राजकीयवास्तव

कसा झाला एक कॉमेडीयन पंजाबचा मुख्यमंत्री?

पंजाबचे नवीन मुख्यमंत्री आम आदमी पक्षाचे भगवंत मान यांनी कॉमेडीयन ते लोकप्रिय राजकारणी असा यशस्वी प्रवास केला आहे.

मान यांनी धुरी मतदारसंघात काँग्रेसचे आमदार दलबीरसिंग गोल्डी यांना तब्बल ३८ हजार मताधिक्याने पराभूत केलंय.

भगवंत मान यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९७३ रोजी पंजाब मधील संगरूर जिल्ह्यातील सतोज गावात झाला.

त्यांनी संग्रुरच्या शहीद उधमसिंग कॉलेजमधून बी.कॉम. केलंय.

मान यांनी २००८ मध्ये ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ मध्ये सहभाग घेतला.

आणि त्यांना देशभरात ओळख मिळाली.

‘मै मा पंजाब दी’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पंजाबी सिनेमातही त्यांनी काम केले.

भगवंत मान यांना क्रीडा क्षेत्राचीही आवड आहे.

त्यांना एनबीए, क्रिकेट, हॉकी आणि फुटबॉल मॅच पाहायला आवडतं.

ते जगभरातील खेळाडूंना फॉलो करतात.

तसंच त्यांच्याबाबत त्यांना भरपूर माहितीही असते.

कधी-कधी रात्री अलार्म लावून झोपतात आणि रात्री 2-3 वाजता उठून ते मॅच पाहतात.

भगवंत मान यांनी जवळपास सर्व वर्गमित्र आणि इतर मित्रांना विमान प्रवास घडवला आहे.

मंजित सिद्धू सांगतात की, ते जेव्हाही पंजाबच्या बाहेर शो करण्यासाठी जातात, तेव्हा एखाद्या मित्राला सोबत फिरण्यासाठी घेऊन जातात.

मोबाईल नंबर तोंडपाठ असणं, हाही त्यांचा एक खास गुण आहे.

आपल्या देशातच नाही तर परदेशात देखील त्यांनी कॉमेडी शो केले आहेत.

https://www.vastavkatta.com/index.php/2022/03/16/the-kashmir-files-review/

२००६ मध्ये त्यांनी कॅनडा आणि इंग्लंड मध्ये ‘नो लाइफ वुईथ लाइफ’ ( no life with life ) या शो चे अनेक एपिसोड केले आणि या शो मुळे ते प्रसिद्धीस आले.

त्यांचा सगळ्यात जास्त व्हायरल झालेला व्हिडीओ हा ‘लाफ्टर चॅलेंज’ ( LAUGHTER CHALLENGE SHOW ) शो दरम्यानचा आहे.

तेव्हा त्या शो चे जज नवज्योत सिंह सिद्धू होते आणि भगवंत मान हे एक कंटेस्टंट म्हणून गेले होते.

मात्र आत्ताच चित्र बरंच वेगळं आहे.

भगवंत मान आता पंजाबच्या मुख्यमंत्री पदी आहेत.

२०११ मध्ये मान यांनी मनप्रीत सिंग बादल यांच्या पंजाब पीपल पक्षात प्रवेश केला.

२०१२ मध्ये विधानसभा मतदारसंघातून ते लढले.

मात्र त्या वेळी त्यांचा पराभव झाला.

त्यानंतर मनप्रित काँग्रेसमध्ये गेले आणि २०१४ मध्ये त्यांनी आप मध्ये प्रवेश केला.

संग्रुर लोकसभा मतदारसंघातून ते आपकडून लढले आणि दोन लाखांहून अधिक मतांनी त्यांनी दणदणीत विजय मिळवला.

२०१७ मध्ये मान यांना जलालाबाद लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागला.

२०१९ मध्ये संग्रुर मधून ते दुसऱ्यांदा विजयी झाले.

आणि आत्ताच्या निवडणुकीत देखील ते लाखो मतांसह निवडून आले आहेत.

कॉमेडीयन ते लोकप्रिय राजकारणी हा त्यांचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा आणि वास्तवकट्टा युट्युब चॅनेल ला सबस्क्राइब करायला विसरू नका.

https://www.youtube.com/watch?v=eZvqcb3n-Oo