hope you’ll explore in future writings. If there are additional resources for further delving into this topic, I’d be eager to immerse myself in them. Gratitude for sharing your expertise and enriching our understanding of this subject. The exceptional quality of this piece compelled me to comment promptly after perusing. Continue the fantastic work—I’ll certainly return for more updates. Your dedication to crafting such an outstanding article is highly valued!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please turn off the ad blocker for site working smoothly