MPSCBreaking News

MPSC OPTING OUT मध्ये उमेदवारांकडून घोडेबाजार सुरू, लाखो रुपयांची होतेय मागणी

OPTING OUT मध्ये विद्यार्थ्यांकडून घोडेबाजार सुरू

नुकताच गट ब मधील STI व ASO या पदांची निवडयादी जाहीर झाली, त्यासोबतच EXISE SUB INSPECTOT व TAX ASSISTANT या पदाच्याही निवडयादी जाहीर झाला.

मात्र हे होत असताना एकच विद्यार्थी दोन्हीही पदांवर निवड झालेले दिसत आहेत. काही विद्यार्थी 4-5 पोस्ट वर देखील निवड झालेले आहेत.
त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC ने OPTING OUT ची संधी विद्यार्थ्यांना दिली. त्यामुळे एका पेक्षा जास्त पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना एक पोस्ट ठेऊन बाकी पोस्ट opting out करता येणार आहेत. त्यानुसार STI 2020 च्या परीक्षेसाठी OPTING OUT ची संधी काल पर्यंत देण्यात आली होती. काही उमेदवारांनी OPTING OUT केले मात्र यातही काही विद्यार्थ्यांनी OPTING OUT न केल्याचे समजत आहे. यामागील कारणांचा आयोगाने शोध घेणे गरजेचे आहे.

काही उमेदवारांकडून अशी माहिती मिळाली की जे विद्यार्थी 2 POST वर SELECT झालेले आहेत ते CANDIDATE MERIT LIST मधील खालील विद्यार्थ्यांना OPTING OUT करण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करत आहेत. अर्थात ही माहिती मेरिट लिस्ट मध्ये waiting ला असणाऱ्या उमेदवारांनी तोंडी दिलेली माहिती आहे. परंतु हे प्रकार नाकारूही शकत नाही. दोन पदावर अंतिम निवडीसाठी असताना ही ते उमेदवार आयोगाने दिलेल्या मुदतीत OPTING OUT होत नाहीत..

दोन्ही पदावर निवड झालेले उमेदवार OPTING OUT होण्यासाठी लवकर निर्णय घेत नाहीत. त्याचे दुसरेही कारण त्यांना ज्या पोस्ट साठी नियुक्ती (joining) आधी येईल.तेथे जॉईन होऊन आर्थिक स्थिरता यावी, कारण जर बाकी जॉइनिंग काही कारणास्तव पुढे गेल्या तर अडचण नको, हे ही एक भावना असते. त्यामुळे आयोगाने अशा उमेदवारांनी कोणत्या तरी एकाच पदावर दावा करण्यासाठी एक ठराविक मुदत द्यावी. तसेच याबाबत काही ठोस भूमिका घेणे खूप आवश्यक आहे.

उमेदवारांना विविध पदे निवडण्याचा व ती पदे घेण्याचा घटनेने अधिकार दिला आहे.पण उमेदवारने गट ब पदी निवड होऊन गट क हे देखील पद घेणे यामुळे जागा रिक्त राहणार तसेच इतर उमेदवारास जी संधी भेटू शकते, ती देखील भेटू शकत नाही. जुन्या पॅटर्न मधील लागलेले निकालांची निवड यादी पुन्हा प्रसिद्ध करून त्यातील एकच पद निवडण्याची संधी उमेदवारांना देऊन पुढील उमेदवारांना सामावून घ्यावे जेणेकरून विद्यार्थ्यांवर अन्याय देखील होणार नाही आणि पदे रिक्तही राहणार नाहीत.

त्यानंतर जर निवड झालेल्या इतर सर्व पदांमधून OPTING OUT झालेला नसेल तर त्या उमेदवारांना कोणत्याही पदाची गरज नाही, असे समजून बाद करायला हवे. त्यामुळे नक्कीच अशा गैरप्रकारांनाही आळा बसेल आणि खालच्या उमेदवारांनाही संधी मिळेल..

अन्यथा उमेदवार प्रत्येक परीक्षेचे form भरून पोस्ट मिळवून Opting out साठी लाखो रुपयांची मागणी करतील आणि स्पर्धा परीक्षेच्या या बाजारात घोडेबाजार तेजीत सुरू होईल. या सर्व प्रकारातून कोणतेही चुकीचे काही गैरकृत्य घडू नये यासाठी माननीय आयोगाने MPSC ने यावर कठोर निर्बंध आणणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे संसदेच्या दोन मतदार संघातून निवडून येणाऱ्या उमेदवाराने एकाच मतदारसंघावर ठराविक कालावधीत दावा केला नाही.तर त्याचे दोन्ही पदे रद्द समजले जातात.. त्याप्रमाणे माननीय आयोगाने काहीतरी तजवीज करायला हवी.

For more  information join @vastav katta https://t.me/VastavKatta

2,140 Comments