Breaking Newsवास्तव

MPSC मधील लपलेले वास्तव..भाग 2

MPSC मधील लपलेले वास्तव..भाग 2

part 1 link:

@MPSC कडे वळू नये असे म्हणण्याचा माझा किंचितही उद्देश नाही. परंतु कोणी या परीक्षा द्याव्यात?  या परीक्षा देण्यासाठी किती वर्षे द्यावीत? अभ्यासाला सुरुवात केव्हा करावी? स्वतःला ओळखून यातून बाहेर पडावे की अजून संधी घ्यावी हे वेळ निघून जाण्यापुर्वी च समजायला हवे आणि सर्वात महत्वाच म्हणजे आपण का आलो ? आणि आपण खरंच हे करू शकतो का? आपली क्षमता आपल्याला ओळखता आली पाहिजे त्यासाठी #MPSC मधील काही कटू वास्तवाची जाण असणे महत्वाचे आहे आणि तेच आज मांडत आहे आहे..

 

महाराष्ट्र मध्ये आज घडीला #MPSC कडे जवळपास 23 लाख उमेदवारांचे प्रोफाईल आहे. अंदाजे 13 लाख विद्यार्थी हे गट अ व गट ब ची परीक्षा देत असतात,  सरळ सेवा परीक्षेसाठी जवळपास आठ लाख विद्यार्थी अर्ज करतात, बँकिंग साठी एक लाखाच्या आसपास विद्यार्थी तयारी करताना दिसत आहेत. पोलिस भरतीचा विचार केला तर पाच हजार पदांसाठी जवळपास नऊ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत शासनाच्या अयोग्य धोरणामुळे व एमपीएससी मधील दिरंगाईमुळे मागील सहा- सात वर्षांमध्ये नोकर भरती कपात, परीक्षा वेळेवर न होणे, निकाल वेळेवर न लागणे, परीक्षेमध्ये अनियमितता असणे, आरक्षणामुळे रखडलेल्या परीक्षा, रखडलेले निकाल, MPSC मध्ये सुरू असलेला राजकीय हस्तक्षेप, एमपीएससी मध्ये दोन वर्षापासून सदस्य नसणे, ऑनलाइन परीक्षा महापरीक्षा पोर्टल सारख्या भ्रष्ट पोर्टल मार्फत राबवून अभ्यास करणाऱ्या ऐवजी पैसे देणाऱ्याला नोकरी मिळणे. या सर्वांमुळे जे विद्यार्थी मागील दहा बारा वर्षापासून अभ्यास करत आहेत ते हाताश झाले आहेत..

होय..

दहा-बारा वर्षांपासून अभ्यास करणारा वर्गही आहे.कारण येथे फक्त इन्कमिंग चालू असते, आउटगोइंग साठी खूप कमी वाटा आहेत. कमी म्हणण्यापेक्षा त्या वाटा शोधण्याची कोणाची तयारीही नाही, आणि मानसिकताही नाही, यामुळे या मृगजळा कडे आकर्षित झालेल्या तरुणाला हे चक्रव्यूह भेदाने खूप कठीण आहे.  कारण आयुष्यातील उमेदीची तीन-चार वर्ष जेव्हा अभ्यासात जातात आणि यश मिळत नाही, तेव्हा आणखी एक शेवटची परीक्षा असे म्हणत म्हणत केव्हा हे तिसी ओलांडून पुढे जाते हेही लक्षात येत नाही. इतर व्यसनांपेक्षा  MPSC चे व्यसन हे खूप भयंकर आहे, आणि वेळेत हे व्यसन सुटले नाही तर इतर अनेक व्यसनांच्या आहारी हे तरुण जाताना दिसत आहेत. या सर्व परिस्थितीला जबाबदार फक्त विद्यार्थीच नाहीत तर सर्वात जास्त जबाबदार आहे सरकार. मग ते कोणतेही असो.

लाखोंच्या घरांमध्ये रिक्तपदे असताना देखील सरकार  पदे भरत नाही, जी भरली जातात त्यामध्ये दिरंगाई, नोकर भरती कपात, कोर्टकचेऱ्या, या सर्व कारणांमुळे पुस्तकातून बाहेर तोंड न  काढणाऱ्या आमच्यासारख्या काही समविचारी विद्यार्थ्यांना 2015 पासून लढा उभारावा लागला..  “मागितले तरच मिळते”  याची प्रचिती आम्हाला आली होती. या चळवळीमुळे बरेच बदल घडले, दबावगट तयार झाला, परीक्षा काही प्रमाणात का होईना पण वेळेवर होऊ लागल्या, भ्रष्टाचार कमी होऊ लागला, निकाल वेळेवर लागू लागले, चळवळीतील सर्वात मोठे यश ठरले “वय वाढ” आणि सर्वात घातक निर्णय ही तोच ठरताना दिसत आहे. 2014-15 या वर्षामध्ये जाहिरात न आल्यामुळे वयोमर्यादेतून बाद झालेल्या विद्यार्थ्यांसाठी वय वाढवून मिळावे म्हणून ही चळवळ उभारली, अनेक आंदोलने झाली आणि सरकारने पाच वर्षांसाठी सरसकट वय वाढवून दिले आणि तीच सर्वात मोठी चूक ठरली. कारण पाच वर्ष हा विद्यार्थी या चक्रव्यूहात अडकून पडला. वयाच्या 38 ते 43 वयापर्यंत परीक्षा देता येणे हीच सर्वात मोठी चूक घडली. मागील पाच वर्षांमध्ये झालेल्या परीक्षा आणि त्यामध्ये बसलेले विद्यार्थी व निवड होणाऱ्या चे प्रमाण खालील तक्त्यामध्ये देत आहे.

 

यावरून आपणास लक्षात येईल की स्पर्धा खूप मोठी आहे आणि या स्पर्धेत टिकणे देखील तेवढेच मोठे कठीण. स्वतःला आजमावून पाहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि अवश्य आजमावून पाहायला हवे परंतु स्वतःला ओळखण्यासाठी किती दिवस घ्यायचे हे आपणच ठरवायला हवे सध्या MPSC च अशा चक्रव्यूहात मध्ये अडकली आहे की, एका बाजूला सरकार, एका बाजूला विद्यार्थी, एकीकडे निवड झालेले अधिकारी, तर एकीकडे कोर्ट…

सरकार मागणी पत्र देत नाही तोपर्यंत एमपीएससी परीक्षा घेत नाही. आणि मागणी पत्र मिळालेच तरी एमपीएससी परीक्षा कधी घेईल माहीत नाही, परीक्षा झाली तर निकालाचा थांगपत्ता नाही, कारण यामध्ये एक नवीन पायरी तयार झाली आणखी ती म्हणजे कोर्ट.. नंतर निकाल, पुन्हा कोर्ट, पून्हा नियुक्ती, मोर्चे, आंदोलने तर वेगळेच. आणि सध्याचा ज्वलंत प्रश्न म्हणजे “आरक्षण” आणि या सर्वांमध्ये वाया जातात ते म्हणजे विद्यार्थ्यांचे ऐन उमेदीची वर्ष..

आपला पाल्य अधिकारी बनणारच असे स्वप्न पाहत पालक जीवाचे रान करून कष्ट करत असतात आणि पैसे पाठवत असतात. कोणी शेती गहाण ठेवलेले असते तर कोणी कर्ज काढून अभ्यासाला आलेला असतो, पहिले दोन तीन वर्ष खूप स्वप्न रंगवत अभ्यास सुरू असतो पैसे वेळेवर येत असतात दोन-तीन महिन्यात  गावाकडे गेले की स्वागत ही होत असते, आपुलकी ही असते, कारण तो भविष्यातील अधिकारी असतो ना?? परंतु जसजसे दिवस पुढे ढकलत जातात तसे घरून आणि समाजातून प्रश्न सुरू होतात… “अजुन किती दिवस”?  “कधी होणार तू अधिकारी”?  कधी येणार गावांमध्ये वर्दी घालून?  कधी येणार लाल दिव्याची गाडी घेऊन?  आणि आपल्याकडे  एकच उत्तर असते, ‘पुढच्या वेळेस नक्की होणार यावेळेस एका मार्कने हुकलो”।।।

कुटुंबापेक्षा समाजाला त्याची जास्त काळजी असते, त्यामुळे हा घरी जाणे सुद्धा कमी करतो, गेलाच तर रात्री उशिरा..

दिलेली मुदत जशी जशी संपत जाते तसे प्रश्न ही वाढत जातात. आणि कित्येक कुटुंबामधील अर्थसंकल्पातील आपली तरतूद एक तर काढून तर निकाल नाही, निकाल लागला तर नियुक्ती नाही, सगळ्याच गोष्टींची अनिश्चितता. आणि शेवटी शाश्वत नोकरीची हमीही नाही, कारण आरक्षणा मधील चढ-उतारामुळे ज्यांच्या नियुक्त्या झाल्या त्यांच्यावर देखील टांगती तलवार. या चक्रव्यूहातून बाहेर न पडण्याचे आणखी एक कारण म्हणजे “लोक काय म्हणतील”..

मी जे शिकलो त्यावर तर मला नोकरी मिळणे कठीणच कारण मध्ये गॅप खूप पडलेला असतो. यामध्ये काही मंडळी तर लाखो रुपये खर्चून डॉक्टर, इंजिनिअर बनतात आणि लाखो रुपयांची नोकरी सोडून या चक्रव्यूहात उडी मारतात.  काही यशस्वी होतात पण सर्वांनाच ते भाग्य लागत नाही. सर्वात जास्त अडचण होते मुलींची कारण त्यांचा सर्वात मोठा चक्रव्यूह म्हणजे दिलेली वेळ.  काही मुली मात्र हा चक्रव्यूह भेदण्यात यशस्वी होतात.मात्र कित्येक मुली दिलेल्या  मुदतीत पेक्षा वाढीव मुदत मिळवण्यात यशस्वीही होतात. परंतु सरकार आणि एमपीएससी च्या दिरंगाईमुळे त्यात जास्तच अडकत जातात. लग्नाचे वय निघून जात असल्याने त्यांना जरी काळजी वाटत नसली तरी घरचे दडपणाखाली असतात.कारण नेहमीप्रमाणेच त्यांच्या पेक्षा त्यांच्या सगेसोयरे यांनाच जास्त काळजी असते.

क्रमशः

MPSC मधील लपलेले वास्तव.. भाग 3

किरण वसंतराव निंभोरे

MPSC स्टुडंट्स राईट्स

वास्तव कट्टा

8484086061

17,660 Comments

  1. Pingback: canadian drugstore
  2. Pingback: canadian pharmacy
  3. Pingback: canadian cialis
  4. Pingback: buy cialis
  5. Pingback: buy cialis cheap
  6. Pingback: viagra canada
  7. Pingback: canada pharmacies
  8. Pingback: canadian rx
  9. Pingback: dkyubn.bizwebs.com
  10. Pingback: kwsde.zombeek.cz