Breaking NewsMPSC

विळखा स्पर्धा परीक्षेचा…

विळखा स्पर्धा परीक्षेचा

माझ्या तमाम स्पर्धा परीक्षा लढू पाहणाऱ्या शुरांनो. आज जे संकट आलं आहे आपल्यावर, ते भूतभविष्यात कधीही आलेलं नव्हतं. त्यामुळे मन खच्चीकरण करणारे आपल्या आजूबाजूच्या कुठल्याही गल्लीबोळात वावरताना दिसतील, परंतु आपण त्यावेळी निडर असायला हवं. धैर्याने काम करायला हवे. कारण ते आपल्याला उगाचच ज्ञान पाजतील, की “इतकी वर्षे झालीत, काय तु दिवे लावलेत स्पर्धा परीक्षेत. दोन वर्षे लोटलीत, झाली का एखादी परीक्षा? आणि हो जर तु पास झालास तर नियुक्ती लवकर होते का..? पडलेत असे भरपूर पास होऊन इथे. आणि आरक्षणाचा मुद्दा तर भलताच आहे. तो बघ सुरेशचा पोरगा. त्यांनी व्यवसाय सुरू केला आणि आता कसा कमवत आहे. किती वर्षे अजून हे स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा करशील. म्हणून म्हणतो की, एखादा व्यवसाय सुरू कर, त्यातच तुझा फायदा आहे.” असे ते पोटाच्या आतल्या भागापासून बोलतील. डिचवतील. अशा वेळी आपल्याला शांतपणे विचार करायला हवं.. आपण स्पर्धा परीक्षेची सुरुवात कशी केली होती. आणि कशासाठी केली होती ते आठवयाला हवं. आपण तटस्थ झालो पाहिजे. आत्मविश्वास, कुठल्याही प्रकारे ढळून जाता कामा नाही पाहिजे. असे संकटे जीवनात येतच असतात. ही संकटे आपली प्रत्येक वेळी परीक्षा घेत असते. त्यात आपण खरं उतरलो तर, स्पर्धा परीक्षाच काय? आपण जीवनातील कुठलाही प्रकारची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो.

पुर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीतून आपण मिरीट लिस्ट मध्ये येत असतो. यासाठी साधारण दोन वर्षाचा कालावधी लागतो. लाखोंच्या संख्येने या परीक्षेत सहभागी होत असतात. काहींना पाच वर्षे तर काहींचे सहा ते सात वर्षे या क्षेत्रात लोटलेली असतात. त्यामुळे , योग्य नियोजन करून मेहनत केली तर यात लवकर यश मिळतं.

चला आपण एक उदाहरण देऊन समजून घेऊ. समजा यावर्षी पाच लाख मुलांनी स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज केला आहे. आणि जागा आहेत पाचशे. यांचा गुणोत्तर खूपच कमी भरतो. म्हणजे यामध्ये निवड होण्याची शक्यता कमी आहे. मग कुणाची निवड होते, ते समजून घेऊ.

पाच लाख मुलांमधून अडीच लाख मुलं आपण असे धरू की, अडीच लाख मुलांनी दोन ते अधिक वर्षे अभ्यास व दोनपेक्षा जास्त पुर्व परीक्षा दिलेल्या आहेत.

उरलेले अडीच लाख मुलांनी या अगोदर कधीही अर्ज किंवा थोडा अधिक अभ्यास केला असेल. ज्यांची ही पहिलीच पुर्व परीक्षा असेल. मग यांचा विचार सद्या आपण बाजूला ठेवू कारण अभ्यास, आणि अनुभव नसल्याने यातून निवड होईल, अशी त्यांची शक्यता नाही. मग त्या अडीच लाख मुलांचा विचार करू.

यातून असे समजू की या अडीच लाख मुलांमधून सव्वा लाख मुलांनी प्रश्नपत्रिका, अभ्यासक्रम, व महाराष्ट्र शासनाची इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतची सर्व पुस्तके वाचली असतील.

उरलेले सव्वा लाख मुलं ज्यांना दोन ते अधिक वर्षे झालेली आहेत, परंतु कुणीतरी करतंय स्पर्धा परीक्षा म्हणून मी करतोय, या अविर्भावाने, शुन्य नियोजन करून अभ्यास करीत आहेत. हे मुलांना मग अभ्यासक्रम समजायला दोन ते तीन वर्षे अधिक लागतो. प्रश्न पत्रिकेचे सुक्ष्म निरीक्षण नसल्याने व बेसिक पुस्तके न वाचल्याने यांचा पाया भक्कम राहत नाही. मग यांना स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यास खूप वर्षे लागतात.

मग त्या सव्वा लाखातून असे असतात की, ज्यांचा अभ्यासक्रम, बेसिक पुस्तके, प्रश्न पत्रिका, व प्रत्येक विषयाचे स्वतंत्र पुस्तके वाचून झालेलं असतात. यामध्ये हे पुर्व परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात.

मग उरतात ते साठ ते बासष्ठ हजार मुलं. हे मुलं मुख्य परीक्षासाठी पात्र ठरतात. यामध्ये खूप सारा अभ्यास झालेला असतो. अभ्यासक्रम, बेसिक, प्रश्न पत्रिका, सराव परीक्षा, अशा वेगवेगळ्या भागाचा सविस्तर व काटेकोरपणे अंमलबजावणी त्यांच्या कडून केली जाते. परंतु गम्मत अशी आहे का? यात प्रत्येक्षात परीक्षा देतांना परीक्षा हाँलमध्ये मनात वेगवेगळे विचार चालू असतात. ताणतणाव थोडा अधिक जाणवत असतो. मन अस्वस्थ वाटू लागते. पुर्व परीक्षा पास होऊन व नियोजनबद्ध अभ्यास करूनही चांगला प्रयत्न यांच्याकडून मुख्य परीक्षेसाठी होत नाही. मग यांना अगदीच थोड्या अंतराने यश हुलकावणी देऊन जातो.

उरलेले साठ हजार यांचा मन शांत व परीक्षा होण्याच्या आदल्या दिवशीची पुरेपूर झोप घेऊन व अगदीच कसलीही भिती न वाटता परीक्षा देतात व उत्तीर्ण होतात. व ते मुलाखतीसाठी पात्र ठरतात.

मुलाखतीसाठी पात्र ठरलेले सगळ्याच मुलांची निवड होते असे नाही. एका जागेसाठी चार ते पाच मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलांना बोलवलं जातं.

इतका मोठा वनवास करून मुलाखतीपर्यंत मुलं पोहचतात. परंतु इथे जो अगदीच शांतपणे, प्रामाणिकपणे, मुद्देसुद व व्यवस्थित स्पष्टपणे, न घाबरतात, बेधडक प्रश्नांची उत्तरे देईल, त्यांचीच निवड करण्यात येते. इथे काही मुलं घाबरून जातात. प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित देत नाहीत. तणावग्रस्त परीस्थिती निर्माण करतात. त्यांची निवड होत नाही. मग त्यांना परत इतका मोठा वनवास करावा लागतो.

म्हणजे सारांश मध्ये सांगायचं झालं तर स्पर्धा परीक्षा सुरू करतांना उमेदवारांना अगोदर मनात पक्क विचार करावं लागतं की इतका वनवास आपल्याला पार करायचा आहे. त्यानंतर अभ्यासक्रम, बेसिक पुस्तके, प्रश्न पत्रिका, विविध विषयांची पुस्तके, रेफरन्स पुस्तके, चालू घडामोडीची माहिती, सरकारी योजना, घडत असलेल्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक घटना, सराव परीक्षा, हे सर्व करून व मन शांत ठेवून पुर्व , मुख्य परीक्षा, व मुलाखत देणे. अशा पद्धतीने जावं लागतं. याच यश अपयश पचवण्याची क्षमता, साहस, धाडस, सहनशीलता, धैर्य, संयम आणि आत्मविश्वास अशा गोष्टींची जोड अभ्यासाला द्यावी लागते.

स्पर्धा परीक्षा जीवघेणी नक्कीच आहे, परंतु स्पर्धक जर संयमी असेल तर शेवटी त्याला यशाची रसाळफळे चाखायला मिळतातच. यासाठी त्यांनी संयम सोडला नाही पाहिजे. टिकून राहिलं पाहिजे. प्रत्येक लढाई लढली पाहिजे. संकटे येत असतात. परंतु लोकमान्य टिळकांनचं वाक्य त्यांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आयुष्यात कितीही संकटे आलीत. की त्यांनी मनातल्या मनात म्हटलं पाहिजे की, मला अजून लढायचं आहे. लढाई अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही. कायम सकारात्मक वातावरणात वावरायला हवं.

मित्रांनो आज अशी परीस्थिती निर्माण झाली आहे की, जे स्पर्धा परीक्षा करत आहेत. आणि ज्यांना अभ्यास करून खूप वर्षे झाली असेल. त्यांची मनाची विंवेचना खूप भयानक झाली आहे. जगावं की मरावं, सोडावं की धरावं, अशा दुहेरी अवस्थेत फसलेलं तरुण आज आजूबाजूला बघतोय. सांगायचं इतकं की, ज्यांनी अगोदर सहन केलंय. तोच अशा पद्धतीने लिहु शकतो. तोच भावना मांडू शकतो. आणि यात मी पण अपवाद नाही आहे. हे सर्व मी सहन केलंय. अनुभवलंय. म्हणून माझा हा एक लिहिण्याचा प्रपंच.

तेच तेच पुस्तके वाचून कंटाळा आला असेल. अभ्यासात मन रमत नसेल, तर मुख्य विषयाचा अभ्यास थोडा बाजूला ठेऊन भुगोलाचे नकाशे वाचा, मागील प्रश्न पत्रिका चाळा, गणिते सोडावा. युट्यूबवर इतिहास बघा, मुलाखतीचे तंत्रमंत्र विविध बातम्यामधून शिका. आणि हे जमलं नाही तर विविध साहित्य वाचा. आणि यातून कंटाळा, आळस, आणि ताणतणाव बाजूला झाला की परत एकदा मुख्य विषय हाती घ्या. व दिवसभरातील नियोजनानुसार अभ्यास करा.

आणि हो… सावधान मनोरंजन मिळवण्यासाठी तुम्ही सोशल मिडियावर गेलात तर तुम्ही फसला म्हणून समजा. कारण आपल्याला आर्कषून घेतील अशा गोष्टी सोशल मिडियावर असतात. त्यातून सुटका होणे नाही. कारण मनात अभ्यासाबद्दल इतका ताणतणाव निर्माण झालेला असतो की , ते मनाला लवकर आकर्षुन घेतं. यामुळे जितका कमी वेळ सोशल मिडियाला द्याल. तितकेच यशाच्या जवळ पोहचाल याची खात्री करून देतो.

अजून एक मुद्दा राहिला आहे, जो की सांगणे खूप महत्त्वाचा आहे. कारण त्या मुद्याशिवाय या लेखाचा शेवट होणार नाही. तो असा आहे की, आपल्या स्वतःच्या क्षमता ओळखा. आत्मचिंतन करा की, आपण या महासागरात कुठपर्यंत पोहचू शकतो. आपण अभ्यास तेवढा करू शकतो का नाही. ते प्रथम तपासा. जर खात्री पटली तर पुढे सुरू ठेवा. नाही तर तुम्हांला पाच ते सहा वर्षे अभ्यास करून झाली असली तरी माघार घ्यायला मागेपुढे पाहु नका. नाही तर सुरूवातीला त्या व्यक्तींनी सुचवलेलं काम करू शकतात. अथवा वेगळ्या क्षेत्रात आपल्या कलाकौशल्य व आवडीनुसार पुन्हा एकदा प्रयत्न करू शकता. कारण आयुष्य अजून खूप मोठं आहे. एवढं महाभारत होऊन गेल्यांनी आयुष्य संपून गेल नाही, असं नाही होणार. निवांत रहा. काळजी घ्या. तणावमुक्त जगा. हसत रहा. कारण आयुष्य खूप सुंदर आहे.

 

हरीचंद्र पवार✍️.

नाशिक

७७२०९१३९४९.

66 Comments

  1. This is an excellent point, and I think you’ve captured the issue perfectly. I recently read a very similar article on m8win, and it helped me better understand this perspective.

  2. Эта статья предлагает уникальную подборку занимательных фактов и необычных историй, которые вы, возможно, не знали. Мы постараемся вдохновить ваше воображение и разнообразить ваш кругозор, погружая вас в мир, полный интересных открытий. Читайте и открывайте для себя новое!
    Подробнее можно узнать тут – https://vyvod-iz-zapoya-1.ru/

  3. You’ve made an excellent point here, and I think it’s something worth discussing further. There are several articles on 11bet that offer a similar perspective and are definitely worth reading.

  4. Dzięki tak kompleksowej obsłudze klienta, kasyno buduje zaufanie wśród swoich graczy, zapewniając im poczucie bezpieczeństwa i pewności, że w razie jakichkolwiek trudności będą mogli liczyć na szybką pomoc. To istotny element, który wpływa na ogólną jakość doświadczeń graczy i zachęca ich do dalszego korzystania z oferty kasyna.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button