वास्तवBreaking NewsMPSC

भारतीय लष्कर दिन का साजरा केला जातो??

भारतीय लष्कर दिन का साजरा केला जातो??

ब्रिटिश राजवटीत १ एप्रिल १८९५ रोजी भारतीय सैन्याची अधिकृतपणे स्थापना झाली. या सैन्याचे प्रमुख असलेले पहिले भारतीय लेफ्टनंट जनरल के. एम. करिअप्पा होते. फिल्ड मार्शल कोडंदेरा एम. करिअप्पा यांनी जनरल फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला. त्यांची या पदावर १५ जानेवारी १९४९ रोजी नियुक्ती करण्यात आली. यावेळी पहिल्यांदाच भारतीय सैनिकाने देशाच्या सशस्त्र दलाची सत्ता हाती घेतली होती. त्यामुळे १५ जानेवारी हा दिवस भारतीय लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो.

लष्कर दिनाचे स्वरूप:-

हा दिवस राजधानी नवी दिल्लीत तसेच सर्व मुख्यालयात परेड आणि इतर लष्करी शोच्या स्वरूपात साजरा केला जातो. देशभरात हा उत्सव मोठ्या अभिमानाने साजरा होत असताना मुख्य आर्मी-डे-परेड दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील करिअप्पा परेड मैदानावर आयोजित केली जाते. या दिवशी शौर्य पुरस्कार आणि सेना पदकेही दिली जातात. २०२० मध्ये १५सैनिकांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. परमवीर चक्र आणि अशोक चक्र पुरस्कार विजेते दरवर्षी आर्मी डे परेडमध्ये सहभागी होतात. या परेडमध्ये असंख्य तुकडींचे आणि लढाऊ प्रदर्शन केले जाते. २०२० मध्ये कॅप्टन तानिया शेरगिल या आर्मी डे परेडचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी बनली. आपल्या देशाच्या सशस्त्र दलातील प्रत्येक सैनिकाला त्याच्या निस्वार्थ सेवेसाठी सन्मानित करण्यासाठी भारतीय लष्कर दिन साजरा करण्यात येतो.

भारतीय लष्कर दिन २०२२:-

२०२२ मध्ये जनरल मनोज मुकुंद नरवणे हे सलामी देणार आहेत. २०२२ च्या या उत्सवात भारतीय लष्कराने नुकतेच मिळवलेल्या स्वदेशी विकसित आणि आयात केलेल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन समाविष्ट असणार आहे. BLT T-72 ‘भारत रक्षक’ रणगाडा मिमी सॉल्टन गन आणि ब्राह्मसोस क्षेपणास्त्रेदेखील या प्रदर्शनात असणार आहेत. २०२२ मध्ये भारतीय लष्कर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIFT) यांच्या भागीदारीत डीझाईन केलेले सर्व नवीन कॅमफ्लाज युनिफॉर्म भारतीय लष्कर दिनाच्या परेडमध्ये प्रदर्शित केले जातील.

वास्तवकट्ट्याकडून सर्वांना भारतीय लष्कर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

निशा हिंगे

वास्तव कट्टा

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please turn off the ad blocker for site working smoothly