Breaking NewsMPSC

पोलीस भरती बाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय

  1. पोलीस भरती बाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय

कोरोनामुळे स्थगित झालेल्या पोलीस भरती बाबत शासनाने एक मोठा निर्णय दिला आहे. या शासन निर्णयामध्ये पोलिस भरतीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत आणि कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे त्यांची पोलिस भरती झाली नाही आणि त्यामुळे वयोमर्यादेतून बाहेर पडले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी शासनाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

निर्णय असा आहे की,
जे विद्यार्थी 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान वयोमर्यादेतून बाहेर पडले आहेत त्यांना 2020 व 2021 मधील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये एक संधी दिली जाणार आहे.

खरेतर शासनाने पोलिस भरतीची घोषणा केली आणि लगेचच प्रशासकीय करण देत त्या भरतीला स्थगिती दिली मात्र त्या स्थगिती मुळे अनेक विद्यार्थी नाराज झाले होते.
मात्र आजच्या शासन निर्णयाने पोलिस भरती स्थगित करण्यामागील सरकार चा उद्देश समो आला. आणि निश्चितच वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.

वयवाढ संदर्भात शासनाचे नवीन GR…

पोलीस भरती वयवाढ बाबत GR –
1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2022 यादरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या सर्व प्रवर्गातील उमेदवारांना एक संधी मिळणार….

SRPF वयवाढ बाबत GR –
1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2022 यादरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या सर्व प्रवर्गातील उमेदवारांना एक संधी मिळणार….

33 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button