MPSC

नवीन अर्थसंकल्पातील डिजीटल विद्यापीठ म्हणजे काय?

गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली जगत असताना ऑनलाइन शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. आणि अशातच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केलाय. यामध्ये शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. डिजिटल विद्यापीठं उभारण्यावर सरकार भर देण्यार येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आता या डिजिटल विद्यापीठाचं स्वरूप कसं असणार आहे??आणि याचा विद्यार्थ्यांना कसा आणि काय फायदा होणार आहे?? या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा हा लेख आहे.

डिजिटल विद्यापीठ म्हणजे काय?

डिजिटल विद्यापीठ म्हणजे थोडक्यात ज्यामध्ये अभ्यासक्रम आणि पदवी शिक्षण पूर्णपणे ऑनलाईन असणारे. यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे शिक्षण घेता येणार आहे. देशातील आघाडीच्या विद्यापीठांना डिजिटल विद्यापीठात जोडण्याची योजना आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एकाच व्यासपीठाद्वारे अनेक उच्च विद्यापिठांमधून अभ्यासक्रम करण्याची संधी मिळणार आहे. डिजिटल युनिव्हर्सिटी मुळे विद्यार्थ्याना कोणत्याही शहरात न जाता त्या शहरातील अव्वल विद्यापीठात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.

आता प्रश्न असा आहे की देशात आधीच अस्तित्वात असलेल्या इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी किंवा सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटी यांसारख्या दूरस्थ शिक्षणाची सुविधा देणाऱ्या संस्था आणि डिजिटल विद्यापीठांमध्ये काय फरक आहे??

वास्तविक डिस्टन्स लर्निंग किंवा दूरस्थ शिक्षण देणाऱ्या संस्था ऑनलाइन वर्ग चालवत नाहीत. त्याऐवजी ते संबंधित अभ्यासक्रमाचे अभ्यास साहित्य विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोस्टाद्वारे पाठवतात. त्याच बरोबर डिजिटल लर्निंग(digital learning) किंवा डिजिटल युनिव्हर्सिटी मधून विद्यार्थी घरी बसून ऑनलाइन अभ्यास करू शकतील . डिजिटल विद्यापीठ हे हब अँड स्पोक मॉडेल वर आधारित असणार आहे.

हब अँड स्पोक मॉडेल (hub and spoke model) म्हणजे काय?

सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही एक संदेश म्हणजेच हब तयार केले आणि नंतर ते ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम यासारख्या वेगवेगळ्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर स्पोक म्हणजे शेअर करणार.

देशातलं पहिलं डिजिटल विद्यापीठ फेब्रुवारी 2021 मध्ये केरळ मध्ये सुरू करण्यात आलं. केरळमधील टेक्नोसिटीमध्ये (technocity)या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. हे विद्यापीठ सायन्स, इलेक्ट्रॉनिक आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, ब्लॉकचेन, सायबर सिक्युरिटी,डेटा ऍनॅलिटिक्स(data analytics) यासह इतर उद्योग आधारित अभ्यासक्रम उपलब्ध करते. राजस्थानमधील जोधपूर येथे देशातील दुसरे डिजिटल विद्यापीठ स्थापन होत आहे. जोधपुर डिजिटल युनिव्हर्सिटी 30 एकरच्या परिसरात सुमारे चारशे कोटी रुपये खर्च करून बांधली जात आहे.अमेरिकेचं जॉन हॉपकिन्स विद्यापीठ, ब्रिटनचं मँचेस्टर विद्यापीठ ,आस्ट्रेलियाचं सिडनी विद्यापीठ ही जगातील सर्वात मोठी आणि नावाजलेली डिजिटल विद्यापीठं आहेत.

8 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button