Breaking NewsMPSC

सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी विध्यार्थी आक्रमक

सरळ सेवेची भरती मागील अडीच वर्षापासून विविध कारणाने रखडलेली आहे. या परीक्षांची तयारी करणारा उमेदवार हा हाताश झालेला आहे. राज्य शासनाचे वारंवार परीक्षा पुढे ढकलण्याची धोरण यामुळे उमेदवारांचे वाढते वय, आर्थिक खर्च, कौटुंबिक जबाबदारी, सामाजिक दबाव या विविध कारणाने तो नैराश्‍य मध्ये गेलेला आहे. या पदांची तयारी करणारा उमेदवार हा विशेष करून ग्रामीण भागातील असल्याने सरकारी नोकरी मिळावी यासाठी प्रचंड कष्ट घेत असतो. पण विविध कारणाने या परीक्षा झालेल्या नाहीत. तसेच राज्य शासनाच्या विविध विभागात रिक्त असणारी दोन लाखांपेक्षा जास्त पदे, तसेच लाखोंच्या संख्येने स्पर्धापरीक्षेची तयारी करणारा उमेदवार हा सरकारी नोकरी मिळविण्यासाठी आपले बहुमूल्य वर्ष या परीक्षांसाठी देत असतो. पण परीक्षाच होत नसल्याने तो या प्रक्रियेत मागील काही वर्षांपासून अडकलेला आहे. त्यामुळे राज्य शासनाने ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. आता कोरोनाची परिस्थिती देखील नियंत्रणात आलेली आहे.
या सरळ सेवेसाठी राज्यातील जवळपास 13 लाखांपेक्षा जास्त उमेदवार आपले भवितव्य आजमावण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समजत आहे.
ग्रामविकास -13000, गृहविभाग-5300,एमआयडीसी-2500, Animal Husbandry -1500 या पदांसाठीच्या परीक्षा रखडलेल्या आहेत. त्यामुळे ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय राज्यसरकार ने घेऊन विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबविण्यासाठी MPSC STUDENTS RIGHTS ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे व इतर मंत्री महोदयांनी पत्र पाठविण्याची मोहीम सुरू केली आहे. जर राज्यसरकार ने परीक्षा घेण्यास अजूनही विलंब केला तर विध्यार्थी अक्रमक होऊ शकतात त्यामुळे विद्यार्थ्यांचा अंत खरे तर राज्यसरकार ने पाहायला नको…

8 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button