Breaking Newsराजकीयवास्तव

विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकार ला या परिस्थितीत पायउतार होण्यास सांगणे म्हणजे बालिशबुद्धीच..

  1. कोण कोणास काय म्हटले?
    विरार येथील हॉस्पिटल मधील दुर्घटनेनंतर कोण कोणास काय म्हटले??
    प्रवीण दरेकर साहेब विरोधी पक्षनेते विधान परिषद:

विहार येथील हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना अत्यंत वेदनादायी आहे राज्य सरकारने अशा दुर्घटना वेळोवेळी होत असूनही याकडे गांभीर्याने न पाहणे म्हणजे जनतेच्या जीवाशी खेळण्यासारखेच आहे.
यावर प्रवीण दरेकर साहेब काय म्हटले ते पाहूया..
विहार येथील हॉस्पिटल मध्ये घडलेली घटना अत्यंत वेदनादायी आहे; आम्ही चुका समजू शकतो कोविड- 19 मुळे आरोग्य यंत्रणेवर देखील ताण आहे परंतु हा व्यवस्थेचा पूर्ण निष्काळजीपणा आहे.
भंडारा, ठाणे,नाशिक, दहिसर चेक नाका येथील घटना होऊनही सरकार जागे होणार नसेल तर कशाला सत्तेच्या खुर्च्या उपभोगता? “जनाची नाही तर मनाची लाज असेल तर क्षणाचाही विलंब न लावता पाय उतार व्हावे” अजून किती बळी घेणार? असे परखड बोल प्रवीण दरेकर यांनी सुनावले आहे.
सरकारचा धिक्कार करत प्रविन दरेकर म्हणतात नाशिक मधील घटनेनंतर कोणीही समोर आले नाही; खरे तर प्रत्येक मंत्र्याने किंवा पालकमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन पाहणी करायला हवी; पालकमंत्र्यांनी पाहणी केली असती तर दुरुस्त्या लक्षात आल्या असत्या.
हे म्हणणे मात्र प्रविन दरेकर साहेबांचे शंभर टक्के बरोबर आहे त्यानंतर ते म्हणतात की सरकार “ढम्म” आहे केवळ मीडियासमोर जायचे, राजकारण करायचे आणि जनतेकडे दुर्लक्ष करायचे; कारवाई करण्याचे आदेश द्यायचे पण कारवाई करून काय उपयोग? आधीच कारवाई केली असती तर संभाव्य मृत्यू टळले असते; “तुमची सरकार चालवायची कुवत नाही लायकी नाही” अशा शब्दात या घटनेनंतर प्रवीण दरेकर यांनी संताप व्यक्त केला.
विरोधी पक्षनेता या नात्याने ते बोलले ते योग्यच परंतु त्यातील काही गोष्टीचा मात्र वास्तवाला धरून विचार केला तर कुठेतरी खटकतात; जसे की, ‘सरकारने पायउतार व्हावे’, “सरकारची लायकी नाही, कुवत नाही”
असेल, नसेल तर भाग वेगळा परंतु सध्याची परिस्थिती पाहता सत्ते मधून पाय उतार व्हा म्हणणे किंवा राजीनामा मागणे हे बालिश बुद्धी चे दर्शन घडवते; सध्याची परिस्थिती सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्र येऊन सामोरे जाणारी आहे तर आणि तरच आपण त्यातून बाहेर पडू शकतो. या संकटातून बाहेर पडल्यानंतर करा ना आरोप-प्रत्यारोप; करा सरकारला पायउतार; आता सध्या तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे सरकार आणि जनतेला. यांना सरकार चालवता येत नाही तर तुम्ही मदत करा; तुम्ही पण जनतेचे प्रतिनिधी आहात ना? राहिला विषय राजकारणाचा आणि मीडियासमोर येण्याचा तर दिवसभर प्रत्येक न्युज चॅनलवर राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, प्रवीण दरेकर साहेब, चंद्रकांत दादा पाटील, नारायण राणे साहेब, नितेश राणे व इतर काही भाजपचे नेते हेच तर दिसत असतात. राजकारण सत्ताधारी करत आहेत तर तुम्ही काय करत आहात? खोटे बोलणार पण रेटून बोलणार अशा पद्धतीने राजकारण करून विरोधक सरकारला धारेवर धरत आहेत आणि सरकार देखील प्रत्येक वेळी त्याच-त्याच चुका करून विरोधकांना संधी देत आहे. सरकारने रडत बसण्यापेक्षा ठोस पावले उचलणे गरजेचे आहे जेणेकरून जनतेचे प्राण वाचतील मात्र हे सर्व होत असताना यामध्ये फरक पडतो तो गोरगरीब जनतेला..आज गरिबाला हॉस्पिटल मध्ये बेड मिळत नाही, बेड मिळाला तर ऑक्सिजन मिळत नाही, ऑक्सीजन मिळालं तर रेडमिसिविर इंजेक्शन मिळत नाही आणि या सर्वांनंतर ज्यावेळेस मृत्यू होतो त्यावेळेस मात्र त्याला दफन भुमी मध्ये दफन करण्यासाठी जागाही मिळत नाही. गोरगरिबांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी ऑक्सिजन रेडमिसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी विविध संघटना, सामाजिक संस्था, तरुण-तरुणी, रात्रंदिवस प्रयत्न करताना दिसत आहेत आणि राजकारणी मात्र एकमेकांची उनी-धुनी काढण्यात व्यस्त आहेत.
असो सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना हेच सांगणे आहे की जे कोणी जनतेच्या जीवावर बेतणारे राजकारण करत आहेत त्यांना जनता माफ करणार नाही. कोरोनाच्या या लढाईमध्ये सर्वांनी एकत्र येऊन लढले तरच आपण ही लढाई जिंकू शकतो. शेवटी एक लक्षात ठेवा कोणी कसेही राजकारण करा “पब्लिक सब जानती है”

किरण निंभोरे

वास्तव कट्टा, MPSC STUDENTS RIGHTS

8484086061

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please turn off the ad blocker for site working smoothly