Breaking Newsदेश-विदेश

इमरान खानच नाही तर ‘या’ पंतप्रधानांवरही झालेत पाकिस्तानमध्ये जीवघेणे हल्ले

इमरान खानच नाही तर ‘या’ पंतप्रधानांवरही झालेत पाकिस्तानमध्ये जीवघेणे हल्ले

3 नोव्हेंबर ला पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर रॅलीमध्ये जीवघेणा हल्ला झाला.  इस्लामाबादला जाण्यापूर्वी गुजरांवाला येथे रॅलीमध्ये इम्रान खान यांच्यावर गोळीबार करण्यात आला.  आणि त्यात इमरान खान यांच्या पायाला गोळी लागली.  या हल्ल्यात इम्रान खान सह एकूण 9 जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला.

पाकिस्तानच पंतप्रधान पद भूषवलेल्या व्यक्तींवर या प्रकारचा हल्ला होणारे इमरान खान हे चौथे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत.

तर या आधी पाकिस्तानच्या कोणकोणत्या राजकीय नेत्यांवर आणि कधी जीवघेने हल्ले झालेत ते जाणून घेऊयात.

पाकिस्तानात राजकीय हत्या होण्यामध्ये पहिलं नाव आहे ते लियाकत अली खान यांच.  पाकिस्तान 1947 ला स्वातंत्र्य झाला, आणि पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान झाले लियाकत अली खान.  1951 मध्ये लियाकत अली खान यांच्यावर रॅलीमध्ये जीवघेणा झाला होता आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

राजकीय हल्ल्यामधील दुसरा नाव आहे ते झुल्फिकार अली भुट्टो यांचं.  झुल्फिकार अली भुट्टो अली यांनी 1971 ते 1973 या कालखंडात पाकिस्तानचे चौथे पंतप्रधान म्हणून तर 1973 ते 1977 या कालखंडात पाकिस्तानचे 9वे पंतप्रधान म्हणून सत्तेवर होते.  तर पाकिस्तान पीपल्स पार्टी या पाकिस्तानातील राजकीय पक्षांचे ते संस्थापकही होते.
पुढे 1977 मध्ये पाकिस्तान वर जनरल जिया उलहक यांचे लष्करी सरकार सत्तेत आल.  तेव्हा झुल्फिकार अली भुट्टो यांना खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.  एप्रिल 1979 मध्ये पाकिस्तानातील रावळपिंडी येथे जुल्फिकार अली भुट्टो यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.
तर राजकीय हत्यांमध्ये पाकिस्तानातील तिसरं नाव आहे ते बनिझिर भुट्टो यांचं.

2007 मध्ये पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि झुल्फिकार अली भुट्टो यांच्या कन्या बेनिझिर भुट्टो यांच्यावरही रॅलीमध्ये गोळीबार करण्यात आला आणि त्यामध्ये बेनिझीर भुट्टो यांचा मृत्यू झाला.
1988 ते 1990 आणि 1993 ते 1996 या कालखंडा दरम्यान बेनिझिर भुट्टो या दोन वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी होत्या.

आणि यामध्ये चौथं नाव आहे नुकताच पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर गुजरांवाला येथील गोळीबार. इमरान खान यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात येते. इमरान खान यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले त्यांच्या पायाच्या हाडात गोळी लागली आणि ती ऑपरेशन द्वारे काढली जाईल.
तर इमरान खान हे पीटीआय चे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे 22वे पंतप्रधान होते. इमरान खान यांचा कार्यकाळ पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून तीन वर्षे सात महिने इतका राहिलेला आहे.

 

6 Comments

  1. Generally I don’t learn post on blogs, but I would like to say
    that this write-up very forced me to take a look at and do it!

    Your writing style has been surprised me. Thank you,
    quite nice post.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please turn off the ad blocker for site working smoothly