Breaking Newsआरोग्यवास्तव

फ्रन्टलाइन वर्करच्या कुटुंबांना का नको लस?? गड आला पण सिंह गेला असे म्हणण्याची वेळ येऊ नये हीच अपेक्षा..

फ्रन्टलाइन वर्करच्या कुटुंबांना का नको लस??
आज रोजी महाराष्ट्रासह संपूर्ण जगामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. सर्व जग घरामध्ये बंदिस्त असताना मात्र पोलिस, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी व इतर फ्रन्टलाइन वर्कर (FRONTLINE WORKERS) मात्र आपण सुरक्षित राहावे म्हणून रात्रंदिवस या कोरोणाच्या लढाईमध्ये जीवाची बाजी लावत आहेत यापैकी कित्येक कोरोणाचे बळी ठरले.
सुदैवाने कोरोनावर लस (CORONA VACCINE) भेटली आणि त्यातही आनंदाची गोष्ट ही की; सर्वात प्रथम आरोग्य कर्मचारी, पोलीस व इतर इतर फ्रन्टलाइन वर्करला प्राधान्याने लसीकरण सुरू केले.
सर्व जनता घरात होती मात्र हे कोरोना योद्धे (CORONA WARRIOR)रस्त्यावर होते; खरेतर कोरोनाच्या संसर्गाची सर्वात जास्त शक्यता यांनाच होती..
नंतर मात्र लसीकरणाचे वेगवेगळे टप्पे ठरले 65 वर्षाच्या पुढील नागरिकांना प्राधान्याने लसीकरण सुरू झाले त्यानंतर 45 वर्षांनंतरच्या आणि आता अठरा वर्षाच्या पुढील सर्वांना लसीकरण करण्याचे ठरले आहे.
मात्र त्यातही पुरेशी लस उपलब्ध होत नसल्याने म्हणा किंवा राजकारणामुळे म्हणा लसीकरनाचा पुरता खेळखंडोबा झालेला दिसत आहे. लॉकडाऊन आणि कोरण्याचा संसर्ग वाढू नये म्हणून सर्व जनता घरात बसून आहे आणि असे असताना मात्र या लढाईमध्ये लढणारे फ्रन्टलाइन वर्कर जेव्हा आपली ड्युटी करून घरी येतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये एकच भीती असते की माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला तर कोरोणाचा संसर्ग होणार नाही ना? कारण त्याने जरी लस घेतलेली असली तरी तो सतत कुटुंबाच्या सहवासामध्ये असतो म्हणून आपल्यामुळे घरामध्ये कोरोना पसरणार नाही हे कशावरून या भीतीमध्ये तो नेहमी असतो.
या भीतीच्या सावटाखाली जगण्या पेक्षा आमच्या कुटुंबाला सुद्धा प्राधान्याने लस द्या अशी आर्त हाक त्याच्या हृदयातून येत आहे पण ते ऐकणार कोण? या योद्ध्यांच्या घरातही छोटी मुले, वयस्क आई-वडील, आजी-आजोबा व इतर नातेवाईक आहेत त्यांनाही घरामध्ये कोरोना येण्याची भीती नसेल का? त्यांचाही जीव नाही का?
पोलीस, डॉक्टर व इतर कोरोना योद्धे घर तर सोडू शकत नाहीत त्यांना लस दिली पण रोज ज्या कुटुंबात ते वावरतात त्यांच्या कुटुंबाचे काय? किती दिवस त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने दुहेरी सावटाखाली जायचं? खरंतर प्राधान्यक्रम वगैरे हा प्रकार येण्याची वेळ यायला नको होती; कमी वेळात सरसकट लसीकरण होणे गरजेचे होते परंतु ते सध्या शक्य नसल्याचे दिसत आहे त्यामुळे कमीतकमी ज्यांना जास्त धोका आहे अशांना तरी प्राधान्याने लसीकरण द्यायला हवे.
सरकारने याचा सकारात्मक विचार करून फ्रन्टलाइन वर्करच्या कुटुंबाचे प्राधान्याने लसीकरण करणे गरजेचे आहे. असे न केल्यास मात्र फ्रंटलाईन वर्कर्स चे कुटुंब कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्यास नवल नसावे…

गड आला पण सिंह गेला असे म्हणायची वेळ या कोरोना योद्यांवर येऊ नये हीच अपेक्षा…

किरण वसंतराव निंभोरे
Vastavkatta@gmail.com
8484086061

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button