*भारताला अमेरिकेने पाठ दाखविली आणि जगाने नाकारले… हेही दिवस जातील…*

- *भारताला अमेरिकेने पाठ दाखविली आणि जगाने नाकारले… हेही दिवस जातील…*
कोरोना ने लोकांना घरात बसविले, लोकांनाच काय तर देवालाही मंदिरात बंद केले…
भारतामधील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता काही देशांनी देखील भारताकडे पाठ फिरवली.. त्यामध्ये…
*अमेरिका*:
अमेरिकेने पुन्हा एकदा भारताला धक्का दिला आहे, कोरोना वरील लसीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत, भारताने निर्बंध उठविण्यासाठी केलेल्या विनंती नंतरही कच्च्या मालावरील निर्बंध हटविण्यास अमेरिकेने नकार दिला. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातील प्रवक्त्यांनी सांगितले की भारताची विनंती मान्य करण्या आधी आम्ही आमच्या नागरिकांना प्राधान्य देऊ..
*ब्रिटन:*
भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ब्रिटन चे पंतप्रधान मॉरिस जॉन्सन यांनी भारताला रेडलिस्ट मध्ये टाकले आहे.
*कॅनडा:*
भारतातून येणाऱ्या विमानांना कॅनडाने बंदी घातली आहे तसेच 30 दिवसांसाठी भारतातून येणाऱ्यांवर निर्बंध लावले आहेत.
*UAE:*
UAE ने देखील पुढील 10 दिवसांसाठी भारतावर बंदी घातली आहे.
*ऑस्ट्रेलिया:*
ऑस्ट्रेलिया ने देखील भारताला रेड लिस्ट मध्ये टाकले आहे, पंतप्रधान स्कॉट मोरीसन यांनी भारताला 22 एप्रिल पासून रेडलिस्ट मध्ये टाकले आहे.
*न्यूझीलंड :*
भारतातून गेलेले 23 प्रवासी CORONA Positive आढळल्याने न्यूझीलंड ने भारतातुन प्रवासास निर्बंध घातले आहेत.
*इंडोनेशिया:*
गेल्या 14 दिवसांपासून जे भारतामध्ये आहेत त्यांना व्हिसा इंडोनेशिया ने रद्द करून निर्बंध घातले आहेत.
देशामध्ये निर्बंध, देशाच्या बाहेर निर्बंध हे चाललंय काय??
हे सर्व निर्बंध उठवायचे असतील तर त्याची जबाबदारी स्वतःला घ्यावी लागेल. कोरोनाला हरवायचे असेल सामूहिक लढाई लढावी लागेल, नियमांचे पालन करावे लागेल… अन्यथा विनाश, संहार अटळ आहे…
*वास्तव कट्टा टीम..*
vastavkatta@gmail.com
UID_22300253###
test
UID_22809424###
test
UID_34163559###
test