Breaking Newsवास्तव

दुसरी लाट कोरोनाची की अपयशाची…

दुसरी लाट कोरोनाची की अपयशाची…

साधारणतः एप्रिल 2021 पासुन भारतात कोरोनाची दुसरी लाट आली, खरतर डिसेंबर दरम्यान ज्या कोरोनाने आवरत घेतल त्या कोरोनाने मात्र एप्रिल मध्ये असा जोर धरला की दिवसाकाठी लाखोंच्या वर रुग्णांची संख्या गेली. आणि म्रृत्यु दरही वाढु लागलाय, दिवसाला सरासरी शेकड्याच्या वर म्रृत्यु होत आहेत, तेव्हा खरच ही लाट कोरोनाची की अपयशाची हे समजत नाही.
या लाटेच वैशिष्ट्य अस की ही लाट तरुणांसाठी सगळ्यात जास्त प्रभावी होती , तरुण आणि कुटुंबावर या दुसर्‍या लाटेने जास्त प्रमाणात कहर बरसवला. अनेक लोकांचे कुटुंबाच्या कुटुंब या लाटेमध्ये म्रृत्युमुखी पडली खुप लोक आपली हक्काची, प्रेमाची माणस गमावुन बसले , अगदी एका एका कुटुंबातील सहा लोक एकाच वेळी कोरोना मुळे मरण पावली . पण दुसरी कडे अतिशय उलटपक्षी प्रकरण होताना दिसुन आले आहे की एकाच कुटुंबातील लहानांपासून वयस्कर सदस्यांनी एकाचवेळी कोरोनावर यशस्वी मात केली.
तज्ज्ञांच्या मते, भारत सरकारनं दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष केलं, ज्यामुळे भारतात ही लाट सर्वांत वेगानं पसरायला कारण ठरली . तज्ञांच्या मते रुग्ण संख्या ही सातपट वाढली आहे.महाराष्ट्रातील एका रुग्णालयातील डाँक्टरांना विचारलं, तर त्यांनी सांगितलं, “या लाटेचं कारण नेमकं काय आहे हे आम्हाला माहित नाही. काळजीचं कारण म्हणजे पूर्ण कुटुंबच्या कुटुंब कोरोनाग्रस्त होत आहे. हे पूर्णपणे नवीन आहे.”
मार्चच्या सुरुवातीला भारताचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितल होत , ‘भारतातली कोरोना साथ संपत आली आहे.” आरोग्यमंत्री हर्षवर्धन(Indian Health Minister Dr. Harsh Vardhan) असेही म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM NARENDRA MODI)यांना आंतरराष्ट्रीय सहकार्याच उत्तम उदाहरण मानण्यात याव , त्यांनी लसी(VACCINE) साठी इतर देशांना जे सहकार्य केल त्यावरून त्यांना सहकार्याच एक उदाहरण म्हणल जात आहे.” जानेवारीपासून भारतानं ‘व्हॅक्सिन डिप्लोमसी’ (VACCIN DIPLOMACY) अंतर्गत विविध देशांना लशी पुरवल्या आहेत.
लोकांनी सुरक्षेच्या नियमांकडे केलेलं दुर्लक्ष पाहता लग्नसमारंभ , सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी, सरकारकडून येणाऱ्या बातम्यांच्या संभ्रमामुळे दुसऱ्या लाटेला जोर मिळाला. कोरोना रुग्णांची संख्या थोडी कमी झाली , की लोकांनी लस घेण्याचंही कमी केलं. मध्यंतरी कोरोनाची लाट ओसरल्यावर लसीकरण मोहीम कमी झाली होती. खरंतर जुलै अखेरीपर्यंत 25 कोटी लोकांना लस देण्याचं लक्ष्य होतं . पण लसीकरणाबाबतच्या काही चुकीच्या अफवांमुळे , लसीकरणाचा साठा कमी असल्याने आणि कोरोना कमी झाला या अफवेमुळे लोकांनी लसीकरणाकडे दुर्लक्ष केले.
गेल्या वर्षभरापेक्षाही अधिक काळ झाला आपण कोरोनाशी लढा देतोय. राजकीय नेते, धोरणकर्ते आणि माध्यमातील काही लोकांच अस म्हणन झाल की , भारत कोरोनाच्या संकटातून बाहेर पडतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तर ‘व्हॅक्सिन गुरू’ अशी उपाधी देऊन सगळे मोकळे झाले.
दुसर्‍या लाटेची काही कारण पहायला गेलो तर लक्षात येईल की, फेब्रुवारी महिन्या शेवटी भारतीय निवडणूक आयोगानं पाच राज्यांमधील निवडणुका जाहीर केल्या. 18 कोटी 60 लाख लोक मतदार असलेल्या राज्यांत 824 जागांची ही निवडणूक.27 मार्चपासून मतदान सुरू झालेली ही निवडणूक आजतागायत सुरूच आहे. महिनाभर मतदानाचे टप्पे आहेत. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान होत आहे. निवडणुकीचा प्रचारसुध्दा जास्त प्रमाणात होतोय . सुरक्षेचे नियम आणि सोशल डिस्टन्सिंग यांचा काहीच नामोनिशाण उरलेला नाहीए .त्यानंतर गेल्या महिन्याच्या मध्यात भारतीय क्रिकेट बोर्डानं भारत विरुद्ध इंग्लंड सामना बघण्याकरीता 1 लाख 30 हजार क्रिकेट प्रेमींना गुजरात राज्यातील नरेंद्र मोदी मैदानात उपस्थित राहण्यास परवानगी दिली होती. यातल्या बर्‍याच क्रिकेट प्रेमींना मास्कही परिधान करून येण्याच भान राहिल नव्हत.
भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असली, तरी सुध्दा लसीकरण मोहिमेला वेग द्यायला हवा होता . मात्र, याकडे कुणीच लक्ष दिलं नाही . इथं एका प्रकारे जिंकल्याच वातावरण होतं. बर्‍याच अंशी लोकांना वाटलं की आपण हार्ड इम्युनिटी मिळवलीए . प्रत्येकाला पुन्हा आपापल्या रोजगारावर जायचं होतं. भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राचे प्राध्यापक गौतम मेनन सांगतात, “भारतातील कोरोनाची दुसरी लाट टाळता आली नसती, पण तिचं उपद्रव-मूल्य कमी करता आलं असतं, इतर देशांप्रमाणेच भारतानेही जानेवारीपासूनच इतर व्हेरिएंटच्या तपासणीसाठी जिनोमिक सर्व्हेलन्स करायला हवं होतं.” याकडे मात्र केंद्र सरकारने दुर्लक्ष केल.
ही लाट बरीच जीवघेणी ठरली. ती लवकरात लवकर संपावी म्हणून आपल्याला खूप प्रयत्न करायचे आहेत हे लक्षात घ्यायला हवं . त्यासाठी आपण या लाटेमागे काय कारणं आहेत हे जाणुन घेउयात. विषाणूमधील जनुकीय बदल अर्थात डबल म्यूटंट, ट्रिपल म्यूटंट स्ट्रेन. हे म्युटेशन अतिशय घातक आहे. त्यामध्ये विषाणू फुफ्फुसात लवकर शिरकाव करतो. त्याने पहिल्यांदा ताप, कफ आणि खोकला अशा प्रकारची लक्षणे दिसतात. नंतर घसा कोरडा पडणे, घसा दुखणे, वास न येणे, चव न येणे अशाप्रकारची लक्षणे दिसतात.याचा परिणाम असा की, आजार लक्षात येईपर्यंत विषाणूने शरीरावर खुप घात केलेला असतो. हा विषाणू हवेतून पसरतो यावर आता आंतरराष्ट्रीय मासिकातील चर्चा आहे , त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा खरच फायदा होतोय की नाही, यावर प्रश्नचिन्हच आहे. हा विषाणू हवेत खूप वेळ तग धरू शकतो आणि हवेतूनच वेगाने पसरतो. त्याने घरातील एका व्यक्तीला याची लागण झाल्यास बाकीच्यांना ही लागण होण्याचे प्रमाण वाढते .दुसरे कारण असे की लोकांचा अति आत्मविश्वास. जसे की मास्क न घालणे, काळजी न घेणे, मुलांचे घराबाहेर पडणे . या लाटेमध्ये कोविड वाढविण्यात सुपर स्प्रेडर व्यक्तींचा मोठा वाटा आहे. या व्यक्तींमध्ये लक्षणे नसणारी लहान मुले, मास्कऐवजी साडीचा पदर किंवा स्कार्फ बांधणाऱ्या महिला, तसेच मास्कऐवजी रूमाल बांधणारे पुरुष यांचा प्रामुख्याने समावेश होतो .
तरीही राज्यभरात जो काही बंद ठेवण्यात आला तो ही वाखाणण्याजोगा नक्कीच होता , तरीही आता काळजी घ्यायला हवीए कारण तिसरी लाट तोंडावर येउन ठेपलीए याबाबत जोरदार चर्चा आहे.

– साक्षी. एस. राम

56 Comments

  1. Spot on with this write-up, I seriously believe this web site needs far more attention. I’ll probably be back again to see more, thanks for the info!

  2. Эта статья сочетает в себе как полезные, так и интересные сведения, которые обогатят ваше понимание насущных тем. Мы предлагаем практические советы и рекомендации, которые легко внедрить в повседневную жизнь. Узнайте, как улучшить свои навыки и обогатить свой опыт с помощью простых, но эффективных решений.
    Подробнее тут – https://vyvod-iz-zapoya-1.ru/

  3. You’re so interesting! I don’t think I have read anything like that before. So great to find another person with a few genuine thoughts on this subject. Really.. thanks for starting this up. This website is one thing that is needed on the internet, someone with some originality.

  4. Oh my goodness! Amazing article dude! Thank you so much, However I am having problems with your RSS. I don’t understand why I can’t subscribe to it. Is there anybody else having similar RSS issues? Anybody who knows the answer will you kindly respond? Thanx.

  5. I’m amazed, I must say. Rarely do I come across a blog that’s both educative and interesting, and let me tell you, you have hit the nail on the head. The problem is something that too few folks are speaking intelligently about. I am very happy I came across this during my search for something regarding this.

  6. I seriously love your blog.. Great colors & theme. Did you make this website yourself? Please reply back as I’m attempting to create my own personal blog and would like to find out where you got this from or what the theme is called. Cheers.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button