MPSCवास्तव

आयपीएल लिलावातील महत्त्वाचे नियम आणि संकल्पना जाणून घ्या

गेले दोन दिवस झालं आयपीएल चा लिलाव सुरू आहे. या लिलावाच स्वरूप नेमकं कस असतं?, याचे नियम काय असतात? अनसोल्ड खेळाडू कुणाला म्हणायचं?, बेस पर्स म्हणजे नेमकं काय? अशा अनेक गोष्टींची सविस्तर माहिती देणारा हा लेख.

आयपीएल चा लिलाव म्हणजे काय आणि हा लिलाव कसा होतो?

कोणता खेळाडू कोणत्या संघात खेळणार हे या लिलावाद्वारे ठरत. या खुल्या लिलावात सर्व संघ सहभागी होतात. ज्या खेळाडूंना खरेदी करायचयं त्यांच्यावर बोली लावतात. बीसीसीआयला(BCCI) यादी पाठवताना एखाद्या संघानं खेळाडूंमध्ये रुची दाखवली नाही तरी लिलावाच्या वेळी त्या खेळाडूंवर बोली लावू शकतो. लिलावात सर्व संघ तयारीनिशी येतात. जे खेळाडू उपलब्ध आहेत त्यांची यादी संघाकडे असते. त्यांना स्वतःकडे खेचण्यासाठी रणनीती आखली जाते. एखादा खेळाडू स्वतःकडे घ्यायला नाही जमलं तर मग आपल्या योजनेतील बाकीचे खेळाडूला खरेदी करतात.

बेस प्राईस(base price) म्हणजे काय आणि ही कशी ठरवतात?

बेसप्राईस म्हणजे आधारभूत किंमत. खेळाडू स्वतःची किंमत निश्चित करून तो बीसीसीआई कडे देतो. बेस प्राईस सोबत आपल्या बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे. राष्ट्रीय संघातील खेळाडू आणि विदेशी खेळाडूंची बेस प्राईस अधिक असते. याच्या तुलनेत अनकॅप्ड आणि चर्चेत नसलेल्यांची बेस प्राइस कमी असते. बेस प्राईस निश्चित करताना आधीची कामगिरी, लोकप्रियता, सोशल मीडियावरील चाहते या गोष्टी लक्षात घेतल्या जातात.

या लिलावातील काही महत्त्वाचे नियम:-

सर्वाधिक बोली लावणारा संघ खेळाडूंना स्वतःच्या संघात घेतो. खेळाडूला त्याच्या बेस प्राईस पेक्षा कमी किमतीत खरेदी करता येत नाही. खेळाडू स्वतःचे बेसप्राईस स्वतः ठरवतात. अनसोल्ड खेळाडूवर पुन्हा बोली लागू शकते .सिझनदरम्यान त्याची खरेदी शक्य असते. प्रत्येक लिलावात खेळाडू संख्या वेगळी असते. २०२२ साठी ही संख्या ५९० होती. प्रत्येक संघाला खरेदीसाठी समान पर्स दिली जाते. २०२२ साठी ९० कोटी इतकी पर्स होती. या पर्समधील काही खेळाडू रिटेन केले जातात. उर्वरित रक्कम लिलावात खर्च केली जाते . राईट टू मॅचद्वारे एखादा संघ रिलीज खेळाडूला पुन्हा खरेदी करू शकतो.

खेळाडूंना बोलीनुसार रक्कम मिळते का?

एखादा खेळाडू पाच कोटीत तीन वर्षांसाठी खरेदी झाला असेल तर त्याला दर वर्षी पाच कोटी रुपये मिळतात. खेळाडू संपूर्ण सीझनसाठी उपलब्ध असेल तो कितीही सामने खेळला तरी त्याला रक्कम मिळते. सामने सुरू होण्याआधीच खेळाडू जखमी होऊन बाहेर पडला तर त्याला संघ पैसे देत नाही. खेळाडू काहीच सामने खेळला तर त्याला दहा टक्के रिटेन्शनशिप फीसह पैसे दिले जातात. एखादा संघ लीगदरम्यान खेळाडूला रिलीज करण्यास इच्छुक असेल तर खेळाडूला संपूर्ण सीझनचे पैसे मोजावे लागतात. खेळाडू सामन्यादरम्यान जखमी झाला तर संघ त्याचा संपूर्ण वैद्यकीय खर्च उचलतो.

टीम पर्स(team purse) म्हणजे काय?

टीम पर्स म्हणजे संघाकडून लिलावात खेळाडू खरेदी करण्यासाठी होणारा खर्च. ही रक्कम खेळाडू रिटेन करणे आणि नंतर लिलावात अन्य खेळाडूंच्या खरेदीसाठी वापरली जाते. लिलावात निष्पक्षपणा आणण्यासाठी सर्व संघांसाठी रक्कम समान असते. २०२२ च्या लिलावात प्रत्येक संघाकडे ९० कोटींची पर्स होती.

अनसोल्ड खेळाडू म्हणजे काय?

लिलावात ज्या खेळाडूंवर बोली लागली नाही असा खेळाडू म्हणजे अनसोल्ड.(unsold) एखादा खेळाडू संपूर्ण लिलाव प्रक्रियेदरम्यान विकला गेला नसेल तर त्याचे नाव अखेरच्या टप्प्यात पुढे केले जाते. त्यासाठी संघांनी पुढाकार घेणे गरजेचे असते. ही प्रक्रिया वेगवान असते. एखादा खेळाडू जखमी असेल किंवा तो खेळण्यास उपलब्ध नसेल तर त्याच्या जागी अनसोल्ड खेळाडूंची वर्णी लागू शकते. स्पर्धेदरम्यान देखील हे शक्य आहे.

6 Comments

  1. Summary Young people aged 21 35 were less likely to notice mistakes when under the influence of alcohol while performing challenging computer tasks and were less likely to care where to buy cialis Squat as deep as you can and aim for this as an ideal

  2. The results of various studies placebo controlled and comparisons with nonsteroidal anti inflammatory drugs in patients with rheumatic diseases suggest that oral therapy with proteolytic enzymes produces certain analgesic and anti inflammatory effects emla cream and priligy tablets Breast density is not determined by how a breast looks or feels but rather by the appearance on mammography

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please turn off the ad blocker for site working smoothly