MPSCचालू घडामोडीट्रेण्डिंगदेश-विदेशवास्तव

LGBTIQ समूहातील ‘Q’ म्हणजे काय?

‘क्वेअर’ नक्की काय आहे?

चित्रपट क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा ऑस्कर सोहळा सोमवारी ‘लॉस एंजलिस’ मधील

‘डॉल्बी थेटर’ मध्ये पार पडला.

यामध्ये इतिहासात पहिल्यांदाच ‘LGBTIQ’ समूहातील महिलेला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

जगातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या स्पीलबर्गच्या वेस्टसाइड स्टोरीच्या रिमेकमध्ये

‘अनिता’ नावाचं पात्र साकारणाऱ्या ‘एरियाना डिबोस’ हिला हा ऑस्कर पुरस्कार मिळालाय.

‘वेस्ट साईट स्टोरी’ हा सिनेमा १९६१ साली प्रदर्शित झाला होता.

या पहिल्या चित्रपटात सहाय्यक भूमिकेसाठी अभिनेत्री ‘रिटा मरेनो’ हिला देखील

अनिताच्या भूमिकेसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.

२०२१ मध्ये ‘स्टीव्हन स्पीलबर्ग’ यांनी वेस्टसाइड स्टोरी सिनेमाचा रिमेक बनवला.

यात पुन्हा एकदा अनिताच्या भूमिकेसाठी ‘एरियाना डिबोस’ ला ऑस्कर मिळाला.

विशेष बाब म्हणजे ‘रिटा मोरेनो’ ही ऑस्कर मिळवणारी पहिली ‘लॅटिन’ अभिनेत्री होती.

तर दुसरी लॅटिन अभिनेत्री एरियाना डिबोस ठरली आहे.

एरियाना स्वतःची ओळख ‘क्वेअर’ म्हणून करून देते.

मग हे ‘क्वेअर’ नक्की काय आहे? आणि LBGTIQ हा समूह नेमका काय आहे?

याबद्दल जाणून घेऊया.

लैंगिकतेच्या बाराखडीत सुरुवातीला दोनच अक्षर होती.

किंवा आपल्याला ती दोनच अक्षरे माहीत होती.

एक म्हणजे एफ आणि दुसरा म्हणजे एम म्हणजे, फीमेल आणि मेल. ( MALE AND FEMALE )

आता मेल ला फिमेल बद्दल आकर्षण वाटणं किंवा फिमेल ला मेल बद्दल आकर्षण वाटणं

हे आपल्यासाठी काही नवीन नाही.

पण आता या फिमेल च्या एफ आणि मेल च्या व्यतिरिक्त देखील काही अक्षरांची यात भर पडली.

ती अक्षर म्हणजे LGBTIQ .

‘एल’ म्हणजे लेस्बियन. (LESBIAN)

एखाद्या स्त्रीला दुसऱ्या स्त्रीबद्दल प्रेम ,आकर्षण किंवा भावनिक ओढ असण.

‘जी’ म्हणजे गे. (GAY)

एखाद्या पुरुषाला दुसऱ्या पुरुषाबद्दल आकर्षण किंवा प्रेम वाटणं.

‘बी’ म्हणजे बायसेक्शुअल.

म्हणजे अशा व्यक्तीला मेल बद्दल देखील आणि फिमेल बद्दल देखील प्रेम वाटतं.

‘टी’ म्हणजे ट्रान्सजेंडर. ( TRANSGENDER )

जन्माच्या वेळी एखाद्या बाळाला पुरुषाचे अवयव असतात त्यामुळे त्याला पुरुष म्हटलं जातं.

मग हळू वयात येत असताना त्या व्यक्तीला वाटू लागतं की आपण स्त्री आहोत.

तर अशा व्यक्तीला ‘ट्रान्सवुमन’ ( TRANSWOMEN )असं म्हटलं जातं आणि

या उलट जर एखाद्या स्त्रीला वयात येताना असं वाटलं की आपण पुरुष आहोत

तर तिला ‘ट्रान्समॅन’ अस आपण म्हणू शकतो.

आय म्हणजे ‘इंटर सेक्स.’ ( INTERSEX )

ट्रान्सजेंडर चा एक भाग म्हणजे ‘इंटर सेक्स.’

इंटर सेक्स म्हणजे अशी व्यक्ती जिची लैंगिकता जन्माच्या वेळी ठरवता येत नाही.

त्यामुळे ती स्त्री आहे की पुरुष हे ठरवता येईल हे सांगता येत नाही.

कारण त्यांचे लैंगिक अवयव विकसित झालेले नसतात.

अशी व्यक्ती पुढे जाऊन मेल फिमेल ट्रान्सजेंडर यापैकी कोणतीही ओळख स्वीकारू शकते.

आणि या ‘LGBTI’ या संपूर्ण समूहाला ‘क्वेअर’  ( QUEER ) म्हंटल जात.

दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि वास्तवकट्ट्याला सबस्क्राइब करा.

हेही वाचा-

https://www.vastavkatta.com/index.php/2022/04/23/russain-agent-alena-branson/