Breaking Newsराजकीय
Trending

MPSC परीक्षा, मराठा आरक्षण, विद्यार्थ्यांची अवस्था, राजकीय मानसिकता, सरकार ची इच्छाशक्ती आणि वास्तव..

🚨 *MPSC परीक्षा, मराठा आरक्षण, राजकीय मानसिकता, विध्यार्थ्यांची अवस्था, सरकारची इच्छाशक्ती आणि वास्तव….*

👉MPSC परीक्षा आणि त्यामधून सुरू झालेले आत्महत्या सत्र व खालावलेले मानसिक संतुलन याला *जबाबदार कोण?*
कोणी कोरोनाला जबाबदार धरले तर कोणी सरकारला, कोणी आरक्षणाला तर कोणी विध्यार्थी संघटनांना आणि उरलेली जबाबदारी MPSC वर ढकलली…
पण या सर्व परिस्थिती मागील वास्तव काय आहे याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न कोणी केलाच नाही…

प्रथम कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन दोन वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या त्यावेळी काही विद्यार्थ्यांकडून या निर्णयाचे स्वागत झाले तर काही नाराज झाले…

परीक्षेची दुसरी तारीख आली तेव्हा मात्र वाहतुक यंत्रणा सुरळीत ना झाल्याने आणि आंतरजिल्हा प्रवास टाळण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव MPSC STUDENTS RIGHTS सह इतर विध्यार्थी संघटनांनी परीक्षा केंद्र बदलण्याची मागणी केली आणि ती अंशतः मान्य देखील झाली परंतु काही राजकीय नेत्यांच्या विनंतीवरून व जिल्हास्तरावरून आलेल्या तपसीलावरून कोविड चा संसर्ग टाळण्याच्या कारणावरून पुन्हा परीक्षा पुढे ढकलण्यात आली (राज्यसरकार ला देखील हेच अपेक्षित होते साप तर मारायचा पण काठी मोडू द्यायची नाही या भूमिकेत सरकार असावे , त्यावेळी मात्र UPSC ने पूर्व परीक्षा घेतली होती)
यावेळी मात्र काही विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले तर काहींनी निषेध नोंदवला तर काहींनी आमच्यासह इतर विध्यार्थी संघटनांना जबाबदार धरले..

आता पुन्हा नवी तारीख…
11 ऑक्टोबर ला राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार हे निश्चित झाले आणि अचानक मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली… आणि खरा राजकीय खेळ रंगला…
मराठा आरक्षणाला स्थगिती आल्यामुळे ज्यांनी SEBC मधून अर्ज केले त्यांचे काय? याचे उत्तर ना सरकारकडे होते ना MPSC कडे..
आरक्षणाचा विषय हा अति संवेदनशील त्यामुळे सरकारसह विरोधकही शांतच दिसले आणि त्यामुळे उद्रेक झाला आणि मराठा संघटना, मराठा आरक्षण कृती समित्या आणि काही मराठा नेते हे मराठा विद्यार्थ्यांसाठी धावून आले आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत परीक्षा न होऊ देण्याच्या मागणीने जोर धरला, परीक्षा केंद्र बंद पडण्याची तयारी दर्शविली गेली आणि त्यातच उडी घेतली ती दोन्ही राजेंनी…
सरकार मध्यस्थ मार्ग काढू शकत नव्हते का?
विरोधी पक्ष आणि सरकार एकत्र येऊन मराठा नेत्यांना विश्वासात घेऊन विध्यार्थी हिताचा निर्णय घेऊ शकत नव्हते का?
प्रश्न राज्यसेवेतील 23 जागांचा होता मग राज्यसरकार 23 अतिरिक्त जागा काढू शकत नव्हते का?
हे सर्व होत असताना MPSC मात्र परीक्षा घेणारच ही भूमिका वारंवार वर्तमानपत्रातून जाहीर करून आगीत तेल ओतण्याचे काम करत होती…
वातावरण पेटले आणि परीक्षा पुढे ढकलली तीही परीक्षेच्या एक दिवस आधी त्यावेळी नाराज होणारा वर्ग आणि खुश होणारा वर्ग असे दोन गट तयार झाले… आणि येथेच शाहू, फुले, आंबेडकरांची वाटणी करणारा एक नवा सुशिक्षीत वर्ग वर डोके काढू लागला..
पूर्वी शिक्षणाच्या अभावामुळे जात बळावली होती आणि आता सुशिक्षित च जातीला खतपाणी घालत आहेत.. असो हा विषय येथे गौण आहे पण गंभीर आहे…

आता आरक्षणाचा तोडगा निघत नाही तोपर्यंत परीक्षा स्थगित केल्या पण पुढे काय???
आरक्षण तर टिकायलाच हवे पण खरेच त्यासाठी सरकार आणि विरोधी पक्षाची मानसिकता आणि इच्छाशक्ती आहे का??
जे नेते, संघटना परीक्षा पुढे ढकलण्यासाठी अग्रेसर होत्या त्यांना विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे गांभीर्य आहे का? परीक्षा स्थगित करणे हा जर विजय समजला जात असेल तर तो वयक्तिक स्वार्थ समजावा पण खरा विजय तेव्हा असेल जेव्हा लवकरात लवकर मराठा आरक्षण लागू होऊन परीक्षा होतील किंवा पर्यायी मार्ग काढून मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय न होता परीक्षा घेण्यास भाग पडतील….
मात्र हे होताना कोठेही दिसत नाही आणि यामध्ये नुकसान मात्र मराठा विद्यार्थ्यांचेच जास्त होत आहे हे कोणाच्याच लक्षात येत नाही हे दुर्दैव…
वय वाढवून देऊ या सरकारच्या आश्वासनावर आयुष्यातील उमेदीचे 2- 4 वर्ष आपण वाया घालवत आहोत हे वास्तव दडणारे नाही…

कोविड ची परिस्थिती आणि सरकारच्या तिजोरीवरील ताण यामुळे सरकार ने एप्रिल 2020 मधेच नोकरभरती बंदी चा GR काढला होता, तिजोरीत पैसे नाहीत आणि पगारावर होणार खर्च पेलवत नाही हे वास्तव असताना नोकरभरतीला विरोध करून आपण सरकार च्या हातात आयते कोलीत दिले आहे आणि सरकारलाही तेच हवे होते “सुंठेवाचून खोकला गेला” यातच सरकार खुश…
आरक्षणाचा मुद्दा मा. सुप्रीम कोर्टाच्या अधीन असल्यामुळे आपण काही बोलू शकत नाही परंतु विरोधी पक्षाला देखील सरकार ला धारेवर धरण्याचे हे एक मोठे साधनच मिळाले आहे असे म्हणावे लागेल…
यामधून हे स्पष्ट होते की ना सरकार ला विद्यार्थ्यांच्या भविष्याचे गांभीर्य आहे ना विरोधकांना…
आज इतर विद्यार्थ्यांसोबत मराठा आरक्षणाचा लाभार्थी देखील निराश आहे आणि परीक्षा लवकर व्हावी म्हणून विनवणी करत आहे…
मायबाप सरकार आणि विरोधकांना विनंती आहे की आपण या विध्यार्थ्यांचा विचार करा कारण हे देशाचे भवितव्य आहे..

या वादामध्ये मात्र सरकार चा नोकरभरती कपातीचा उद्देश साध्य होईल, विरोधकांना मराठा समाजामध्ये आम्ही दिलेले आरक्षण या सरकार ला टिकवता आले नाही हे दाखवून सहानुभूती मिळवून सरकार विरोधात रोष निर्माण करता येईल, मराठा नेत्यांना देखील राजकीय पोळी भाजता येईल…
आणि obc व इतर नेते परीक्षा घ्या म्हणून आंदोलन करतील व स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील…
मात्र यामध्ये भरडला जातोय तो फक्त विध्यार्थी…ज्याला सध्या कोणीही वाली नाही… आणि हेच खरे वास्तव आहे.
विद्यार्थ्यांनी आता स्वतःला ओळखावे,
सरकार, विरोधीपक्ष, नेते, संघटना तुमच्यासाठी धावून येतील आणि प्रश्न सोडवतील याची वाट पाहण्याची ही वेळ नाही… आपण स्वावलंबी बनावे हीच अपेक्षा…
यांची ताकद ओळखून तरी याना न्याय द्या अन्यथा…. आपण सुज्ञ आहात..

(यामधून कोणाला दुखविण्याचा, टीका करण्याचा किंवा कोणाचे समर्थन करण्याचा मुळीच हेतू नाही परंतु जात धर्म पंथ आणि राजकारण बाजूला ठेवले तर विध्यार्थी कधीही भरडला जाणार नाही.. )

किरण निंभोरे
MPSC Students Rights
वास्तव कट्टा

6 Comments

  1. cheap cialis no prescription As an indication of the contribution of the carryover effect of tamoxifen, the bone substudy indicated that this was likely to last for less than 6 months because the decrease in bone mineral density was apparent at the 6 month time point, which is consistent with the known half life of tamoxifen and its active metabolite 4 and 9 days, respectively

  2. The Rhine Alliance will blood pressure pills show up drug test has been between the two great empires of Austria Hungary and Dro for many years, but they still dare to start wars everywhere, will blood pressure pills show up drug test and they do not take the Church of Light in their eyes, All I can t stand is the mess, will blood pressure pills show up drug test like the snow on the streets, after being trampled on cialis 86 at the concentrations of 25, 50, and 100 Ојg mL, respectively indicating that PTE reduced the accumulation of triglycerides in adipocytes

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please turn off the ad blocker for site working smoothly