MPSCBreaking News

लिपिक पदांची भरती एमपीएससी मार्फत; साडेतीन वर्षांपासूनच्या मागणीला अखेर यश

लिपिक पदांची भरती एमपीएससी मार्फत; साडेतीन वर्षांपासूनच्या मागणीला अखेर यश

मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
आज सामान्य प्रशासन विभागाने एक महत्त्वाचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. तो म्हणजे गट ‘क’मधील लिपिक वर्गीय पद सरळ सेवा म्हणजेच एमपीएससी मार्फत भरण्यात येणार आहेत.

केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर सगळीच पद एमपीएससी द्वारे भरण्यात यावी आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता यावी या मागणीसाठी मागील साडेतीन वर्षांपासून पाठपुरवठा सुरू होता आणि अखेर साडेतीन वर्षांनी या मागणीला यश आलं आहे. उमेदवारांची ही मागणी लक्षात घेत मागच्या साडेतीन वर्षांपासून पाठपुरावा सुरू असलेल्या मागणीला शिंदे सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेत त्याला अंतिम शासकीय मान्यता मिळवून दिली. त्यामुळे आता येणाऱ्या काळात होणाऱ्या सगळ्याच परीक्षा एमपीएससीच्या कक्षेत येतील.

गट ‘क’ संवर्गातील सर्वच पदांची भरती लोकसेवा आयोगा मार्फत करण्याचा शासनाचा निर्णय स्पर्धा परीक्षांच्या आणि आयोगाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरणारा असून, या निर्णयामुळे हुशार, गरजू आणि होतकरू उमेदवारांना पारदर्शक पद्धतीने शासन सेवेत काम करण्याची संधी उपलब्ध होईल.असे मत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी व्यक्त केले.

लिपिक आणि टंकलेखक या पदांसाठी अशी होणार भरती –
१. मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून प्राप्त झालेल्या मागणी पत्रानुसार राज्य लोकसेवा आयोगाकडून लिपिक आणि टंकलेखक या पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येईल.

२. परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे उमेदवारांची शिफारस यादी उमेदवारांच्या पसंती क्रमांकावर नियुक्ती प्राधिकरण निहाय प्रसिद्ध करेल.

३. नंतर ही यादी संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडे पाठवण्यात येईल.

४. आणि महत्त्वाचं म्हणजे लिपिक वर्गीय पद आयोगाच्या कक्षेत आली असली तरीही या पदांसाठी पूर्वी लागू असलेला आरक्षण आणि सोयी सवलती यापुढेही लागू असतील.

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please turn off the ad blocker for site working smoothly