MPSC

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी थोडक्यात…

आज 3 जानेवारी, समानतेची खरी बीजे ही शिक्षणातून रुजवली जातात आणि यासाठी स्त्री शिक्षित असणं गरजेचं आहे.  हे ओळखून एक क्रांतिकारी लढा देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुलेंचा आज जन्मदिवस.

अज्ञानाच्या अंधकारात महात्मा फुले यांच्या सोबतीनं क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्ञानाचा आणि शिक्षणाचा प्रकाश घेऊन आल्या. तत्कालीन समाजाचा तिटकारा, विरोध आणि टीका सहन करून त्यांनी शुद्रतिशूद्र आणि महिलांच्या आयुष्यात कधीही न विझणारी ज्योत प्रज्वलित केली. यामुळे 1995 सालापासून त्यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. सावित्रीबाईंच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते. यासोबतच सावित्रीबाई या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्याचबरोबर त्या कवयित्री आणि समाजसेविकाही होत्या.
वयाच्या ९व्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिरावांशी झाला.

फुले दाम्पत्यांनी स्त्री शिक्षणाची मोहीम हाती घेतली. काळ्या मातीत अक्षरं गिरवत सावित्रीबाई शिकू लागल्या. पुण्याच्या भिडे वाड्यात १९४८ साली त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा उघडली.

आपल्या सुनेने शिक्षिका म्हणून काम केलेले ज्योतिरावांच्या वडिलांना म्हणजेच गोविंदारावांना मानवले नाही. त्यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिबांना घराबाहेर काढले. तरीही हार न मानता त्यांनी जिद्दीने त्यांचे काम चालू ठेवले. त्यानंतर त्यांनी रास्ता पेठ आणि वेताळ पेठ या ठिकाणी देखील शाळा सुरू केल्या.

ज्यामध्ये त्यांनी ९ विविध जातींच्या मुलांना शिकवायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी हळूहळू ‘महिलांना शिक्षण देणे गरजेचे आहे’ हे अभियान सुरू केले आणि या मोहिमेत त्यांना यशही मिळाले. त्यानंतर सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती ज्योतिबा फुले या दोघांनी मिळून 5 शाळा बांधल्या.

मुलींना शिकवू नये, अशी त्याकाळी लोकांची अत्यंत चुकीची विचारसरणी होती. यातून सावित्रीबाईंनी ही विचारधारा बदलून मुलांना असलेला शिकण्याचा अधिकार मुलींनाही मिळायला हवा, हे लोकांना पटवून दिले.यानंतर त्यांनी एक केंद्र देखील स्थापन केले, जिथे त्यांनी विधवा महिलांना पुनर्विवाह करण्यास प्रेरित केले. यासोबतच अस्पृश्यांच्या हक्कासाठीही संघर्ष केला. ‘त्यांची फुले’ आणि ‘बावनकशी सुबोधरत्नाकर’ हे दोन काव्यग्रंथही त्यांनी लिहिले.

१८५२ मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारने महिला शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल फुले दाम्पत्याचा गौरव केला. यासोबतच केंद्र व महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ अनेक पुरस्कारांची स्थापना केली होती.

या सर्वांसोबतच सावित्रीबाईंच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीटही जारी करण्यात आले. कारण आधुनिक शिक्षणात त्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत. त्यांना मराठी भाषेचेही चांगले ज्ञान होते.
सावित्रीबाईंनीही एक कविता लिहिली होती, जी मराठी भाषेत होती, जी आजच्या काळात मराठी भाषेत उत्तम प्रकारे कार्यरत आहे आणि आधुनिक लोकांना तिची सर्वाधिक गरज आहे.

सावित्रीबाई आणि त्यांचे पती ज्योतिबा फुले दोघेही समाजसुधारक होते. दोघांनी मिळून समाजाची उत्तम सेवा केली होती. पण त्यांना मूलबाळ नव्हते म्हणून त्यांनी यशवंतराव या ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला. या गोष्टीला संपूर्ण कुटुंबातील सर्व सदस्यांनी विरोध केला, त्यामुळे त्याने आपल्या कुटुंबातील नातेसंबंध संपुष्टात आणले.

अनंत अडचणींवर मात करत सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. समाजातील विधवा स्त्रियांची परिस्थिती सुधारावी, बालहत्या थांबाव्यात, दलित समाज मुख्य प्रवाहात यावा यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्लेगच्या साथीत त्यांनी रुग्णांची सेवा केली. ही सेवा करत असतानाच त्यांना प्लेगची लागण झाली आणि १० मार्च १८९७ रोजी त्यांची प्राणज्योत मावळली.

निशा हिंगे

वास्तव कट्टा

 

 

 

 

 

 

#सावित्रीबाई

#क्रांतीज्योती

#savitribaifule

#mpsc

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please turn off the ad blocker for site working smoothly