MPSCBreaking Newsआरोग्य

आत्महत्या केलेल्या स्पर्धा परिक्षार्थींचे माहिती संकलन सुरू

🔴स्पर्धा परीक्षेतील वाढत्या आत्महत्या.

🔴राज्यातील स्पर्धा परीक्षाची तयारी करत असणाऱ्या ज्या उमेदवारांनी आत्महत्या केली आहे,त्याची माहिती संकलित करण्यासाठी हा *सर्वे* करीत आहोत.

🔴वरील गुगल फॉर्म मध्ये तुम्हाला माहिती असणाऱ्या ज्या उमेदवाराने आत्महत्या केली आहे,त्यांची माहिती भरावी,ही विनंती.

नमस्कार,
नुकतेच पुण्यात स्वप्निल लोणकर या युवकाने आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे. ही आत्महत्या राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची नक्की काय परिस्थिती असेल हि सांगणारी आहे. राज्यात स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या उमेदवारांची संख्या ही जवळपास 23 लाख पेक्षा जास्त आहे. यामुळे या क्षेत्रात मागील 4-5 वर्षापासून प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे. या वाढलेल्या स्पर्धेमुळे अपेक्षा देखील वाढलेल्या आहेत. आणि अपेक्षांचं ओझं घेऊन हे उमेदवार परीक्षेला सामोरे जात असतात. या अपेक्षा पूर्ण होऊ न शकल्याने मागील दोन ते तीन वर्षापासून स्पर्धा परीक्षा क्षेत्रात वाढत्या आत्महत्या व हार्ट अटॅक चे प्रमाण वाढले आहे. राज्य सरकार समोर ही चिंता करणारी बाब आहे.
या सर्व प्रक्रियेला राज्य सरकारचे धोरण कारणीभूत आहे. रिक्त जागा न भरणे, परीक्षा सुरळीत न पार पाडणे, परीक्षेतील वाढती अपारदर्शकता, नोकर भरती न करण्याचे धोरण, नियुक्ती न देणे, मुलाखती वेळेत न पार पडणे, आयोगातील रिक्त सदस्य न भरणे, निर्णय प्रक्रियेतील विलंब, निवड प्रक्रियेत आवश्यक असणारी गतिमानता नसणे. ज्या तारखा दिलेल्या आहेत त्या वेळेस परीक्षा न होणे,या सर्व घटनांमुळे हे उमेदवार आपली बहुमूल्य वर्ष या स्पर्धा परीक्षा देत असतात. आणि याचा फटका त्यांना बसतो. त्यामुळे हे उमेदवार कौटुंबिक व सामाजिक ताण,आर्थिक ताण, वाढते वय, नोकरीची चिंता, लग्नाची चिंता, वेळेत परीक्षा न होणे,सततचे अपयश तसेच स्वतःला संधी आजमावण्याची संधी न मिळणे या परिस्थितीला सामोरे जात असताना आत्महत्येचा मार्ग निवडला जात आहे.
राज्यभरात मागील 4-5 वर्षापासून स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचे आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी आपण हे सर्वे करण्याचे अभियान राबविले आहे. यामुळे राज्यभरात किती उमेदवाराने आत्महत्या केलेली आहे. ही आकडेवारी समोर येणे आवश्यक आहे. राज्य सरकार पर्यंत आपण ही माहिती पोहोचविणार आहोत व युवकांसाठी योग्य ते धोरण राबविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. यासाठी आपण आत्महत्या/ हार्ट अटॅक केलेल्या उमेदवारांची माहिती द्यावी, ही नम्र विनंती.

खालील लिंक वर जाऊन आपण माहिती भरू शकता

https://forms.gle/a7cipQQqUFo1PXLGA

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please turn off the ad blocker for site working smoothly