Breaking Newsराजकीय
Trending

महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय??

महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय??

न्युज चॅनेल सुरू करताच ठराविक 4-5 नावांभोवती सर्व महाराष्ट्र फिरताना दिसत आहे मात्र महाराष्ट्राचे मूलभूत प्रश्न कोणीच मांडायला तयार नाही असे का?

जनता डोळ्यासमोर ठेवून राज्य कारभार करणे हेच खरे जनतेच्या आणि सरकारच्या हिताचे असते परंतु निवडणुकीपूर्वी काही दिवस जनतेच्या म्हणजेच मतदार राजाच्या हिताचे मोठे मोठे दिंडोरे पिटले जातात, भरपूर आश्वासने दिली जातात, मात्र जनतेला स्वप्नामध्ये रमवून हे सत्ताधारी आणि विरोधक मात्र स्वतःची स्वप्न साकार करण्यासाठी धडपड करत असतात. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये नेमके तेच घडत आहे महा विकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून (माफी असावी पहाटेच्या शपथविधी पासून) महाराष्ट्र मध्ये भरपूर नाट्यमय घडामोडी घडल्या.
काही एकपात्री होत्या तर काही बहूपात्री होत्या.
सुरुवात झाली पालघर मध्ये घडलेल्या साधूंच्या हत्याकांडापासून.
सुशांत सिंग राजपूत यांची आत्महत्या, कंगना रनौत यांचे वादग्रस्त वक्तव्य, आदित्य ठाकरे यांचा सुशांत सिंग केस संबंध आणि हे सर्व सुरू असताना कोरोनाचा कहर तर आहेच.
परंतु हे येथे थांबेल तो महाराष्ट्र कसा आणि थांबून देखील ते विरोधी पक्षनेते कसे.
नाट्यमय शृंखलेतील पुढील पात्र म्हणजे नामदार धनंजय मुंडे साहेब आणि त्यांच्यावर झालेला बलात्काराचा आरोप आणि हे प्रकरण निस्तरे पर्यंत आमदार संजय राठोड आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण समोर आले आणि आमची भोळीभाबडी जनता मात्र तू तू – मै मै करत सोशल मीडियावर आपापसात वाद घालत बसली आणि काही तर अजूनही निवडणुकीपूर्वी दाखवलेला स्वप्नांमध्ये आहेत हे प्रकरण शांत होते ना होते तोच मुंबई येथे अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ उभी राहिलेले आढळून आली (खरेतर स्कॉर्पियो मध्ये जिलेटीन च्या कांड्या होत्या परंतू प्रसारमाध्यमे स्फोटकांनी भरलेली गाडी असा शब्दप्रयोग करत आहेत)
असो या सर्व प्रकरणातून एक नवीन नाव समोर आले आणि एका नवीन नाट्यमय घडामोडी ला सुरुवात झाली त्यातील पहिले पात्र म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाजे आणि ज्या स्कॉर्पिओ मध्ये स्फोटके आढळली ती ज्यांच्या मालकीची होती ते मनसुख हिरेन हे दुसरे पात्र चर्चेत आले आणि त्यातच त्यांचा मृतदेह आढळून आला आणि या प्रकरणाला वेगळे वळण लागले. प्रकरण INA कडे गेले, चौकशी सुरू झाली. विरोधी पक्ष नेते वकील आणि न्यायाधीश यांच्या भूमिकेत चोख जबाबदारी बजावताना दिसले. मात्र नाट्यशृंखला अजूनही संपलेली नव्हती प्रकरण वेगळेच वळण घेत होते आणि अचानक लेटर बॉम्ब प्रकरण सुरू झाले मुंबईचे माजी आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये महिन्याकाठी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केलेले पत्र मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पाठवले आणि पूर्ण भाजपा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी करू लागले विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांच्या आक्रमक शैलीत “मी पुन्हा येईल” असा साक्षात्कार झाल्यासारखी बाजू लावून धरली.
विषय भरकटत होता मात्र नाट्यशृंखला संपत नव्हती आणि नवीन नाव पुन्हा समोर येत होते त्यातच रश्मी शुक्ला यांनाही या शृंखलेत घेण्यात आले.
प्रश्न असा उद्भवतो की हे सर्व होत असताना जनतेला काय मिळाले? विरोधकांना सत्तेत येण्याच्या अशा दिसली, मिडियाला टीआरपी आणि मसाला मिळाला, मात्र जनतेला काय मिळाले? शेतकऱ्यांना काय मिळाले? स्पर्धा परीक्षार्थींना काय मिळाले? पोलिसांना, व्यवसायिकांना, नोकरदारांना बेरोजगारांना काय मिळाले?
सरकारने यांच्याकडे यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष दिले का?
आरोग्य विभागाने खाजगी कंपनी मार्फत नोकर भरती केली त्यामध्ये मोठा घोटाळा झाला भ्रष्टाचार झाला त्याचे सर्व पुरावे सरकार ला देखील दिले, मीडियावर देखील दाखवले तरीही सरकार काहीच कारवाई करत नाही असे का?
आणि विशेष म्हणजे बेंबीच्या देठापासून सभागृहांमध्ये व पत्रकारांसमोर विरोध करणारे विरोधी पक्ष नेते या भ्रष्टाचारात काहीच का बोलत नाहीत?
कधीकधी असे वाटते की अशा काही प्रकरणांमध्ये सरकारसोबत विरोधी पक्ष नेत्यांनी हातमिळवणी तर केली नसेल ना?
अधिकाऱ्यांना नियुक्त नाहीत, सरकार काहीच कारवाई करायला तयार नाही,
मग विरोधीपक्ष नेते शांत का? पोलिसांवर ती भर दिवसा कोणीही हल्ले करतो, गृहखाते काहीच कारवाई करत नाही मग विरोधीपक्ष नेते शांत का ?
भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांची पिके जळत असताना सरकार वीज कनेक्शन तोडत आहे विरोधी पक्षनेते शांत का?
अवकाळी पावसाने शेतकरी उध्वस्त झाला त्याच्या मदतीसाठी विरोधीपक्षनेते शांत का?
आणि शेवटी मराठा आरक्षण सरकारला टिकवता आले नाही मग विरोधी पक्ष नेते मनाचा मोठेपणा दाखवून आरक्षणासाठी सरकार सोबत एकत्र येऊन लढण्याचा मोठेपणा का दाखवता आला नाही ?
का ??
नोकर भरती घोटाळा, शेतकरी वीज तोडणी, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, अवकाळी पावसाने झालेले नुकसान, शिक्षणाचा झालेला खेळखंडोबा, या विरोधात जर सक्षम पणे विरोधी पक्ष नेता म्हणून जर आपण आवाज उठवला असता तर नक्कीच लाखो शेतकरी बेरोजगारांचे कल्याण झाले असते आणि ते नेहमी आपले ऋणी राहिले असते परंतु आपण सत्ते मधून बाहेर पडल्यापासून फक्त सत्ता आपल्या हाती कशी मिळेल याच विचारात आहात.
सरकार कसे अडचणीत आणता येईल त्यांना कसे कात्रीत पकडता येईल याच प्लॅनिंग मध्ये आपली सर्व ताकद जात आहे.
एक अभ्यासू, सक्षम, कर्तुत्ववान नेता जेव्हा विरोधी बाकावर बसतो तेव्हा सरकार पाच वर्ष सरळ काम करेल अशी लोकांची धारणा असते, पण आपण सत्तेच्या मागे, आणि सत्ताधारी सत्ता टिकवण्याच्या मागे.
तुम्हा लोकांच्या वैयक्तिक वादांमध्ये मात्र जनता भरडली जात आहे आणि मीडिया आपली पोळी भाजून घेत आहे. जनतेचं सत्ताधारी ऐकायला तयार नाहीत, सत्ताधार्‍यांचं विरोधक ऐकायला तयार नाहीत आणि विरोधकांना आणि सरकारला जनतेची घेणं देणं नाही….
विचार करा.. उद्रेकाची वाट पाहू नका… जनता सब जाणती है…
कटू आहे पण वास्तव आहे…

किरण वसंतराव निंभोरे
8484086061
Kiran.nimbhore2047@gmail.com
MPSC STUDENTS RIGHTS
VASTAV KATTA

13,400 Comments

  1. doxycycline dairy The more severe manifestations of disease due to Candida species involve infection of sterile sites or organs, such as candidemia, esophagitis, endocarditis, intra- abdominal infections, musculoskeletal disease, disseminated disease, CNS, hepatosplenic and renal disease, along with other forms of invasive candidiasis IC.

  2. Women were eligible to participate if they were over the age of 18, classified as moderately high or high risk of breast cancer, spoke English, had discussed preventive therapy with a healthcare professional and had no known contraindications for tamoxifen use lasix drug

  3. In a new study published in Molecular Endocrinology, researchers found that tamoxifen, which blocks the activity of XPO1, combined with the drug selinexor, enhanced sensitivity to prevent the recurrence of cancerous tumors discreet cialis meds Mezzetta Fresh Pack Hot Cauliflower

  4. how to buy stromectol In einer Studie wurde die Verwendung von Ritonavir zur ErhГ¶hung der geringen BioverfГјgbarkeit von Docetaxel untersucht Die durchschnittliche orale BioverfГјgbarkeit von 75 100 mg Tag Docetaxel wurde durch 100 mg Tag Ritonavir von 19 auf 39 erhГ¶ht