Breaking Newsआरोग्य

रेमडेसिवीर चा इतिहास…??

लखनच्या लेखणीतून….✍🏼

रेमडेसिवीर चा इतिहास…??

खरं तर 2016 मध्ये 5 हजार कोटी रुपये खर्च करून इबोला साठी तयार करण्यात आलेली, RNA शृंखले च्या VIRUS पासून बनलेली ही Anti-Viral लस आहे. पण ही लस तेंव्हा इबोला वर उपयुक्त ठरली नव्हती. पण सध्या अगदी त्याच शृंखले शी साधर्म्य असणाऱ्या कोरोनावर मात्र काम करत आहे.

काय आहे रेमडेसिवीर..?

सध्या रेमडेसिवीर हे इंजेक्शन कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर अत्यंत प्रभावी मानलं जातं आहे. काही “किरकोळ बुद्धिमतेच्या” लोकांनी म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोव्हिड-19 रुग्णांवरचा प्रभावी उपाय असल्याचं म्हणत याची शिफारस केली होती. म्हणून तल्लख बुद्धीमते च्या लोकांनी 30 जून 2020 पासून हे इंजेक्शन महाराष्ट्रात वापरायला परवानगी दिली.

सध्या रेमडेसिविर कोण बनवतं..??

1】 सिप्ला (मुंबई) 2】 हेट्रो हेल्थकेअर (हैद्राबाद),
3】 डॉ. रेड्डीज (हैद्राबाद) 4】 झायडस् कॅडिला (अहमदाबाद)
5】ज्युबीलियंट लाईफसायंन्सेस (दिल्ली)
6】 इलिया लेबोरेटरीज (अर्जेंटीना)
या सहा प्रमुख कंपन्यांची रेमडेसिवीर इंजेक्शन्स महाराष्ट्रात वापरली जात आहेत.

रेमडेसिविर कुणाला द्यावे.??

कोरोना रुग्णांवर याचा प्रभावीपणे परिणाम होत असल्याने अधिक गंभीर संसर्ग झालेल्या रुग्णाला हे इंजेक्शन दिलं जातं. जे. जे. हॉस्पिटलचे औषधवैद्यक शास्त्राचे पथक प्रमुख डॉ. मधुकर गायकवाड सांगतात, “कोरोनाचा संसर्ग फुफ्फुसाला होतो. CORAD आणि HRCT ही चाचणी करून हा संसर्ग किती वाढला आहे हे तपासलं जातं. त्याचा स्कोअर असतो. CORAD 5 असेल तर कोरोना झाला आहे असे समजावे. किंवा HRCT Score 25 पैकी 9 पर्यंतचा स्कोअर हा गंभीर मानला जात नाही. पण 9 च्या पुढचा स्कोअर आला म्हणजे संसर्ग जास्त आहे. अधिक संसर्ग असणाऱ्या या रुग्णांना च रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं जातं. किंवा दिलं जावं.. यामध्ये वयाची अट नाही. ज्यांना संसर्ग अधिक त्यांना हे इंजेक्शन दिलं जातं. गरोदर महिला आणि बाळाला अंगावरचं दूध पाजणाऱ्या मातांना मात्र हे दिलं जात नाही.”

रेमडेसिविर चे काम..??

सध्या तरी व्यक्ती ला झालेला कोरोना आजार किमान 4 ते 5 दिवस अगोदर कमी करतो… आणि होणारा त्रास कमी करून पर्यायी जीव वाचवतो.
(टिप : सध्या तरी रेमडेसीवरच्या अतिवापराचे Side Effect माहीत नाहीत..)

रेमडेसीविर च्या तुटवड्याची कारणं कोणती..??

1). रेमडेसीविर ची अनियंत्रित निर्यात
2). सध्या 6 कंपन्यांकडून ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा पुरवठा केला जातो. त्यात अधिकचा पुरवठा करणाऱ्या 4 कंपन्या आहेत. या इंजेक्शनसाठी लागणारा कच्चा माल आयात करावा लागतो. तो भारतात उपलब्ध नाही. त्यामुळे कच्च्या मालाच्या आयातीपासून ते उत्पादनाची प्रक्रिया मोठी आहे.
3). गेल्या अनेक दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शन बनवणाऱ्या कंपन्यांकडून पुरवठा होत नाहीये. जिथे 500 इंजेक्शनची मागणी आहे तिथे दोन दिवसाला 60-70 इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. काही कंपन्या या खासगी रुग्णालयांना पुरवठा करत नाहीत. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांच्या नातेवाईकांकडून या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्यामुळे काळा बाजार होतोय.
4). हे इंजेक्शन 6 महिने साठवून ठेवता येतं. आता याची मर्यादा 12 महिन्यांपर्यंत वाढवली आहे. पण याआधी 6 महिन्यांची मर्यादा असल्यााने त्याचा साठा करता आला नाही.
5). कोरोनाचा गंभीर संसर्ग झालेल्या व्यक्तीला हे इंजेक्शन दिलं जातं. पण “काही रुग्णालयात लक्षणं नसलेल्या किंवा गरज नसलेल्या रुग्णांनाही रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं जात आहे.”

रेमडेसीविर चा पुरवठा योग्य वेळी होईल का..??

1). निर्यात थांबवली असे शासनाने सांगितले तर आहे.
2). राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगतात, “हे इंजेक्शन तयार करणााऱ्या कंपन्यांनी वाढीव उत्पादन करायला सुरुवात केली आहे. त्याची प्रक्रिया पूर्ण होऊन वाढीव उत्पादन यायला किमान 20 दिवस लागतील. त्यानंतर राज्यात रेमडेसिवीर’ चा तुटवडा जाणवणार नाही. सध्या राज्यातली तुटवड्याची परिस्थिती लक्षात घेऊन कंपन्यांनी निर्यात साठा महाराष्ट्राला देण्याचं मान्य केलय. त्याचबरोबर कंपन्याच्या उत्पादनापैकी 70% पुरवठा हा महाराष्ट्राला केला जाईल”..!! £ ✍🏻
– लखन ठाकुर
Lakhan16thakur@gmail.com
संदर्भ : संपादकीय लेख, शासकीय दस्तावेज

10 Comments

  1. Green tea treatment reduced the number of cyclin D 1 positive and ОІ catenin positive small tumors but had no effect on COX2 expression; changes in protein expression correlated with changes in mRNA levels cialis pills

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please turn off the ad blocker for site working smoothly