MPSCBreaking News

खुशखबर.. आता MPSC च्या कक्षेबाहेरील परीक्षा IBPS व TCS घेणार

आता सर्व परीक्षा IBPS, TCS मार्फत होणार हे ऐकून स्पर्धा परीक्षा विश्वात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे आता अभ्यास करणारे विद्यार्थ्यांना न्याय मिळणार

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब (अराजपत्रित), गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया TCS-ION टीसीएस-आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व IBPS आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) या कंपनीमार्फत राबवण्यासाठी आज महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जाहीर केलेला आहे. या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. या कंपन्यांचे परीक्षा घेण्यासाठी दर परीक्षांची विविध कार्यपद्धती व इतर अटी शर्ती 17 नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात आल्या होत्या आणि त्यानुसार त्या मान्य देखील करण्यात आलेल्या आहेत.

या कंपन्यांसोबत केलेल्या करारामध्ये परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणे व सर्व परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी स्पर्धा परीक्षेचे अर्ज स्वीकारणे त्यांची छाननी करणे, परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने स्वीकारणे, अर्जावर योग्य ती प्रक्रिया करून ऑनलाईन प्रवेश पत्र तयार करणे, ऑनलाईन परीक्षेचा निकाल तसेच शिफारस झालेल्या व न झालेल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करणे याची जबाबदारी या कंपन्यांकडे असणार आहे.

परीक्षा या पारदर्शकपणे होण्यासाठी सीसीटीव्ही cctv प्रणाली द्वारे चित्रीकरण, मोबाईल जामर, बायोमेट्रिक उपस्थिती, आयरिस स्कॅन, उमेदवारांचे फ्रिस्किग केले जाणार आहे.
तसेच सप्टेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 या वर्षांमध्ये पदभरती प्रक्रिया तातडीने राबवण्याचा कार्यक्रम देखील तात्काळ आखला जाणार आहे. या कंपन्या परीक्षा घेत असताना त्यांचे परीक्षा शुल्क हे या शासन निर्णयांमध्ये जाहीर करण्यात आलेले आहे त्यातील टीसीएस कंपनीचे परीक्षा दरपत्रक खालील प्रमाणे

आयबीपीएस कंपनीचे परीक्षा दरपत्रक खालील प्रमाणे

TCS कंपनी चे दरपत्र 3 वर्षासाठी लागू असतील तर IBPS चे बदलायचे असल्यास वित्त विभागाची परवानगी लागेल.

IBPS चे दरपत्र

भविष्यात पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा अतिशय महत्वाचा निर्णय ठरणार आहे.

1,466 Comments