MPSC

MPSC आणि विक्रम-वेताळाची प्रश्‍नोत्तरे

🧮विक्रम-वेताळाची प्रश्‍नोत्तरे
तुम्हाला गोष्ट माहितीच असेल की एकदा राजा विक्रम मानगुटीवर घेऊन निघाला. पण हा बेरकी वेताळ स्मशानात राहणारा म्हणाला की मी काही प्रश्‍न विचारतो, जर तु त्यांची उत्तरे तुला माहीत असूनही दिली नाहीस तर तुझ्या मस्तकाचे तुकडे तुकडे होतील, व तुझ्या पायाशी पडतील व दिलीस तर मी पुन्हा झाडावर जाऊ न बसेन. मग विक्रमाने योग्य उत्तरे दिली. अशा हा प्रश्‍न विचाराणार्‍या वेताळाचे समाधान आजही करूया.

मुलींना संधी आहे का?
सरकारी सेवा ही मुलींसाठी खाजगी क्षेत्रापेक्षासुद्धा चांगली संधी आहे. कारण सुरक्षित काम, पुरेशा सुट्ट्या व बदलीसाठी भरपूर पर्याय मिळतात.

MPSC परिक्षेततर मुलींना 33% आरक्षण आहे. अजुनही पुरेशा संख्येने मुली बसत नसल्याने यशाची संधी जास्त आहे. इतर परिक्षांमध्ये मुलींसाठी वेगळे आरक्षण नसले तरी समान संधी नक्कीच आहे. सरकार हा सर्वोत्तम मालक समजला जातो. सर्वोत्तम कार्य स्थिती मिळते.

मराठी मुलांवर अन्याय होतो
स्पर्धा परिक्षांचे पारदर्शकरूप बघता कोणत्याही एखादया प्रांतांतील मुलांवर अन्याय होतो किंवा कोणावर कृपा केली जाते असे म्हणजे कठीण आहे. मागे काही रेल्वेच्या परिक्षांमध्ये परिक्षांची माहिती सर्वापर्यंत पुरेशा प्रमाणात व स्थनिक वृत्तपत्रातून पोहोचली नव्हती. पण तोही मुद्दा आता सोडवला गेला आहे. आता इंटरनेटच्या मदतीने सगळयाच माहितीपर्यंत पोहचता येतेच (कल्याणचे तरूण इंटरनेटच्या सहाय्याने ISIS पर्यंत पोहोचले, आपण सरकारी नोकर्‍यापर्यंत तर नक्कीच पोहोचू शकतो)

इतर प्रांतातील अधिकारी जो महाराष्ट्रात काम करताना दिसतात, तसेच मराठी मुलेही दुसर्‍या प्रांतात (परप्रांतात नाही) काम करत असतात. आपल्या देशाला घट्ट बांधून ठेवणारी ही व्यवस्था आहे. तेव्हा मराठी टक्का वाढवण्यासाठी प्रथम पुरेशा प्रमाणात मराठी मुलांनी या परिक्षांकडे वळले पाहिजे.

मराठीत संदर्भ साहित्य उपलब्ध नाही.
अशी स्थिती काही वर्षापूर्वीपर्यंत होती. पण आता नाही, आता मराठीत पुरेसे, भरपूर व दर्जेदार अभ्यास साहित्य उपलब्ध होते आहे.
अगदी विश्‍वकोशही (संकेतस्थळ🔍https://marathivishwakosh.org/ ) मराठीत उपलब्ध आहे. अर्थात काही चालु घडामोडीशी संबंधीत बाबी इंग्रजीतून वाचाव्या लागतात, पण ते काही फार कठीण नाही.


🚔पोलीस सेवेत जाण्यासाठी खुप चांगली शारीरिक क्षमता हवी.
हा एक सामान्य गैरसमज आहे.
पोलिस सब-इन्स्पेक्टर पदासाठी शारीरिक चाचणी असते. पण तुम्हाला पोलिस उपअधिक्षक PSI किंवा आय.पी.एस IPS बनायचे असेल तर अशी कुठली चाचणी नाही. फक्त बेताची उंची व चष्मा खुप जास्त नको अशा अटी आहे. चांगले शरीर कमावले तर मुलाखत घेणारे आपल्याला आ.पी.एस मध्ये टाकतील असे अनेकांना वाटते. किंवा आपण परकीय भाषा शिकलो तर आपला परराष्ट्र सेवेसाठी विचार केला जाईल असे काहींना वाटते. मात्र यातील काहीच खरे नाही.

मुख्य परिक्षा व मुलाखत INTERVIEW या दोघांची बेरीज करून रँक व उमेदवारांनी दिलेला अग्रक्रम यानुसार पदांचे वाटप होते. त्यामुळे आयोग देखील ठरवून एखादयाला एखादे विशिष्ट पद वाटू शकत नाही. उमेदवारांनाही सुरवातीला फक्त यश मिळाल्याचे कळते, पद कोणते मिळाले ते नंतर कळते.

पदवी परिक्षा पूर्वअट असल्याने पदवीनंतर अभ्यासाला सुरवात करू

Earlier you start, early you will reach. मोठया प्रवासाची सुरवात एक पावलाने होते. त्यामुळे जितक्या लवकर तयारी सुरवात करणार तितके चांगले. अजित जोशी जो आज हरियाणात जिल्हाधिकारी आहे त्याने शाळेत असतानाच स्पर्धापरिक्षांचा विचार सुरू केला होता. इतक्या आधीही सुरवात करता येते.
आता पदवीच्या आधी काय काम करायचे?

तर थोडा व्यापक दृष्टीकोन ठेवून व्यक्तिमत्त्व विकसनाकडे लक्ष दयायचे. एकतर पेपर वाचनाला सुरवात करायची. आजुबाजुच्या गोष्टींबद्दल सजग व्हायचे. त्याचबरोबर सर्व संधी घ्यायच्या जशा वर्क्तृत्व, निंबधलेखन, वादसभा, नाटके यात भाग घ्यायचा, ट्रेकींंग करायचे. टी. व्ही. वर बीग फाईट सारखे चांगले कार्यक्रम बघायचे. ग्रंथालयाचे सदस्यत्व घेऊन ग्रथांतून जग समजून घ्यायचे. आपले विचार लिहून बघायचा प्रयत्न करायचा. व्याख्यानमालांवर लक्ष ठेवून चांगले विषय असतील तर त्यांना हजेरी लावायची. सगळयाच गोष्टीत भरपूर रस घ्याचा.

या सर्व गोष्टी करायला पदवीपूर्व काळात वेळ असतो. कॉलेज फार वेळ नसतो व पदवीच्या अभ्यासाचे ओझेही पेलवण्याजोगे असते. पदवीनंतर या परीक्षांचा विचार केल्यावर स्पर्धेची मानसिकता व दृष्टीकोन विकसित व्हायला जो वेळ लागतो तो आधीच तयारी सुर केली तर वाचवता येतो.

प्रत्येक स्पर्धापरिक्षा वेगळी असल्याने त्यांचा वेगळा अभ्यास असतो.
आता बहुतेक स्पर्धापरिक्षांचे रूप सारखे होत चालले आहे. स्पर्धापरिक्षांचा मानसिकता व बरेचस विषय सारखेच असतात. त्यामुळे एकाचवेळी अनेक स्पर्धापरिक्षांची तयारी करता येते. फक्त प्रत्येकात जे वेगळे आहे त्याची वेगळी फाईल बनवायची व त्या परिक्षेच्या आधी त्या फायलीची उजळणी करायची.

भूषण देशमुख

2,397 Comments