Breaking NewsMPSCवास्तव

रशिया- युक्रेन वाॅर : ‘व्हॅक्युम बाॅम्ब’ म्‍हणजे काय?

जगातील बलाढ्य देशांपैकी एक मानल्या जाणाऱ्या रशियानं गेल्या गुरुवारी युक्रेन वर हल्ला केलायं.
रशियाचे राजदूत ओक्साना मार्कोवा यांनी असा दावा केलाय की युद्धाच्या पाचव्या दिवशी रशियानं युक्रेनवर बंदी असलेल्या ‘थर्मोबॅरीक’ शस्त्राचा वापर केलाय.
अत्यंत धोकादायक समजला जाणारा हा बॉम्ब नक्की काय आहे? याबद्दल जाणून घेऊयात.
व्हॅक्युम बाॅम्ब’ म्‍हणजे काय ? ( what is a vacuum bomb? )
‘व्हॅक्युम बाॅम्ब’ किंवा ‘थर्मोबॅरिक व्हेपन्स’ ( thermobaric weapons ) ही शस्त्रं तापमानाचा अतिउच्च स्फोट घडवून आणण्यासाठी हवेतील ऑक्सिजन शोषून घेते.
या शस्त्रांचा स्फोट इतका भयानक असतो की, जास्त काळापर्यंत त्याचा परिणाम राहतो.
इतकंच नाही तर, मानवी शरीराची वाफ करण्याची ताकद या शस्त्रांमध्ये असते.
थर्मोबॅरीक शस्त्र म्हणजेच ‘व्हॅक्युम बॉम्ब’ हा प्रचंड भयानक असून तो ३०० मीटर परिघामध्ये प्रचंड नुकसान करतो.
विमानातून तो फायर केला जातो आणि हवेच्या मध्यावर त्याचा स्फोट होतो.
स्फोटानंतर तिथल्या हवेतला ऑक्सिजन ( oxygen )शोषून घेतला जातो आणि त्यातून प्रचंड ऊर्जा निर्माण होते.
 वातावरणातल्या ऑक्सिजन द्वारे भीषण स्फोट होऊन परिसरात प्रचंड मानवी संव्हार केला जातो.
 यामुळे पर्यावरणाला सुद्धा मोठा धोका निर्माण होतो.
या बॉम्बचं वजन साधारण ७१०० किलो इतकं असतं.
याच्या स्फोटामुळे ‘अल्ट्रासॉनिक वेव्हज’ ( ultrasonic waves ) बाहेर पडतात.
७१०० किलो वजनाचा हा बॉम्ब वापरल्यावर वाटेतल्या इमारती आणि माणसांचा नाश होतो.
यालाच ‘एरोसोल बॉम्ब’ ( Aerosol bomb ) असे देखील म्हणतात.
४४ टीएनटीच्या ( TNT ) सामर्थ्याने त्याचा स्फोट होऊ शकतो असं पोर्ट्समाऊथ युनिव्हर्सिटीचे ( portsmouth university )’पीटर ली’ यांनी सांगितल आहे.
मात्र या स्फोटातून रेडिएशन्स ( Radiations ) निर्माण होत नाहीत.
जगातील सर्वात घातक आण्विक शस्त्रांमध्ये या व्हॅक्युम बॉम्बची गणना केली जाते.
हा बॉम्ब २००७ मध्ये रशियानं निर्माण केला होता.
२०१६ मध्ये सिरियावर आक्रमण करताना या बॉम्बचा वापर रशियान केला होता.
अमेरिकेने २००३ मध्ये ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ ( Mother Of All Bomb ) तयार केला होता. ज्याचं नाव GBU 4 3 /B अस आहे.
तो अकरा टीएनटी ( trinitrotoluene ) च्या शक्तीने स्फोट करू शकतो.
तर रशियन बॉम्ब ४४ टीएनटी या शक्तीने स्फोट करण्यास सक्षम आहे.
अमेरीकेने तयार केलेल्या ‘मदर ऑफ ऑल बॉम्बला’ प्रत्युत्तर म्हणून रशियान ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ ( Father Of All Bomb ) म्हणजेच ‘व्हॅक्युम बॉम्ब’ तयार केला होता.
जिनिव्हा करारानुसार बंदी असलेल्या या बॉम्बचा वापर केल्याचा दावा युक्रेनन केल्यानं आता हे युद्ध अजूनच चिघळल्याच चित्र दिसतंय.

5 Comments

  1. No, we do not provide counseling buying cialis online Increased echogenicity of the kidney parenchyma results from the increased presence of material that can reflect sound waves back, thus increasing its brightness on the ultrasonography image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please turn off the ad blocker for site working smoothly