मीडिया कोणाची गुलाम झाली का??

तुम्हाला १९९३ सालचा एक फोटो आठवतो का? सुदान मध्ये काढलेल्या या फोटोमध्ये एक गिधाड त्या भुकेलेल्या लहान मुलीच्या मरणाची वाट पाहत आहे. या फोटोचे शीर्षक होतं “द व्हलचर अँड द लिटल गर्ल” फोटोग्राफर होता साउथ आफ्रिकेचा केविन कार्टर…! त्या वर्षीचा पुलित्झर प्राईस विजेता..!!
असे असून देखील त्याने आपल्या वयाच्या केवळ ३३ व्या वर्षी आत्महत्या केली…. कारण काय तर… एकाने फोनवर त्याला प्रश्न विचारला की: “त्या मुलीचे शेवटी काय झाले?” कार्टर म्हणाला ‘मला माहित नाही, मी खूप घाई गडबडीत होतो आणि मला विमानपण पकडायचे होते’.
समोरच्या माणसाने दुसरा प्रश्न विचारला, “तिथे किती गिधाडे होती?” कार्टर म्हणाला ‘मला वाटतं बहुतेक एकच गिधाड तेथे होते’
फोनवरील माणसाने अत्यंत तुच्छतेने कार्टरला सांगितले “मी तुला सांगतो त्यादिवशी तेथे एक नाही तर दोन गिधाडे होती, एक फोटोमध्ये असलेले आणि दुसरे कॅमेरॅ मागे असलेलं”
या शब्दांचे महत्त्व समजून घेत कार्टर अस्वस्थ झाला आणि शेवटी त्याने आत्महत्या केली. कार्टर आज जिवंत असता जर त्याने उपासमार झालेल्या बाळाला फक्त १/२ मैलांच्या अंतरावर असलेल्या युनायटेड मिशनच्या आहार केंद्रात नेले असते, किंवा जर त्या भुकेल्या मुलीकडे जाण्याचा प्रयत्न केला असता तर…
आज, 26 वर्षांनंतर, गिधाडे अजूनही संपूर्ण भारतातून हातात कॅमेरे घेऊन सर्वत्र परतत आहेत, हजारो किलोमीटर चालत आलेल्या कामगारांचे फोटो घेण्यात व्यस्त आहेत.
ही गिधाडे जी मागील एक वर्षा पासुन सेवा करणारे डाँक्टरच्या मृत्यु, पोलीसाचे मृत्यु, पायी प्रवास करुन घरी जाणा-या कामगारांच्या मृत्यूबद्दल,आयसीयु मध्ये कोरोना पेशंट च्या नातेवाईक यांची फरफट याची चिंता , आस्था करण्यापेक्षा टीआरपी वाढविणार्या बातम्यांविषयी अधिक काळजी घेतात. मृत कोरोना पेशंट डाँक्टर, पोलीस,कामगार आणि मुलांच्या शरीरावर मसाले ओतून ते ब्रेकिंग न्यूज गोळा करण्यात व्यस्त आहेत.
केव्हिन कार्टर यांचा स्वाभिमान होता, म्हणून त्याने आत्महत्या केली. परंतु या पत्रकाराच्या नावाखालील ही गिधाडे सन्मानाने ब्रेकिंग न्यूज बनविण्यात व्यस्त आहेत.😒😒🙏
आता ची सोशल मीडिया गुलाम झाली ,स्वाभिमान विकला.
- कोणी लिहिले माहीत नाही पण वास्तव मांडले…♦