यशस्वी उद्योजकवास्तवव्यवसाय

वयाच्या ६२ व्या वर्षी सुरू केला व्यवसाय आणि आज जगभर ओळख

कर्नल सँडर्स’ या ६२ वर्षीय तरुणाची यशोगाथा 

सर्वसाधारणपणे आपण पाहतो की, वयाची साठी एकदा पार केली की माणसाची जगण्याची इच्छा हळूहळू कमी होत जाते.

आता काय माझं वय झालंय, आता काय जमणार आहे मला?

फक्त उरलेलं आयुष्य बोनस समजून आला दिवस ढकलायचा, असा विचार करणारी बरीच मंडळी आपल्याला सापडतील.

पण जगात अशी पण लोकं आहेत जी साठाव्या वर्षी सुद्धा सोळा वर्षाच्या तरुण मुलाइतकी उत्साही असतात.

वाढणाऱ्या वयापुढं, कमी झालेल्या शक्तीपुढ आणि वयानुसार जडलेल्या शारीरिक व्याधींनपुढ हार न मानता उत्साहानं आयुष्य जगतात.

सामान्य माणसाला तरुण असताना सुद्धा बिझनेस ( BUISNESS ) करून रिस्क घेण्याची भीती वाटते.

पण हे उत्साहाचे झरे मात्र सर्वांना प्रेरणा मिळेल असं काम करतात.

https://www.vastavkatta.com/index.php/2022/03/11/information-about-naac/

अशाच एका साठी पार केलेल्या म्हाताऱ्याने ६२ व्या वर्षी नव्या व्यवसायाची सुरुवात केली.

आणि बघताबघता जगभरातील चिकन प्रेमी लोकांची चिकन खाण्याची पद्धतच बदलून टाकली.

हा नवा व्यवसाय म्हणजे सर्वांच्या परिचयाची प्रसिद्ध ‘केएफसी चिकन रेस्टॉरंट चेन.’ ( KFC CHICKEN RESTUARANT CHAIN )

आयुष्यात जेव्हा खचल्यासारखं वाटेल किंवा मनात असे प्रश्न येतील की आपलं वय वाढलंय.

आता आपण काहीच करू शकत नाही.

तेव्हा एकच लक्षात ठेवा की ‘कर्नल सँडर्स’ यांनी त्यांचा बिजनेस वयाच्या ६२ व्या वर्षी सुरू केला.

नंतर तो इतका वाढवला की, केएफसी ही जगातील सर्वात मोठ्या फूड चैन पैकी एक म्हणून ओळखली जाते.

लहान वयातच त्यांचे वडील मरण पावले.

घरची परिस्थिती हलाखीची होती.

परिस्थितीमुळे वयाच्या केवळ सातव्या वर्षी स्वयंपाक करायला ते शिकले.

टायर विकणे, फेरी बोट चालवणे, रेल्वेचे वाफेचे इंजिन चालवणे अशी कामं त्यांनी सुरुवातीला केली.

वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांना केंतूकी मधल्या कार्बीण इथं एका सर्विस स्टेशनवर कुकिंगचं काम करण्याची संधी मिळाली.

त्यांचे पदार्थलोकांना इतके आवडले की हळूहळू त्या सर्विस स्टेशनचं हॉटेलमध्ये रुपांतर झालं.

ते त्यांच्या चिकन रेसिपी वर सारखे प्रयोग करायचे १९३९ साली त्यांनी त्यांच्या फेमस चिकनची रेसिपी शोधून काढली.

त्यांना त्यावेळी म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही.

त्यांची डील स्पष्ट होती की चिकन खाऊन बघा आवडलं तर तुमच्या हॉटेलमध्ये ते विका.

पण त्यांची ही रेसिपी एक नाही दोन नाही तर तब्बल १००९ वेळा रिजेक्ट केली गेली. पण त्यांनी हार मानली नाही.

वन मोअर टाइम ( One more time ) म्हणत ते जिद्दीने पुढे सरकत राहिले आणि शेवटी यश मिळालं.

पहिला होकार मिळाला.

एका हॉटेल मालकानं सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सेंडर्स ने त्यांच्याशी पार्टनरशिप केली.

त्यांनी त्यांच्या स्पेशल चिकनला ‘केंतूकी फ्राइड चिकन’ ( Kentucky Fried Chicken ) असं नाव दिलं.

बघता बघता १९६४ पर्यंत अमेरिकेतील ६०० पेक्षा जास्त हॉटेलमध्ये केएफसी विकल जाऊ लागलं.

लोकांमध्ये इतक फेमस झालं की केंतुकीच्या राज्यपालांनी १९५० साली त्यांना ‘कर्नल’ ही पदवी बहाल केली.  (Colonel degree )

केएफसी आता जगप्रसिद्ध झालय आणि त्यावर आणखी मेहनत घेऊन काम करण्याची गरज आहे अस जेव्हा त्यांच्या लक्षात आलं,

तेव्हा त्यांना १९६५ साली त्यांच्या कंपनीचे हक्क 2 मिलियन डॉलरला  ( 2 MILLIION DOLLER ) विकले.

ब्रँड अँबेसिडर म्हणून ते कायम राहिले आणि त्यासाठी त्यांना आयुष्यभर ७५,००० डॉलर मिळतील असा करार झाला.

त्यांच कॅनडामधील ( CANADA ) रेस्टॉरंट मात्र त्यांनी स्वतःच्या मालकीचे ठेवले.

आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करताना सुरूवातीला अपयश मिळेल पण ,

कर्नल सँडर्स यांनी त्यांच्या मनाचा कौल ऐकला आणि त्यांना त्यांचा मार्ग सापडला.

तुम्ही विचार करा कदाचित तुम्हालाही तुमचा मार्ग सापडेल.

https://www.youtube.com/watch?v=Kn3_26M2vm0

17,120 Comments