Breaking NewsMPSC

खुशखबर.. जिल्हा परिषदेची विशेष भरती मोहीम ताबडतोब राबविण्यासाठी विभागीय आयुक्तांना आदेश

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अंदाजे 75 हजार सरळ सेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाचा मानस आहे. हे मागील 21. 10. 2022 व 15. 11. 2022 च्या शासन निर्णयानुसार जाहीर केले होते.

15. 11. 2022 च्या शासन निर्णयानुसार सरळ सेवेतील रिक्त पदांच्या 80 टक्के पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली होती. अंतिम निकाल व नियुक्त्या 1 मे ते 31 मे 2023 पर्यंत द्याव्यात असे नमूद केले होते. नुकताच राज्य शासनाने या परीक्षा टीसीएस TCS व आयबीपीएस IBPS या कंपन्यांनी घेण्यासाठी देखील शासन निर्णय GR काढला आहे.
यातून या परीक्षा निश्चितच पारदर्शक होतील या आशेने विद्यार्थी सुखावले असतानाच शासनाने दुसरा एक सुखद धक्का विद्यार्थ्यांना दिला आहे.

माननीय श्री राजेश कुमार (अप्पर मुख्य सचिव महाराष्ट्र शासन) यांनी माननीय श्री सौरभ राव (विभागीय आयुक्त पुणे विभाग) यांच्या नावे ग्रामविकास विभागाचे पत्र पाठवले आहे. त्यामध्ये नमूद केले आहे की सदर विशेष भरती मोहीम राबवण्याकरता आपल्या अखत्यारीतील जिल्हा परिषदे अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गाच्या (वाहनचालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) बिंदू नामावली विभागीय मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेणे.
व पंधरा दिवसांच्या आत अंतिम करण्यात यावी. तसेच यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून घेण्यात यावी. सदर भरती प्रक्रियेत आड येणाऱ्या संभाव्य सर्व अडचणींचा आढावा घ्यावा. त्याचे निराकरण करण्यात यावे. तसेच ही विशेष भरती मोहीम निर्दोशपणे व जाहीर वेळापत्रकानुसार होण्याकरिता आपण व्यक्तिशः लक्ष घालावे. व कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही जिल्हा परिषदेच्या कोणत्याही संवर्गाच्या भरती प्रक्रियेत विलंब होणार नाही याची काळजी घ्यावी.

याचाच अर्थ या परीक्षा दिलेल्या वेळापत्रकानुसार सुरळीत व पारदर्शक होण्यासाठी हे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनि अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे

जास्त माहितीसाठी वास्तव कट्ट्याच्या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा
https://t.me/VastavKatta

व You Tube चॅनेल ला SUBSCRIBE

https://youtube.com/@VastavKattaTheRealityPlatform

25 Comments

  1. Hello exceptional blog! Does running a blog like this take a large amount of
    work? I have absolutely no knowledge of coding but I had been hoping to start
    my own blog soon. Anyhow, if you have any ideas or techniques for new blog owners please share.
    I understand this is off subject nevertheless I just needed to ask.
    Kudos!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please turn off the ad blocker for site working smoothly