MPSC परिक्षार्थींनो तयारीला लागा, जानेवारीत
MPSC परिक्षार्थींनो तयारीला लागा, जानेवारीत येणार नवीन जाहिरात….
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ने राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये बदल केले. त्यापाठोपाठ लगेचच संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क एकत्र केल्या. अभ्यासक्रमात बदल केल्याने विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी वाटत होती. त्यामुळे PSI, STI, ASO च्या जाहिरातीमध्ये जागा वाढविण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती.
जागा वाढविण्यासाठी मा. आमदार अभिमन्यू पवार साहेब Abhimanyu Pawar यांनी उपमुख्यमंत्री Devendra Fadanvis व संबंधित खात्याशी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले, राज्यसेवेच्या जागा वाढल्या. मात्र PSI व STI च्या जागा वाढण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते आणि काल दिनांक 21 नोव्हेंबर रोजी MPSC ला मिळालेल्या माग्नीपत्रानुसार MPSC ने सुधारित जाहिरात प्रसिध्द केली. त्यामध्ये STI 16 व ASO 7 अशी वाढ करून ती 823 पदांची करण्यात आली.
PSI च्या जागा मात्र वाढल्या नाहीत त्यामुळे विद्यार्थी नाराज झाले. मात्र हे सर्व पाहून मा. आमदार अभिमन्यू पवार यांनी विद्यार्थ्यांना ट्विट करून एक आशेचा किरण दाखवला आहे.
त्यांनी केलेले ट्विट खालीलप्रमाणे..
“महाराष्ट्र दुय्यम सेवा (गट ब ) २०२२ करिता PSI व STI पदांच्या संख्येत वाढ करावी अशी परीक्षार्थींनी मागणी केली होती. सदरील मागणीसंदर्भात मी मा उपमुख्यमंत्री तसेच
संबंधित दोन्ही विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याकडे पाठपुरावा केला होता, त्यानुसार संबंधित विभागांनी रिक्तपदांचा पुनर्आढावा घेऊन मला दिलेली माहिती खालीलप्रमाणे:
PSI: PSI च्या रिक्त पदांचा पुनर्आढावा घेण्यात आला. त्यानुसार वाढीव मागणीपत्र पाठवण्यासाठी पदे शिल्लक नाहीत. वस्तुतः सध्याच्या ६०३ पदांची मागणी देखील २०२३ मध्ये सेवानिवृत्तीनंतर रिक्त होणाऱ्या पदांचा समावेश करूनच करण्यातआली आहे.
STI : माहिती अधिकारात रिक्त पदांची संख्या ८०० च्या आसपास दिसत असली तरी यापैकी बहुतांश जागांसाठी मागणी पत्र MPSC कडे यापूर्वीच्या परीक्षांसाठी (२०२० व २०२१) पाठवण्यात आले असून त्यावर भरतीप्रक्रिया चालू आहे. त्यामुळे या संवर्गाच्या वाढीव मागणी पत्रासाठी अपेक्षेप्रमाणे रिक्त पदे उपलब्ध नाहीत. तरीही असतील त्या सर्व जागा वाढविण्यात येतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी काल मला दिली आहे.
शिवाय जानेवारी २०२३ मध्ये सदर पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन असल्याने परीक्षार्थींनी नाराज होऊ नये. मी सर्वच विभागांच्या रिक्त जागा वाढाव्यात/जाहीरात निघावी यासाठी प्रयत्न करतच आहे, आपण अभ्यास चालू ठेवावा.”