MPSCBreaking News

आदरणीय स्वर्गीय.आर आर पाटील (आबा) यांना सरकार च्या स्वप्नात येऊन सरकार ला जागे करण्यासाठी विध्यार्थ्यांचे पत्र..

प्रती,
आदरणीय स्वर्गीय.आर आर पाटील (आबा )
माजी. उपमुख्यमंत्री /गृहमंत्री
महाराष्ट्र, राज्य.

विषय : सरकारच्या स्वप्नात येऊन सरकारचे कान धरून सरकारला जागे करण्याबाबत..

सन्माननीय आबा,
आज तुम्ही जर सरकार मध्ये असता तर कदाचित स्वप्नीलची आत्महत्या झाली नसती. आज तुम्ही जर असता तर आजचा युवक डिप्रेशन मध्ये नसता. आबा तुम्ही होता तेव्हा हजारोंच्या संख्येने पोलीस भरती, psi भरती करत असायचे. तुम्हाला मुलांच्या mpsc चे फॉर्म भरायच्या फी पासून ते जॉइनिंग पर्यंत सर्व काळजी असायची.

 

PSI च्या training मधील मुलगा जर वरच्या पदाची परीक्षा पास होत असेल तर त्याला आपण पगारी सुट्टी देऊन नवीन संधी देत असायचे. वरिष्ट अधिकाऱ्यांनी पदभरतीत भ्रष्टाचार केला तर तुम्ही त्याला जेलात नेऊन टाकायचे. पण गरीबाच्या लेकरांवर कधी अन्याय होऊ दिला नाही. तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधायचे.

आबा आज सरकार तुमचे आहे, पण तुम्ही त्यात नाहीत, तर सर्व काही बदलले. आज पदभरती साठी आंदोलन करावे लागतात, परीक्षा होण्यासाठी आंदोलन करावे लागतात, जाहिरात काढावी म्हणून आंदोलन करावी लागतात, निकाल लागल्यानंतर ही न्यायालयात खेटा घालाव्या लागतात. आणि एवढे करूनही शेवटी जॉइनिंग साठी उपजिल्हाधिकारी पोस्ट मिळवून ही भरपावसात सरकार ला दंडावत आंदोलन करावे लागतंय.कुण्या मंत्र्याशी संवाद साधायचा असेल तर tweeter वर ट्विट करावे लागते, त्याची पण दखल घेतली जात नाही. आबा तुम्ही होते तर प्रत्यक्ष मुलांच्यात येऊन तुम्ही मुलांशी संवाद साधून मुलांचे प्रश्न समजून घेत असायचे. पण इथे आबा सरकार ला फक्त त्यांची काळजी..

त्यांच्या 12 आमदारांची काळजी..मग सत्ताधारी असो किंवा विरोधी.त्यांना त्यांच्या मुलांच्या राजकीय करिअर ची काळजी. पण आमचा विषय आला की नुसत्या राज्यापुढच्या अडचणी सांगतात आर्थिक तंगी, कोरोना.. यांच्या election ला कोरोना नसतो, यांच्या पोरा-बाळांच्या लग्नाला कोरोना नसतो, यांच्या रॅली -आंदोलनाला कोरोना नसतो.. फक्त आमच्या पदभरतीलाच कोरोना येतोय.मान्य आहे राज्याची आर्थिक स्थिती खराब असेल, पण तरीही election तोंडावर किंवा एखाद्या समाजाच्या मतांसाठी, स्मारकसाठी हजारो कोटी खर्च करायला तय्यार होतात. पण आबा आम्ही सर्व युवक बहुजन समाजातीलच आहेत ना.. तुमच्या काळात पण राज्याची आर्थिक परिस्थिती गरिबीचीच होती ना, तरी पण तुमच्या काळात एवढ्या संख्येने पदभरती कसे काय निघत होत्या.. कारण तुम्ही खऱ्या अर्थाने आम्हा गरीब मुलांचे एक प्रकारचे बाप होता, आणि बाप कितीही गरीब असला तरी तो पोराला अडचणी सांगत नाही तर तो मुलांच्या भविष्यासाठी हवे त्या गोष्टी देत असतो. पण आबा इथे सरकारमध्ये प्रत्येक मंत्र्यात एकच बाप दिसतो, तो फक्त आणि फक्त त्यांच्या मुलांचा.. फक्त काळजी त्याला त्यांच्या मुलांच्या राजकीय करिअर ची.

आबा PSI मुलांना वेळेवर training मिळावी म्हणून तुम्ही अजून एक training center काढले. पण आबा इथे निकाल लागायला ही एक वर्ष जातंय आणि ट्रैनिंग ला जायलाही एक वर्ष जातंय. आबा, PSI 2019 च्या जाहिरातीच्या मुलांनी जुलै 2019मध्ये PSI मुख्य परीक्षा दिली होती.आज 2 वर्षे होतायेत मुले ग्राउंड वर नुसते पळतायेत पण ग्राउंड काय होत नाही, पण माहित नाही अजून किती दिवस असेच पळवणार आहेत. Physical करणाऱ्या मुलांना एका पहिलवानाच्या खुराकाप्रमाणे मासिक 15000-20000 खर्च चालू असतो. आधी तरी आम्ही एक वेळेच्या मेस वर दिवस काढत होतो, पण physical मुळे.. कुठून आणणार आबा आमचे आई -बाप एवढे पैसे.. ज्या वयात आम्ही आई -वडिलांना सांभाळायला हवे त्या वयात आई -वडिलांना कसे पैसे मागू आबा आम्ही.
मागच्या सरकारनी महापोर्टल च्या नावाखाली एक पण भरती नीट काढली नाही.2019 च्या निवडणुकीच्या प्रचारदरम्यान तुमच्या नावाचा व कामाचा उल्लेख झाला आणि आम्हाला आश्वासन मिळाले की आर. आर. आबांसारखी मोठी पोलिसभरती, मोठी पदभरती काढू. म्हणून आम्ही तुमच्या सरकारला मत केली. पण आबा तसे काहीच आम्हाला मिळाले नाही.

मान्य आहे आबा राज्यातील भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्यरोप पाहून तुमची पण ईच्छा होत नसेल सरकारच्या स्वप्नात यायची. पण आबा आज स्वप्नील तुमच्याकडे आला आहे, त्याला विचारा.. त्याच्यासाठी, आमच्यासाठी व आमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी एकदा यांच्या स्वप्नात येऊन यांचे कान धरून यांना जाब विचारा.. आबा खूप आठवण येती हो तुमची.. पत्र लिहितानाही डोळ्यांतून अश्रू येतायेत.. थरथरत्या हातानी हे पत्र लिहिण्याचे धाडस केले. Plz आबा ह्या पत्राची दखल घ्या.कारण खूप काही मुले नैराश्येत आहेत. त्यांना व त्यांच्या कुटुंबाना तुम्ही वाचवा.
तुमचा मुलगा,

उद्धव ढवळे.

(2 वर्षेपासून PSI PHYSICAL च्या प्रतीक्षेत..
स्पर्धा परीक्षेतील सर्व विद्यार्थ्यांच्या भावना.)

11 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button