गुढीपाडवा का साजरा करतात? महत्व आणि इतिहास

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा मुहूर्त म्हणजे ‘गुढीपाडवा.’
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच वसंत ऋतुच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो.
त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा किंवा कोणत्याही कामाचा आरंभ करायचा असेल तर हा शुभमुहूर्त मानला जातो.
वर्षारंभाचा सुद्धा दिवस असल्यामुळे खगोलीय गणितानुसार देखील या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
आता हा दिवस साजरा करण्यामागचं उत्तर दडलंय ते म्हणजे ‘शालिवाहन’ राजवटीमध्ये.
शालिवाहन राजाने शकाची सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजे ‘गुढीपाडवा.’
शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाच महत्त्व आहे.
या दिवशी पंचांग वाचन करून आणि सरस्वती देवीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे.
गुढीपाडवा साजरा करण्याच अजून एक कारण महाभारतामध्ये देखील सापडतं.
प्राचीन काळामध्ये वसू नावाचा राजा चेदी या देशात राज्य करत होता.
त्याच्या कारकीर्दीमध्ये सर्व प्रचार सुखी-समाधानी होती.
परंतु नंतर त्या राजानं वैराग्य धारण केलं आणि घोर तपश्चर्या करण्यासाठी अरण्याचा मार्ग निवडला.
त्याच्या या तपश्चर्येमुळे देवांचा राजा इंद्र अतिशय प्रभावी झाला.
प्रभावित होऊन इंद्राने राजाला वैजयंतीमाला विमान आणि एक वेळूची काठी दिली.
आपल्या राज्यात परत जाऊन राज्य कारभार करण्याची आज्ञा दिली.
वसूने इंद्रदेवाची आज्ञा मानून वेळूच्या काठीला सजवून मोठ्या भक्तीने त्या काठीची पूजा केली
आणि राजप्रासादाच्या प्रवेशद्वारापाशी काठी लावून ठेवली.
तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा .
आणि या प्रसंगाची आठवण म्हणून गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो.
नैसर्गिक महत्व:- ( NATURAL IMPORTANCE )
गुढीपाडवा साजरा करण्यामागे पौराणिक, धार्मिक, सांस्कृतिक असे अनेक संदर्भ सापडत असले तरी,
हा सण आज देखील तितक्याच उत्साहात साजरा केला जातो.
या सणाला नैसर्गिकदृष्ट्या देखील खूप महत्त्व आहे.
तसं पाहायला गेलं तर सण साजरा करण्यामागे पूर्वजांचे काही उद्देश असतात.
चैत्र महिन्यापासून वसंत ऋतुच्या आगमनाला सुरुवात होते.
वातावरणात बदल झालेले असतात.
जुनी सुकलेली पाने गळून पडतात. झाडांना नवीन पालवी फुटते.
आंब्याला मोहर येतो. याचं प्रतीक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जाते.
या नैसर्गिक बदलाचं स्वागत करण्याची पद्धत म्हणून गुढी पाडवा साजरा केला जातो.
प्राचीन काळापासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात.
यामुळे आपल्या शरीराला फायदा होतो.
पित्ताचा नाश होतो. त्वचा रोग बरे होतात.
गुढीपाडवा साजरा करण्याचे असे अनेक फायदे आपल्याला आहेत.
दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
अशाच माहितीसाठी वास्तवकट्ट्याला सबस्क्राइब करा.
Hypertension and other peripheral artery diseases damage these small vessels over time, allowing fewer nutrients and less oxygen to reach the sex organs coupons for cialis 20 mg Expandable megakaryocyte MK lines are established from iPSCs by the transduction of specified sets of genes
It may be prudent to examine blood ammonia in patients in whom the onset of hypothermia or encephalopathy has been reported see CLINICAL PHARMACOLOGY generic cialis no prescription Surgery, PTRA, and Stenting
Self report measures is there a generic viagra