महिला पत्रकाराच्या केलेल्या अपमानाबद्दल संभाजी भिडेंना महिला आयोगाकडून नोटीस
महिला पत्रकाराच्या केलेल्या अपमानाबद्दल संभाजी भिडेंना महिला आयोगाकडून नोटीस
‘प्रत्येक स्त्री ही भारत मातेचे रूप आहे आणि भारत माता विधवा नाहीये म्हणून तू आधी कुंकू लाव मगचं मी तुझ्याशी बोलेल’ असे वादग्रस्त विधान संभाजी भिडे Sambhaji Bhide यांनी एका महिला पत्रकाराला महिला पत्रकाराला उद्देशून केलं.
महिला पत्रकारच नाही तर देशातील प्रत्येक स्त्रीने टिकली किंवा कुंकू लावावं की नाही हा त्यांचा वयक्तिक अधिकार आहे.
मग अस असताना संभाजी भिडे हे, महिलेला टिकली लावा असं कसं म्हणू शकतात?, त्यामुळे भिडे गुरुजींवर सामाजिक आणि राजकीय स्तरातून टीका होत आहे.
संभाजी भिडे यांनी केलेल्या या वक्तव्याची दखल आता राज्य महिला आयोगाने सुद्धा घेतली आहे.
राज्य महिला आयोगाकडून संभाजी भिडे यांना आपल्या भूमिकेचा तात्काळ खुलासा करण्याची नोटीस पाठवण्यात आली.
या सर्व प्रकरणावर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. रूपाली चाकणकर म्हणाल्या, तू टिकली लावली नाही म्हणून मी तुझ्याशी बोलणार नाही असं म्हणत त्या महिलेचाच नाही तर पत्रकारितेचाही अपमान संभाजी भिडे यांनी केला आहे. एक महिला पत्रकार शिक्षण घेऊन तिथेपर्यंत पोहचली आहे. टिकलीवरून महिलेची पात्रता आणि पद ठरवणे चुकीचं आहे.
याआधीही महिलांना हीन समजणारी आणि तुच्छता दर्शक वक्तव्य त्यांनी वारंवार केली आहेत. त्यांची मनोवृत्ती यातून दिसून येत असल्याचं रूपाली चाकणकर यांनी म्हटले. इतकंच नाही तर संभाजी भिडेंना आत्मचिंतनाची गरज आहे. टिकली ही महिलेच्या कर्तुत्वाचे मोजमाप नाही. महिला आयोगाच्या वतीने मी याचा निषेध व्यक्त करते आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा असेही मत रुपाली चाकणकर Rupali Chakankar यांनी व्यक्त केले.