Breaking NewsMPSC

यामुळेच होतेय PSI मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ने STI विक्रीकर निरीक्षक, ASO मंत्रालय सहाय्यक, व टॅक्स असिस्टंट या पदांचा निकाल लावला. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन.

पुण्यामध्ये सदाशिव पेठ, नारायण पेठ, नवी पेठ, शनिवार पेठ, पुण्यातील इतर भागात फक्त गुलाल दिसत होता. फटाके वाजत होते, डीजे, हलगी आणि त्यावर ठेका धरणारे तरुणाई दिसत होती.

हीच परिस्थिती महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळाली.
STI ASO, टॅक्स असिस्टंट . पदांचा निकाल घोषित झाला. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.
बदलते MPSC चे स्वरूप पाहून सर्व विद्यार्थी नैराशेत गेले होते.
मात्र आजच्या निकालाने विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण केले.
हे सर्व होत असताना मात्र काही विद्यार्थ्यांवर अन्याय होताना पहावत नव्हते. गुणवत्ता आहे, मार्क्स आहेत मात्र माननीय आयोगाच्या म्हणा किंवा शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे काही विद्यार्थ्यांना बळी दिले जात आहे. आज STI, ASO, टॅक्स असिस्टंट चा निकाल लागला.
मात्र काही उमेदवार असे आहेत की जे तीनही पदांवर निवड झाले. त्यातही काही असे आहेत जे राज्यसेवेमधून निवड झालेले आहेत. काही असे आहेत जे PSI फिजिकल ची तयारी करत आहेत तर काही असे आहेत जे राज्यसेवा मुलाखतीला आहेत.
काही राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी पात्र झाले आहेत याचा अर्थ तेच तेच विद्यार्थी पुन्हा पुन्हा निवडले जात आहेत. नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे हे तर नक्कीच. त्या सर्वांचे अभिनंदन.

मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाचे की एकाच विद्यार्थ्याने वेगवेगळ्या पोस्ट घेतल्याने इतर विद्यार्थ्यांवरती अन्याय होत आहे. परंतु यामध्ये या निवड झालेल्या विद्यार्थ्यांची काहीही चूक नाही. यामध्ये परीक्षांचे व निकालांचे योग्य नियोजन असेल ऑप्टिंग आऊटची संधी योग्य वेळी असेल किंवा निकाल योग्य वेळेवर लावले तर कोणताही विद्यार्थी सम कक्षेतील परीक्षा पुन्हा पुन्हा देणार नाही. व वेगवेगळ्या पदावर निवडला जाणार नाही.

आता पीएसआय मुख्य परीक्षा 2022 पुढे ढकला किंवा पीएसआय 2020 व पीएसआय 2021 चे अंतिम निकाल या 2022 च्या मुख्य परीक्षेपूर्वी लावा असा सूर विद्यार्थ्यांमधून येत आहे. कारण 2020 व 2021 मधील परीक्षांमध्ये जवळपास 680 विद्यार्थी तेच तेच आहेत व हेच विद्यार्थी पीएसआय 2022 ला देखील असणार त्यामुळे एकच विद्यार्थी तीन वेळा निवड होण्याची जास्त शक्यता आहे.

खालील Common उमेदवारांची संख्या पाहिल्यावर यातील गांभीर्य लक्षात येईल..

Psi 2020 – psi 2021

680 common

PSI 2020 – STI 2021

114

Sti 2020 – sti 2021

34 common

Sti 2020 – aso 2020

26 common

Sti 2021 – aso 2021

78 common

Psi 2020 – excise

31 common

Psi 2021 – sti 2021

212 common

Psi 2021 – aso 2021

44 common

त्यामुळे MPSC ने विद्यार्थ्यांवर होणार अन्याय थांबविण्यासाठी एक तर सर्व निकाल हे होणाऱ्या परीक्षापूर्वी लावावेत किंवा 2022 ची मुख्य परीक्षा ही पुढे ढकलावी अन्यथा आजच्या निकालाची पुनरावृत्ती होऊन विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाईल

1,936 Comments