Breaking Newsआरोग्य

अनलाँक

अनलाँक

मुख्यमंत्री कार्यालयाने शुक्रवारी उशीरा रात्री महाराष्ट्र बंदमुक्त करणार असल्याचे जाहीर केल ,काही निर्बंधांचा जाहिरनामा जाहिर केल्यानंतर महाराष्ट्र 7 जूनपासून अनलाँक झाला , तरीही राज्यात अनलाँक बाबत जो काही गदारोळ झाला होता तो सरकारी अटी नियमांचे पालन करताना शांत होईल अशी आशा वाटते. या अनलाँक मध्ये काही अटी आहेत , हे अनलाँक पाच स्तरात असेल पहिला स्तर हा बर्‍यापैकी सौम्य असेल , आणि शेवटचा व पाचवा स्तर हा कडक निर्बंधांचा असेल.
आठवड्यातली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यात हे निर्बंध असतील, हा अनलाँक सोमवार पासून लागू झाला. आता हे कडक निर्बंधांचे पाच टप्पे कसे असतील हे सविस्तर पाहुयात…

टप्पा 1

अहमदनगर, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, उस्मानाबाद आणि यवतमाळ या स्तरावरील शहरे आणि भागात याचा समावेश आहे.
कमीत कमी कोरोनाचे रुग्ण आणि आँक्सिजन बेड्सची उपलब्धता पाहता पहिल्या टप्प्यात हे जिल्हे येतात.

कोणत्या गोष्टींची परवानगी आहे –

1) लाँकडाउन ठरल्या वेळेनुसार सुरु होण्यापूर्वी दुकाने आणि मॉल चालविण्यास परवानगी दिली जाईल.
2) रेस्टॉरंट्स, लोकल ट्रेन आणि उद्यान ही सुरु असतील.
3) खासगी व शासकीय कार्यालये, खेळ , शूटिंग, लग्नसमारंभ , अंत्यसंस्कार, सभा, निवडणुका, बांधकाम, शेती, ई-कॉमर्स, जिम, सलून, स्पा, बस, मालवाहू गाड्या, आंतर-जिल्हा वाहतूक .

टप्पा 2

हिंगोली आणि नंदुरबार हा परिसर आणि जिल्ह्यांचा समावेश आहे.
पाच टक्के इतकी रुग्ण संख्या असणारी शहरे आणि 25 ते 40 टक्क्यां इतकी ऑक्सिजनयुक्त बेड असणारी शहरे

कोणत्या गोष्टींसाठी परवानगी आहे –

1) समुह करण्यावर आणि समुहाने काही गोष्टी करण्यावर बंदी घातली जाईल.
2) अत्यावश्यक आणि अनावश्यक दुकानांसाठी ठरवुन दिलेला वेळ असेल.
3) मॉल, थिएटर आणि सिंगल पडद्यावर 50 टक्के क्षमतेवर काम करण्यास परवानगी आहे.
4) रेस्टॉरंट्स जेवण शीट्स 50 टक्के क्षमतेत कार्यरत असतील .
5) उद्याने, खाजगी व शासकीय कार्यालये नियमित वेळेत काम करू शकतात.
6) घरातील खेळांना सकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत परवानगी असेल, तर दिवसभर मैदानी खेळ होऊ शकतात.
7) शूटिंग नियमित वेळी होईल आणि फक्त 50 टक्केच लोकसंख्येची कँपँसिटि असेल.
8) अंत्यसंस्कारांवर काही अटी लागणार नाही.
9) सोसायटीच्या सभा आणि निवडणुका 50 टक्के क्षमतेने होतील.
10) बांधकाम, शेती, ई-कॉमर्स उपक्रम नियमित वेळेत सुरु राहतील.
11) जिम आणि सलून 50 टक्के लोकसंख्येवर कार्य करू शकतात.
12) शहर बसेसमध्ये उभे राहणारे प्रवासी चालणार राहणार नाहीत. जितके शीट्स उपलब्ध असतील तितकीच प्रवासी संख्या असेल, आंतर-जिल्हा प्रवास नियमित असेल आणि उत्पादनाच्या पूर्ण प्रमाणात परवानगी असेल.

टप्पा 3

मुंबई, अकोला, अमरावती, बीड आणि पालघर यांचा या टप्प्यात समावेश आहे.
5 आणि 10 टक्के इतकीच रुग्ण संख्या असलेली शहरे आणि क्षेत्रे आणि ऑक्सिजन बेड ची संख्या 40 टक्क्यांपेक्षा जास्त असायला हवी.

कोणत्या गोष्टींसाठी परवानगी आहे –

1) संध्याकाळी 5 वाजल्या नंतर सगळ बंद होणार .
2) संध्याकाळी 4 वाजेपर्यंत दुकाने सुरु असतील. मॉल्स, थिएटर आणि सिंगल स्क्रीन बंद राहतील.
3) रेस्टॉरंट्स संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के जागा क्षमतेवर सुरु राहतील आणि त्यानंतर फक्त पार्सल सुविधा खुल्या असतील.
4) लोकल गाड्या केवळ आवश्यक सेवेतील लोकांसाठीच चालवल्या जातील.
5) सार्वजनिक ठिकाणे आणि उद्याने सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत खुली असतील.
6) खासगी कार्यालये संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सर्व दिवस चालू असतात.
7) सरकारी कार्यालयातील उपस्थिती 50 टक्के इतकीच मर्यादित असेल .
8) क्रीडा उपक्रमांना सकाळी 5 ते सकाळी 9 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत परवानगी दिली जाईल.
9) बायो बबल असल्यास शूटिंगला परवानगी दिली जाईल आणि संध्याकाळी 5 नंतर कोणत्याही गोष्टींसाठी परवानगी दिली जाणार नाही.
10) सामाजिक संमेलनांना 50 टक्के उपस्थिती असेल , विवाहांमध्ये 50 लोक इतकी उपस्थिती असू शकेल आणि अंतिम संस्कारांमध्ये जास्तीत जास्त 20 लोक येऊ शकतात. सोसायटीच्या सभा आणि निवडणुका रॅलींमध्ये 50 टक्के उपस्थिती असू शकते.
11) बांधकाम साइट्स सिटू कामगार आहेत आणि संध्याकाळी 4 नंतर कोणत्याही मजुरांना बाहेर पडू दिले जाणार नाही.
12) ई-कॉमर्स कार्यरत असेल.
13) सलून आणि जिमची क्षमता 50 टक्के असेल .
14) सार्वजनिक वाहतुकीत उभे राहून प्रवास करु दिला जाणार नाही.
15) वस्तु उत्पादन नियमितपणे होऊ शकते.

टप्पा 4

कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे चौथ्या टप्प्यात येतील.
10 ते 20 टक्के इतकी रुग्णसंख्या असणार्‍या आणि 60 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्ध असणार्‍या शहरांसाठी हा चौथा टप्पा

कोणत्या गोष्टींसाठी परवानगी आहे:

1) संध्याकाळी 5 वाजल्या नंतर सगळ बंद असेल आणि आपत्कालीन परिस्थितीशिवाय कोणीही जास्त प्रमाणात बाहेर पडु शकणार नाहीत.
2) अत्यावश्यक दुकाने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खुले असतील तर आवश्यक नसलेल्या गोष्टीसाठी बंद असेल.
3) मॉल, थिएटर, सिंगल स्क्रीन आणि सभागृह बंद राहतील.
4) रेस्टॉरंट्स बसण्याकरीता उपलब्ध असतील.
5) लोकल गाड्यांचा फायदा फक्त अत्यावश्यक सेवा श्रेणीतील लोकच घेऊ शकतात.
6) सार्वजनिक ठिकाणे आणि उद्याने सकाळी 8 ते रात्री 9 या वेळेत खुले असतील.
7) खासगी कार्यालयांमध्ये आणि सरकारी कार्यालये 25 टक्के क्षमतेवर कार्य करू शकतात.
8) आठवड्याच्या सर्व दिवशी पहाटे पाच ते रात्री नऊ या वेळेत मैदानी खेळांना परवानगी दिली जाईल.
9) बायो बबलमध्ये शूटिंगला परवानगी असेल आणि संध्याकाळी 5 नंतर कोणत्याही अनावश्यक गोष्टींसाठी बाहेर पडण्याची परवानगी दिली जाणार नाही.
10) लोकांना आठवड्याच्या शेवटी बाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.
11) सामाजिक एकत्र करणाला परवानगी दिली जाणार नाही आणि लग्नांमध्ये 25 पेक्षा जास्त लोक उपस्थित राहू शकणार नाहीत आणि केवळ 20 च लोक अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकतात . सोसायट्यांच्या सभा आणि निवडणुका रॅलींमध्ये दिलेल्या क्षमतेच्या केवळ 50 टक्के लोक उपस्थित राहू शकतात.
12) बांधकाम साइट केवळ जवळच्या भागातील मजुरांद्वारेच काम करवु शकतात. दुपारी चार वाजेपर्यंत शेतीविषयक कामांना परवानगी देण्यात येणार आहे.
13) अत्यावश्यक वस्तूंसाठी ई-कॉमर्स वितरणास परवानगी असेल.
14) सलून आणि जिम साठी फक्त 50 टक्के क्षमतेची परवानगी दिली आहे आणि केवळ लसीकरण केलेले ग्राहक येउ शकतात.
15) सार्वजनिक वाहतुकीत केवळ 50 टक्के प्रवाशांना परवानगी असेल.
16) उत्पादनही 50 टक्के क्षमतेनेच होईल.

टप्पा 5

हे असे क्षेत्र असणार आहेत ज्यात रुग्ण संख्येचे २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि ऑक्सिजनयुक्त बेड 75 टक्क्यांहून अधिक आहेत. सरकारच्या सकारात्मकतेच्या दरानुसार 3 जूनला ऑक्सिजन बेड्स रेशो पडताळुन पाहता आतापर्यंत एकही जिल्हा किंवा शहर या प्रकारात नाही.

कोणत्य गोष्टींसाठी परवानगी आहे –

1) सगळ्या गोष्टी बंद असतील .
2) फक्त आवश्यक दुकाने संध्याकाळी चार पर्यंत चालु ठेवण्यास परवानगी असेल. हाँस्पिटल इत्यादीं सारख्या आवश्यक गोष्टीसाठी कोणतेही बंधन असणार नाही.
3) अनावश्यक दुकाने, थिएटर आणि मॉल्स बंद राहतील.
4) रेस्टॉरंट्स फक्त पार्सल साठी खुले असतील.
5) गाड्यांचा लाभ केवळ वैद्यकीय कर्मचार्‍यांना घेता येईल.
6) उद्याने बंद राहतील.
7) खासगी कार्यालये केवळ राखीव वर्गातील लोकांसाठी कार्यरत असतील तर सरकारी कार्यालयांमध्ये फक्त 15 टक्के उपस्थिती असू शकते.
8) नेमबाजी, खेळ, एकत्री करणाला परवानगी दिली जाणार नाही.
9) लग्नाला कुटुंबातीलच लोक उपस्थित राहू शकतात. अंत्यसंस्कारात जास्तीत जास्त 20 लोक असू शकतात आणि सोसायटी मीटिंग्ज ऑनलाइन करण्यात येतील.
10) जागेवरच कामगार असणार्‍या बांधकामांना परवानगी देण्यात येईल आणि दुपारी चार वाजेपर्यंत शेती विषयक दुकानांना परवानगी दिली जाईल.
11)जिम आणि सलून बंद असतील.
12) सार्वजनिक वाहतूक 50 टक्के क्षमतेने सुरु असु शकते. ई-पास मिळाल्यानंतर मालवाहू वाहतुकीस व आंतर-जिल्हा वाहतुकीस परवानगी दिली जाईल.
13) मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला संधी देण्यात आली आहे परंतु त्यातील 50 टक्के कामगार संख्येला परवानगी देण्यात आली आहे.

अशाप्रकारे पाच टप्प्यात लाँकडाउन उघडल्यावर व्यापारी वर्ग, कर्मचारी वर्ग, व्यावसायिक वर्ग, इत्यादी वर्गांना थोडातरी दिलासा भेटलेला दिसत आहे. आता काळजी घेऊन जर आपण आपली काम केली तर परत परिस्थिती आटोक्यात येउ शकते , अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
लोकांच्या चेहऱ्यावर देखील समाधान स्पष्ट दिसु लागल आहे.

 

– साक्षी. एस. राम

24 Comments

  1. Предлагаем услуги профессиональных инженеров офицальной мастерской.
    Еслли вы искали ремонт iphone 14 pro адреса, можете посмотреть на сайте: ремонт iphone 14 pro
    Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!

  2. Защитные кейсы plastcase.ru/ в Санкт-Петербурге — надежная защита оборудования от влаги, пыли и ударов. Большой выбор размеров и форматов, ударопрочные материалы, индивидуальный подбор.

  3. Tried the https://www.cornbreadhemp.com/products/full-spectrum-cbd-gummies from Cornbread Hemp. I went with the brim-full spectrum ones — the ones with a bantam THC. Took a specific beforehand bed. The mouthful is exquisite, sort of rough but not gross. After wide an hour, I felt more relaxed. Not knocked commission or anything, reasonable tranquil adequate to downgrade asleep without overthinking. No grogginess in the morning, which I was worried about. They’re not bargain-priced, but if you’ve had perturb unwinding at dusk, this capacity assistants

  4. Pingback: here
  5. Tried the Joy Organics joy organics hemp gummies minus of curiosity. Taste is rigorous, not too sweet. I took joined in the afternoon when I was fervency kinda off — not terrible, barely adverse energy. Almost 30–40 mins later, I felt a suspicion more level. Not like a prodigious market, but plenty to notice. No bizarre crash after. Don’t expect spellbinding, but conducive to me, it helped take the edge eccentric without sense zoned out.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button