Breaking News

‘हा’ आहे महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा, जिथे फक्त महिलाराज

‘हा’ आहे महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा, जिथे फक्त महिलाराज

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री आणि पुरुष यांना आपल्या राज्यघटनेत समानता प्रदान केली आहे. पण but ही समानता प्रत्यक्षात उतरण्यासाठी स्वातंत्र्याची 75 वर्षे उलटावी लागली. त्याचाच प्रत्यय आता केवळ स्त्रियांना स्त्रियांचे हक्कच नाही, शिक्षणात समानता आणि पदावरही समानता मिळू लागली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून महिलांसाठी 50 टक्के आरक्षण आहे. मात्र काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचे फक्त नाव असते आणि कारभार मात्र पुरुष करतात. आता मात्र तसे नाही. प्रशासकीय पदावर विराजमान असणाऱ्या महिला स्वतःचा अधिकार आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेऊ शकतात हे आता सिद्ध झाल आहे ते परभणी जिल्ह्यातील महिलाराज मुळे.

परभणी जिल्ह्यात राज्यकारभार आणि प्रशासकीय पदांवर महिलांचं वर्चस्व आहे. परभणी जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर म्हणजेच एसपी, कलेक्टर, सत्र न्यायाधीश इतकच नाही तर राज्यसभा खासदार आणि आमदार या महत्त्वाच्या पदांची धुरा आता महिलांकडे आहे.

राज्यसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार खासदारांपैकी एक खासदार या परभणीतील फौजिया खान आहेत.

आमदार या भाजपच्या मेघना बोर्डीकर आहेत.

परभणीच्या जिल्हाधिकारी Collector आंचल गोयल आहेत , तर पोलीस अधीक्षक या आर रागसुधा आहेत.

परभणी जिल्हा मुख्य न्यायाधीश म्हणून यु एम नंदेश्वर तर, मुख्य कार्यकारी आणि प्रकल्प संचालक म्हणून रश्मी खांडेकर या कारभार पाहतात.

उपजिल्हाधिकारी Deputy collector पदाचा कारभार स्वाती दाभाडे यांच्याकडे आहे.

उपजिल्हाधिकारी सेलू इथला कारभार संगेवार यांच्याकडे आहे.

परभणी महानगरपालिकेच्या आयुक्त तृप्ती सांडभोर आहेत तर समाज कल्याण अधिकारी गीता गुट्टे आहेत.

परभणीतील शिक्षणाधिकारी म्हणजेच BEO पदाची धुरा आशा गरुड यांच्याकडे आहे तर जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून मंजुषा मुथा या कारभार पाहतात.

तसंच परभणी जिल्हा मत्स्य अधिकारी म्हणून अश्विनी पाटील तर जिल्हा दुग्ध विकास अधिकारी म्हणून मुंडे यांच्या जबाबदारी आहे.

इतकंच नाही तर ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचा कारभार श्वेता यादव यांच्याकडे आहे तर डेप्युटी आरटीओचा deputy RTO कारभार अश्विनी स्वामी यांच्याकडे आहे.

परभणी जिल्हा हा महाराष्ट्रातील एकमेव असा जिल्हा आहे जिथे सगळ्याच प्रशासकीय आणि राजकीय पदांवर महिलांचे सध्या वर्चस्व आहे.

तर परभणी जिल्ह्याकडे आता समाजासाठी स्त्री पुरुष समानतेच एक उत्तम उदाहरण म्हणून पाहिलं जाऊ शकतं. आणि समान संधी दिल्यावर महिला कोणतीही जबाबदारी पार पाडू शकतात असा संदेश ही दिला जातोय.

Vastav Katta

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please turn off the ad blocker for site working smoothly