विद्यालय कसे असावे ?

प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की” विद्यालय कसे असेल” म्हणजे यांना नक्की काय म्हणायचंय…. विद्यालय तर सगळी सारखीच असतात की? एक इमारत, प्रार्थनेसाठी व खेळासाठी छोटेशे मैदान, शिकविणारे शिक्षक आणि शिकणारे विद्यार्थी … झाले की विद्यालय…
होय हीच संकल्पना असते, मात्र फक्त याच गोष्टी पुरेशा असतात का? आजच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना आपल्या पाल्ल्याकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे? शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान कुठे आहे? सावलीसाठी किंवा शुद्ध प्राणवायूसाठी झाडे कुठे आहेत?
या सर्व उणिवा जाणवत असताना मात्र पुण्यामधील पाषाण येथे कामानिमित्त गेलो असता एका शाळेमध्ये जाण्याचा योग आला आणि आश्चर्याचा धक्काच बसला त्याच कारण असे की ती शाळा अक्षरशः निसर्गाच्या कुशीत बसलेली आणि तीही पुण्यासारख्या शहरात.. भले मोठे खेळाचे मैदान, वेगवेगळ्या खेळांचे प्रशिक्षण देण्याची सुविधा, रनिंग ट्रॅक, सुसज्ज आणि अत्याधुनिक समग्रीसह भलीमोठी इमारत पाहून त्या शाळेविषयी जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. ती शाळा म्हणजे पुणे शहरातील पाषाण भागात असलेली लोकसेवा e – स्कूल आणि जूनियर कॉलेज, पुणे.
जेव्हा शाळेमधील काही शिक्षकांशी चर्चा केली तेव्हा भारावून जाणारी माहिती समोर आली जसे की, शाळेमध्ये मुलांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक प्रगतीवर विशेष भर दिला जातो. लोकसेवा शाळेमधील भरपूर मुलांनी जिल्हा स्तरावर तसेच विविध खेळामध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे. आजच्या आधुनिक युगानुसार शाळेमध्ये Robotics, अत्याधुनिक कम्प्युटर लॅब त्याचसोबत संगीत ,गायनाचे वर्ग, नृत्य वर्ग, क्रिकेट, बास्केट बॉल, खोखो, तायकांडो, फुटबॉल, झूमर स्पोर्ट, सायन्स इ. सुविधा विद्यालय मध्ये उपलब्ध आहेत. या शाळेची खास विशेषता म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात शाळेची भव्य दिव्य इमारत व मुलांच्या शारीरिक विकासासाठी खेळनुसार सर्व प्रकारची क्रीडांगण शाळेमध्ये उपलब्ध आहेत.
या सर्व गोष्टींची माहिती मिळाल्यानंतर आपल्याला अशी शाळा का भेटली नाही किंवा या शाळेसारख्या इतर बाकी शाळा का बनू शकत नाही या विचाराने मनामध्ये काहूर उठले..
आज या सिमेंटच्या जंगलामध्ये अशा शाळेमध्ये शिकण्याचे भाग्य खूप कमी विद्यार्थ्यांना लाभते..!