
मित्रांनो आपण आत्ता बघतोय की अनेक टीव्ही चॅनेल्सना न्युज अँकर किंवा न्युज रिडर्स या बऱ्यापैकी महिला आहेत.
१५ सप्टेंबर १९५९ रोजी दिल्लीत सुरू झालेलं टिलीव्हीजन कुठल्या कुठं जाऊन पोहोचलंय हे आपण बघतोय.
या ऐतिहासिक दिवसानंतर अनेक गोष्टी बदलल्या, माध्यमांचा दृष्टीकोन बदलला.
१९६० मध्ये ओबीएन ( OBN ) च्या मदतीशिवाय पहिल्यांदा स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा झाला.
स्टुडिओची सगळी व्यवस्था पंतप्रधानांच्या भाषणाच्या ठिकाणी नेण्यात आली.
१९६१ मध्ये भारतातील पहिली शालेय टीव्ही प्रसारण सेवा २४ ऑक्टोबर रोजी भारतात सुरू झाली.
१५ ऑगस्ट १९६५ रोजी दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या आकाशवाणी ची सुरुवात इमारतीच्या स्टुडिओच्या सभागृहात झाली.
आणि प्रतिमा पुरी या भारताच्या पहिल्या टीव्ही उद्घोषक ठरल्या.
https://www.youtube.com/watch?v=-2STPfYqkW0
हिमाचल प्रदेशातील शिमलामध्ये एका गोरखा कुटुंबात जन्माला आलेली प्रतिमा पुरीने दूरदर्शनच्या पडद्यावर आपलं नाव कोरलं.
स्त्रियांना चूल आणि मूल एवढच बघावं लागत होतं तेव्हा प्रतिमा आपल्या सुरेल आणि भारदस्त आवाजात बातम्या सांगायच्या.
त्यांनी अनेक वर्ष दूरदर्शन मध्ये काम केलं.
ज्यांना न्युज रीडर ( NEWS READER ) बनायचय त्यांच्यासाठी प्रशिक्षण देण्याची सुरुवात त्यांनी केली.
इतकच नाही तर अनेक महान व्यक्तींच्या मुलाखती घेण्यासाठी त्या ओळखल्या जातात.
अंतराळात जाणारा पहिला व्यक्ती ‘युरी गागारीन’ ची ही त्यांनी मुलाखत घेतली होती.
१९६६ मध्ये कृषिदर्शन सारख्या कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानं भारतीय दूरचित्रवाणी गावागावात पोहोचली.
दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश इथं गावकऱ्यांनी जवळपास ८० दूरदर्शन क्लब स्थापन केले.
दररोज चा पाच मिनिटाचा प्रसारण कालावधी १९६८ मध्ये दोन तासांवर आणला गेला.
सलमान सुलतान आल्यावर देखील प्रतिमा पुरी दूरदर्शनसाठी काम करत होत्या. त्यानंतर त्यांचं काम बदललं गेलं.
हळूहळू दूरदर्शन चा विस्तार झाला.
१९७५ च्या सुमारास काळ बराच बदलला होता. दिल्लीस बरोबरच इतर अनेक शहरांमध्ये टेलिव्हिजन ची सुरुवात झाली होती.
मात्र सर्विस प्रोव्हायडर ( SERVICE PROVIDER )हा एकच दूरदर्शन होता
दूरदर्शन चा विस्तार झाल्यामुळे न्यूज रीडर्सची गरज निर्माण झाली
दूरदर्शन साठी नेमण्यात येणाऱ्या अँकर्सला ट्रेनिंग देण्याची जबाबदारी प्रतिमा पुरी यांना देण्यात आली.
यांचा मृत्यू २९ जुलै २००७ मध्ये झाला. मात्र अजूनही अनेक अँकर्ससाठी त्या प्रेरणास्त्रोत आहेत.
भारतातील पहिल्या महिला न्युज रीडर चा मान मिळवणाऱ्या आणि आपल्या भरदस्त आवाजाच्या जोरावर माध्यमविश्वात नाव कोरणाऱ्या,
प्रतिमा पुरी यांच्याबद्दल आम्ही दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि
अशाच माहितीसाठी वास्तवकट्टा या युट्युब चॅनेलला सबस्क्राइब करा.
UID_22300253###
test
UID_67047504###
test
UID_99048383###
test