Breaking News

The Flying Sikh flies to heaven !

The Flying Sikh flies to heaven !

काल भारताचे फ्लाईंग सिख समजले जाणारे वेगवान धावपटू मिल्का सिंग यांचा कोरोनामुळे मृत्यू झालं. त्यांनी चंदीगढ येथे अखेरचा निरोप घेतला. मिल्का सिंग यांना वयाच्या 91 वर्षी कोरोना वायरस ने दगा दिला , त्यांच्या पत्नी निर्मल कौर वय वर्ष 85 यांच देखील कोरोनानेच मागील काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित खेळाडूच्या जाण्याने अवघा भारत देशच नाही तर जिथे जिथे मिल्का सिंग ‘फ्लाईंग सिखचा’ झेंडा गाडुन आले होते तिथे तिथे सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली.
‘फ्लाईंग शीख’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या धावपटू मिल्खा सिंग यांनी रोम येथे असलेल्या 1960 व टोकियोतील 1964 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व भूषविले होते. पतियाळा मधे 1956 साली झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी सर्व जगाचे लक्ष वेधले होते. दोन वर्षांनंतर झालेल्या स्पर्धेत त्यांनी 200 व 400 मीटर शर्यंतीत विक्रमी वेळ नोंदवली. 1958 साली टोकियोत झालेल्या आशियाई स्पर्धे मध्ये त्यांनी आपली कामगिरी कायम ठेवत 200 व 400 मीटर शर्यतीत नवा आशियाई विक्रम नोंदवला. 6 सप्टेंबर 1960 ला ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 400 मीटर शर्यतीत आपलाच मागील वर्षीचा विक्रम मोडीत काढला , त्या शर्यतीत ते चौथे आले होते . ०.१ सेकंदाने त्यांना कास्य पदकाला हुलकावनी भेटली होती. त्या स्पर्धेत ते कोणत्याही सरावा शिवाय अगदी बुटांशिवाय धावले होते. त्यापूर्वी त्यांनी 1958 सालच्या राष्ट्रकूल स्पर्धेत 200 व 400 मीटर धावण्याच्या शर्यती मध्ये सुवर्णपदक मिळवले होते. 1962 च्या आशियाई स्पर्धे मध्ये 200 मीटर शर्यती मध्ये ही सुवर्णपदक जिंकले होते.
मिल्खा सिंग हे असे धावपटू होते की त्यांनी कुठलाही सरावा न करता , कुठल्याही आर्थिक मदतीशिवाय , कोणाच्याही मार्गदर्शना विना ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर हे अंतर त्यांनी फक्त 45.9 सेकंदात पार केले होते . त्यांचा विक्रम अजूनही कुठल्याही भारतीयाला मोडता आलेला नाही. त्या काळच्या तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या मिल्खा सिंग यांचे स्वानुभव खरच एखाद्या चित्रपटाच्या कथानकालाही मागे पाडतील असेच होते. त्यांनी जिंकलेली सर्व पदके, चषक, ब्लेझर व जे बूट घालून त्यांनी विक्रम मोडले ते बूट त्यांनी राष्ट्रीय खेळ संग्रहालयाला दान केले. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना पद्मश्री हा सर्वोच्च सन्मानित पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. भारतीय लष्कराच्या सेवेमध्ये रुजू असताना मिल्का या खेळांकडे आकर्षित झाले. ते सैन्यदलात कामगिरी बजावत असताना पंजाब येथे त्यांची नियुक्ती होती. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. त्यांचा जन्म हा पाकिस्तानचा पण फाळणी नंतर ते भारतात आले.
त्यांच्या वैयक्तिक आयुष्याकडे पाहता अगदीच आयुष्याने छळवाद मांडल्यासारखे प्रकार त्यांच्या जिवनात घडले. फाळणी वेळी अगदी त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली. अगदी स्वतःच्या डोळ्यांनी आई – वडिलांची, भाऊ – बहिणीची तलवारीने हत्या करताना ज्या मुलाने पाहिलं असेल त्याला जर काही वर्षांनी त्याच देशात तुला खेळाकरीता जायचे आहे असे सांगितले तर ??? काय अवस्था झाली असेल त्या मुलाची ??? मिल्का सांगतात जेव्हा मला सांगितले गेले ‘तुला पाकिस्तानात खेळायचे आहे’ हे ऐकल्या ऐकल्या माझ्या अंगातुन काटे टोचल्यासारख झाल आणि अचानकच तो सगळा काळा दिवस माझ्या डोळ्यासमोरुन सर्रकन निघुन गेला , आणि कोणीही सामान्य मुलाने जे केले असते तेच मी केले मी त्यांना मी त्या देशात जाणार नसल्याचे कळवले, तेव्हा भारताचे पंतप्रधान असलेले पंडितजी नेहरु यांनी माझी भेट घेत सांगितले की, ‘ खेळ हा देशातील तणाव दूर करण्यासाठी एक उपयुक्त मार्ग आहे. तुम्हाला जावच लागेल मिल्का ‘ त्यानंतर फक्त पंडितजींच्या सांगण्या मुळे मी पाकिस्तानात गेलो आणि जिंकुनही आलो. अस मिल्का यांनी त्यांच्या आयुष्यावर चित्रित झालेल्या ‘ भाग मिल्का भाग ‘ या बायोपिक वेळी मुलाखती दरम्यान सांगितले. ‘ फ्लाईंग सिख ‘ हा किताब देखील मिल्का यांना पाकिस्तानच्या खेळात पाकिस्तानचा सर्वात वेगवान धावपटू अबु खालिद याला हरवल्या नंतर पाकिस्तानचे तेव्हाचे जनरल अय्युब खान यांनी मेडल देताना सांगितले की , ‘ आज तु पळाला नाहीस , उडाला आहे. म्हणून मी तुला फ्लाईंग सिख हा किताब देतो आहे, तो तु स्विकारावास अशी माझी इच्छा आहे. ‘ ज्या देशातून आपण मारले जाऊ नये म्हणून पळुन गेलो होतो त्या देशात आपल्याला ही पदवी , हा किताब भेटतो आहे मग निश्चितच आहे की मिल्का यांना खूप काही जिंकल्याची भावना मनामध्ये आली असणार.
मिल्का यांच्या आयुष्यावरील बायोपिक प्रमाणेच त्यांचे आत्मचरित्र देखिल उपलब्ध आहे ते ‘द रेस ऑफ माय लाइफ’ या नावाने प्रसिद्ध आहे.
अशा महान धावपटू फ्लाईंग सिख अर्थातच मिल्का सिंग यांच जेव्हा निधन झाल तेव्हा फरहान अख्तर या अभिनेत्यानं ज्याने मिल्का यांच्या आयुष्यावरील बायोपिक मध्ये मिल्का यांच पात्र साकारल त्याने अशी प्रतिक्रिया दिली की, ” तुम्ही फार प्रेमळ आणि मोठ्या मनाचे होता , ज्यांनी तुम्हाला वडिल आणि मित्रांच्या जागी ठेवले त्यांच खरच भाग्य आहे. तुम्ही आज आभाळाला देखिल हरवलत . मला खरच आजुनही वाटत नाहीए की , तुम्ही हे जग सोडून गेला आहात. तुमच्या मुळे मला जी प्रेरणा मिळाली आहे ती कधीच कमी होणार नाही. तुम्हाला खूप सार प्रेम. ” अशा भावनिक शब्दात फरहानने मिल्का यांना आदरांजली दिली.
या महान धावपटूला शतशः प्रणाम !

 

– साक्षी.एस.राम

10 Comments

  1. The results appear in this week s issue of The Lancet, a British medical journal dose of viagra Cognitive dysfunction during and following treatment for cancer, often referred to as chemobrain, is an adverse effect of cancer treatment that may interfere with patients ability to resume their precancer lifestyle, with subsequently reduced quality of life

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please turn off the ad blocker for site working smoothly