
राजकारण – नेते अन् सर्वसामान्यांची शोकांतिका –
आज लोकांचा बर्याच अडचणी आहेत ज्याच्याकडे कोणाचेच लक्ष नाही. आज पेट्रोल तब्बल शंभर रुपयांच्या वर गेले डिझेल नव्वद रुपयांचा वर गेले गॅस साडे आठशे रुपयांवर गेला. का सभागृहात याबद्दल वादविवाद होताना दिसत नाही? का सर्वसामान्यांना न्याय दिला जात नाही? सर्वसामान्य लोकांचा जगण्याचा वाटा अवघड झाल्या असताना सरकारला अन् विरोधी पक्षाला बदलीचे पैसे याने किती खाल्ले त्याने किती खाल्ले यावर चर्चा आणि मीडिया वाले त्यांचे उदार अशी वस्तुस्थिती झाली आहे. बदलीचा पैश्याची पद्धत विरोधी पक्षाचा काळात नव्हती का? देवेंद्र फडणीसांचा सरकारने बिना पैसे घेता कोणाची बदली केली का?
खरतर भ्रष्टाचाराची सुरुवातच या बदलीचा पैशातून होते ही सत्यता आहे. नेत्यांना पैसे द्यायचे त्याशिवाय बदली होत नाही आणि पैसे दिले नाहीत तर गडचिरोली सारख्या ठिकाणी वा मनासारख्या ठिकाणी बदली केली जात नाही, अन्याय केला जातो ही वस्तुस्थिती. नेत्यांना बदलीला पैसे द्यायचे यासाठी अधिकारी वर्गाकडून लोकांकडून लाच म्हणून पैसे घ्यायचे आणि त्याच पैशातून बदली आणि इतर वर्गणी सारखे खर्च करायचे ही रीत. खरतर आपण हे निवडून दिलेले नेतेच भ्रष्ट आहेत. त्यामुळे आपणच आपल्या पायावर कुर्हाड मारून घेतो, अशा लोकांना आपणच लोकप्रतिनिधी बनवितो. निवडून दिले की आपणच यांचा मागे साहेब साहेब करून फिरतो ही तर सर्वात मोठी शोकांतिका आहे, अस म्हणायला हरकत नाही.
इथे रोज सकाळ दुपार संध्याकाळ बॅंका फोन करतात ए कर्ज भर बॅंकेला कळव अशा अरेरावीचा भाषेत बोलले जाते. आम्हाला फास लावा आणि वसुली करा अशा शब्दात आज शेतकर्यांना बोलायला लागत आहे ही वाक्यं मी माझा कानाने ऐकलेली आहेत. त्यात लाइट कनेक्शन तोडून जखमेवर आजून जखम करण्याचे काम सरकार उत्तमरीत्या करत आहे. तरीही गृहखात्याचा महिन्याचा हप्ता मात्र शंभर कोटींचा. बाकीचा खात्यांचे काय? सार्वजनिक बांधकाम विभाग राहिला, सार्वजनिक वन विभाग राहिला, महसूल खात सर्वात श्रीमंत खात राहील, जलसंपदा विभाग राहिला, नगररचना विभाग राहिला आणि बाकीची खाती वेगळीच यांचे हप्ते किती असतील याचा अंदाज देखील आपणाला बांधता येऊ शकत नाही. हे सगळे फडणवीस सरकार काळात होत नव्हते का? नक्कीच होत असणार आहे. माझा ऐकण्यातून माहिती असल्या प्रमाणे फडणीसांनी तर दमदाटी करून नेत्यांना पळवापळवीचे उद्योग केले. फडणीसांनी राजकारण हे तुच्छ पातळीवर नेले हे सर्वश्रुत आहे.
खरतर हप्ते वसुली हे पूर्वापार चालत आलेली रुढी परंपरा आहे अस म्हणायला हरकत नाही. पैसे गोळा करायचे, निवडणुकीचा खर्च करावयाचा, पुन्हा सत्ता आणायची अन् पुन्हा हा पैसा गोळा करायचा. बिचारा गोर गरीब आजून गरीब होत चालला आहे याचे भान नाही कोणाला. शेतकर्यांचा शेतमालाला हमीभाव नाही, फुकट सगळे विकतो आहे याचे कोणाला भान नाही. आज रानात मशागत करायची म्हणलं तरी त्याचा दर डिझेल मूळे वाढला आहे, पैसा नाही शेतकर्यांचा हातात याचे भान नाही कोणाला. का बनावट बियाणे करणार्या कंपन्यावर कारवाई केली गेली नाही याचा विचार केलाय कोणी? हे नेते मात्र सत्तेसाठी हपापलेल्या सारख करत आहेत. हे सगळे नेते एका ताटात जेवतात आणि खाली आपण भाकरीसाठी कुत्र्यासारखे भांडतो ही वस्तुस्थिती, आणि आमची येडि जनता लोक मात्र हा सगळा तमाशा बघत आहेत ही शोकांतिका.
कोण नेता पाण्यासारखा पारदर्शी नाही. होंडा घेऊन फिरणारा शेतकरी असो वा सर्वसामान्य असो गेली
कित्येक वर्ष झाले तो होंडाच घेऊन फिरतो अन् नेते मात्र पन्नास पन्नास लाखाचा गाड्या घेऊन फिरतात, वर्षा वर्षाला बदलतात. कधी विचार केलाय कुठून येतात हे पैसे? ग्रामपंचायत चा टेंडर पासून टक्केवारी चालू होते काही काही ग्रामपंचायत सदस्य आज टक्केवारी घेतल्याशिवाय वॉर्ड मध्ये काम करू देत नाहीत. आमदार काय खाक करून देतात? आणि वर भाषणात बोलले जाते साहेब रुपया घेत नाहीत टक्केवारीचा. आरे साहेबांनी लुटले तरी आम्ही मात्र टाक पन्नासच, साहेबाची गाडी पुढे चालली म्हणून मागे फिरतो. नवीन पिढी तर या सगळ्यात मोहाला बळी पडत वाया जात चालली आहे ही वाईट स्थिती आहे.
आपण स्वतः बदलले तर आपले दिवस येतील नाहीतर ही लोक आपल्याला लुटायलाच बसलेली आहेत. हा माझा पक्ष – हा माझा नेता हे दिवस गेले आता. जो काम करतो तो नेता जो जिवाभावाला साथ देतो तो पक्ष असे आता म्हणले पाहिजे. आपणच सुधारल्याशिवाय हे नेते सुधरणार नाहीत. खरतर यांनी आपल्या मागे आले पाहिजे, कारण आपल्या मतांवर हे लोक निवडून येतात मात्र घडत उलट आपण यांचा मागे लागतो आणि हे लोक आपल्याला माज दाखवतात सत्तेची मस्ती दाखवतात. निर्णय आपल्या हाती आहे, माणूस म्हणून जगायचेय की गुलाम म्हणून लाचार व्हायचेय हे आपण ठरवायचे आहे.
✍️ – दिग्विजय रावसाहेब पाटील.
(करोली-एम, सांगली)
svt-stroy.ru – Все о стройке и ремонте.
Разбираем подробно – Как декорировать дверь в нашем строительном блоге.
Советы опытных специалистов, дизайнеров и инженеров! Ремонтируйте свой загородный дом с умом!
Предлагаем услуги профессиональных инженеров офицальной мастерской.
Еслли вы искали ремонт iphone 14 pro адреса, можете посмотреть на сайте: ремонт iphone 14 pro
Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!
Сервисный центр предлагает ремонт экшен камеры smarterra рядом качественый ремонт экшен камеры smarterra